जिल्हा परिषद कर्मचाऱ्यांचा दिल्लीत पेन्शनसाठी एल्गार, रामलीला मैदानावर लाखोंचा जनसमुदाय

By चंद्रकांत शेळके | Published: October 1, 2023 04:14 PM2023-10-01T16:14:01+5:302023-10-01T16:16:08+5:30

या आंदोलनात नगर जिल्हा परिषदेचे शेकडो कर्मचारी सहभागी झाले आहेत.

Zilla Parishad employees in Delhi Ramlila Maidan for pension | जिल्हा परिषद कर्मचाऱ्यांचा दिल्लीत पेन्शनसाठी एल्गार, रामलीला मैदानावर लाखोंचा जनसमुदाय

जिल्हा परिषद कर्मचाऱ्यांचा दिल्लीत पेन्शनसाठी एल्गार, रामलीला मैदानावर लाखोंचा जनसमुदाय

googlenewsNext

अहमदनगर : नोकऱ्यांमधील खासगीकरण थांबवावे, तसेच २००५ पूर्वी नियुक्त कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागू करावी, या मागण्यांसाठी  भारतभरातून आलेल्या कर्मचाऱ्यांनी रविवारी दिल्लीत पेन्शन शंखनाद आंदोलन केले. या आंदोलनात नगर जिल्हा परिषदेचे शेकडो कर्मचारी सहभागी झाले आहेत.

केंद्र सरकारने मोठ्या प्रमाणात नोकऱ्यांमध्ये खासगीकरण सुरू केले आहे. तसेच २००५ पूर्वी विविध विभागातील कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागू नाही, ही पेन्शन सुरू करावी  या मागण्यांसाठी देशभरातून केंद्र सरकारच्या विरोधात आंदोलक एकवटले आहेत. राज्य जिल्हा परिषद कर्मचारी युनियनचे राज्य उपाध्यक्ष सुभाष कराळे यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा परिषद मुख्यालयातील ५५ कर्मचारी दिल्लीला गेले आहेत. याशिवाय इतर विभागांचे  एक ते दीड हजार कर्मचारी जिल्ह्यातून दिल्लीत दाखल झाले आहेत. 

या सर्वांनी दिल्लीमध्ये १ ऑक्टोबरला केंद्र सरकारच्या विरोधात शंखनाद आंदोलन केले. यावेळी जिल्हा परिषद कर्मचारी युनियनचे जिल्हाध्यक्ष अभय गट, मनोज चोभे, समीर वाघमारे, विकास साळुंखे, सुरज भोजने, आरती शेकडे, कल्पना शिंदे, अनघा कुलकर्णी, संदीप वाघमारे आदींसह ५५ कर्मचारी उपस्थित होते. लाखोंच्या संख्येने आलेल्या कर्मचाऱ्यांनी केंद्र सरकारविरोधात घोषणाबाजी करत जुन्या पेन्शन योजनेची मागणी केली.
 

Web Title: Zilla Parishad employees in Delhi Ramlila Maidan for pension

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.