अहमदनगर : कोपरगावात पोलिसांनी चार दुचाकी चोरांच्या मुसक्या आवळल्या; तीन दुचाकी केल्या हस्तगत

By रोहित टेके | Published: March 15, 2023 09:49 AM2023-03-15T09:49:13+5:302023-03-15T09:49:46+5:30

त्यांच्याकडून चोरी केलेल्या तीन दुचाकी हस्तगत केल्या आहेत.

Police nabbed four bike thieves in Kopargaon ahmednagar Three bikes were seized | अहमदनगर : कोपरगावात पोलिसांनी चार दुचाकी चोरांच्या मुसक्या आवळल्या; तीन दुचाकी केल्या हस्तगत

अहमदनगर : कोपरगावात पोलिसांनी चार दुचाकी चोरांच्या मुसक्या आवळल्या; तीन दुचाकी केल्या हस्तगत

googlenewsNext

रोहित टेके 

कोपरगाव : कोपरगाव शहर पोलीस ठाण्यात ११ मार्चला जेऊर कुंभारी येथून अज्ञात चोरट्यांनी दुचाकी चोरून नेल्याची फिर्याद दाखल झाली होती. त्यावर पोलीस अधिकारी व कर्मचारी यांच्या पथकाने आरोपींचा कसून शोध घेतला आणि दुचाकी चोरी करणाऱ्या चौघांच्या मुसक्या आवळल्या. 

त्यांच्याकडून चोरी केलेल्या तीन दुचाकी हस्तगत केल्या आहेत. महेश अण्णासाहेब गायकवाड ( रा. शनिमंदिर रोड राहता ता. राहता), निलेश दिलीप जाधव (रा. शनि चौक राहता ता. राहता), किरण चंद्रकांत जाधव, सोमनाथ किसन वरशिळ ( दोघे रा. संजय नगर जेऊर कुंभारी ता. कोपरगाव ) अशी अटक केलेल्या दुचाकी चोरांची नावे आहेत.

यातील दोन दुचाकी या कोपरगाव पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या वेगवेगळ्या गुन्ह्यातील आहेत, तर एक दुचाकी ही लोणी पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या गुन्ह्यातील आहे. पोलिसांनी अशा तीन दुचाकी जप्त केल्या आहेत. ही कारवाई जिल्हा पोलीस अधिक्षक राकेश ओला, अप्पर पोलीस अधिक्षक स्वाती भोर, उपविभागीय पोलीस अधिकारी संजय सातव, यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक रामराव ढिकले, पोलीस उप निरिक्षक रोहिदास ठोंबरे, पोलीस उपनिरीक्षक भरत दाते, पोलीस उपनिरीक्षक संजय पवार, पोहेकॉ किशोर जाधव, पोलीस नाईक अर्जुन दारकुंडे, महेश गोडसे, पोलीस कॉन्स्टेबल गणेश थोरात, संभाजी शिंदे, गणेश काकडे, राम खारतोडे, यमनाजी सुंबे, महेश फड यांच्या पथकाने केली आहे.पोलिसांच्या या कारवाईचे सर्वत्र स्वागत होत आहे.

Web Title: Police nabbed four bike thieves in Kopargaon ahmednagar Three bikes were seized

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.