शहरं
Join us  
Trending Stories
1
NCB-ATS ची मोठी कारवाई, 600 कोटी रुपयांच्या 86 किलो ड्रग्जसह 14 पाकिस्तानींना अटक
2
"राम मंदिर बांधण्याचा निर्णय देशाच्या स्वातंत्र्याच्या दुसऱ्याच दिवशी घ्यायला हवा होता"
3
'आप'च्या थीम साँगवर निवडणूक आयोगाचा आक्षेप; आतिशी म्हणाल्या, "त्यांनी हुकूमशाही केली तर योग्य, आम्ही गाणं लिहिलं तर चूक"
4
IPL 2024 GT vs RCB : WHAT A BALL सिराज! अखेर शाहरूख खानच्या घातक खेळीचा अंत
5
सांगलीत विशाल पाटलांना धक्का; चंद्रहार पाटील यांच्या प्रचारात विश्वजीत कदम सक्रिय
6
पवार कुटुंबातील आपल्या बाजूने कोण? सुप्रिया सुळेंच्या बाजूने कोण? आणि तटस्थ कोण? अजितदादांनी सविस्तर सांगितलं
7
'काँग्रेसची मुघल विचारसरणी, त्यांना औरंगजेबाचे अत्याचार आठवत नाहीत', PM मोदींचा हल्लाबोल
8
"मला त्याच्याकडून एकच गोष्ट शिकायचीय", गंभीरची 'विराट' बॅटिंग; ट्रोलर्सला दिलं प्रत्युत्तर!
9
'RSS कायम आरक्षणाच्या बाजूने, काही लोक खोटं पसरवत आहेत', मोहन भागवतांचे मोठे वक्तव्य
10
भारताला वर्ल्डकप जिंकून देणारे गॅरी कस्टर्न बनले पाकिस्तानचे प्रशिक्षक 
11
भांडुपमध्ये सव्वा दोन कोटींच्या रक्कमेने खळबळ; 'ते' पैसे बँकेचेच असल्याचे समोर
12
"मी कोणाच्या बापाला घाबरत नाही", छगन भुजबळ यांचा कडा प्रहार
13
Saumya Tandon : 'भाबीजी घर पर हैं' फेम अभिनेत्री सौम्या टंडन रुग्णालयात दाखल; प्रकृती बिघडल्याने फॅन्स चिंतेत
14
Gurucharan Singh : सोढीचं शेवटचं लोकेशन, ATM मधून काढले 7 हजार; गुरुचरण सिंग अचानक बेपत्ता, गूढ कायम
15
खळबळजनक! बाईक न मिळाल्याने पती झाला हैवान; पत्नीचा काढला काटा, 8 दिवसांपूर्वी झालेलं लग्न
16
SBI ची दमदार कामगिरी; एका आठवड्यात गुंतवणूकदारांची ₹45000 कोटींची कमाई
17
...तर परत मी लोकसभा निवडणूक लढवणार नाही; भोरमध्ये अजित पवारांची घोषणा
18
'पुढची गोळी हवेत चालणार नाही'; काश्मिरमध्ये मिठाईच्या दुकानावर गोळीबार करत धमकी
19
देवेंद्र फडणवीस पवारांना काटशह देणार?; अभिजीत पाटलांच्या भाजप प्रवेशाची चर्चा
20
दादा-भाईंचं मनोमीलन, बदलणार का सिंधुदुर्गातलं समीकरण?, असं आहे गणित... 

नगर जिल्हा बँक भरतीची फेरतपासणी; सहकार आयुक्तांचा आदेश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 27, 2020 4:07 AM

हौसारे समितीच्या अहवालावर आक्षेप

- सुधीर लंके अहमदनगर : अहमदनगर जिल्हा सहकारी बँकेची भरती सहकार विभागाने रद्दबातल ठरविल्यानंतर पुन्हा याच विभागाच्या दुसऱ्या चौकशी समितीने भरतीला क्लिन चिट दिली आहे. फेरचौकशी अहवालावर ‘लोकमत’ने वृत्तमालिका प्रकाशित केल्यानंतर सहकार आयुक्त अनिल कवडे यांनी नाशिकच्या विभागीय सहनिबंधकांना या अहवालाची फेरतपासणी करण्याचा आदेश दिला आहे.जिल्हा बँकेने जून २०१७ मध्ये ४६५ जागांच्या भरती प्रक्रियेसाठी जाहिरात दिली होती. या भरतीचे काम ‘नायबर’ या खासगी संस्थेकडे देण्यात आले. या भरतीची गुणवत्ता यादी प्रसिद्ध होताच ‘लोकमत’ने पुराव्यांसह भरतीतील गैरप्रकार समोर आणल्याने शासनाने भरतीला स्थगिती देत सहकार विभागाचे अधिकारी आर.बी. कुलकर्णी यांच्या अध्यक्षतेखाली चौकशी समिती नेमली. या समितीने भरतीच्या उत्तरपत्रिकांसह अनेक बाबींमध्ये अनियमितता असल्याचा ठपका ठेवल्याने शासनाने भरतीच रद्द केली.त्यानंतर काही उमेदवारांनी औरंगाबाद खंडपीठात धाव घेतली. खंडपीठाने ज्या ६४ उमेदवारांच्या उत्तरपत्रिका संशयास्पद वाटतात तेवढ्याच उत्तरपत्रिकांची प्रगत तंत्रज्ञानाच्या सहाय्याने तपासणी करण्याचा आदेश दिला. त्यामुळे बँकेने ६४ उमेदवार वगळता इतरांना नियुक्ती पत्रे दिली. ६४ उमेदवारांची फेरचौकशी करण्यासाठी नाशिकचे तत्कालीन उपनिबंधक दिगंबर हौसारे यांच्या नेतृत्वाखाली तीन सदस्यीय समिती नियुक्त करण्यात आली होती. या समितीने सहकार विभागाचा पूर्वीचा अहवाल मोडीत काढत भरतीला ‘क्लिन चीट’ दिली. मात्र, चार उमेदवारांची निवड फेरचौकशी समितीनेही अवैध ठरवली आहे. ‘लोकमत’ने फेरचौकशी अहवालातील विसंगतींवर प्रकाश टाकल्यानंतर संभाजी ब्रिगेडने या प्रकरणाच्या फेरचौकशीची मागणी केली आहे. त्यानुसार आयुक्तांनी सहनिबंधकांना चौकशीचे निर्देश दिले आहेत.काय आहेत चौकशीत त्रुटीफेरचौकशी समितीने शासकीय संस्थेऐवजी एका निवृत्त अधिकाºयाकडून उत्तरपत्रिकांतील शाईची तपासणी करुन घेतली. परीक्षेनंतर परीक्षा केंद्रावरच उत्तरपत्रिकांचे स्कॅनिंग केले जाईल तसेच उत्तरपत्रिका स्कॅनिंगची सॉप्ट कॉपी दोन-तीन परीक्षार्र्थींच्या उपस्थितीत सिलबंद केली जाईल अशी नियमात तरतूद होती. मात्र, ‘नायबर’ ने हे नियम पाळले नाहीत. तसेच उत्तरपत्रिका स्कॅन होताना बँकेने सीसीटीव्ही चित्रीकरण बंद करुन ठेवले. ‘नायबर’ने भरतीचे महत्त्वाचे कामकाज परस्पर त्रयस्थ संस्थांना दिले, असे गंभीर आक्षेप पहिल्या चौकशी समितीने नोंदविले होते. याकडे फेरचौकशी समितीने दुर्लक्ष केलेले दिसते.भरतीच्या फेरचौकशी अहवालाची तपासणी करण्याबाबत सहकार आयुक्तांकडून आदेश प्राप्त झाला आहे. त्यानुसार कार्यवाही होईल.- डॉ. ज्योती लाटकर, विभागीय सहनिबंधक, नाशिक