शहरं
Join us  
Trending Stories
1
त्यांच्या कारकिर्दीत ‘ते’ म्हणतील ते सगळं केलं, आता भावनिक व्हायच नाही; अजित पवारांचा वार
2
IPL 2024 GT vs RCB: RCB चा 'विराट' शो! विल जॅक्सचे ४१ चेंडूत शतक; ४ ओव्हर राखून विजय
3
बारामती, शिरुरमध्ये पोलिसी बळाचा वापर, मतदारांना धमक्या; संजय राऊतांचा गंभीर आरोप
4
"मुस्लीम लोक सर्वाधिक कंडोम वापरतात..."; ओवेसींनी दिला केंद्राच्या डेटाचा हवाला, PM मोदींवर पलटवार
5
बीडमध्ये पंकजा मुंडे, मनोज जरांगे एकाच व्यासपीठावर; दोघांचाही एकमेकांना नमस्कार
6
BANW vs INDW: भारताची विजयी सलामी! बांगलादेश त्यांच्याच घरात ढेर; पाहुण्यांची सांघिक खेळी
7
ठाण्यात ऐन निवडणुकीत ठाकरेंची शिवसेना अडचणीत; एम. के. मढवींना अटक
8
माजी पंतप्रधानांच्या नातवाचे अश्लिल व्हिडीओ व्हायरल; निवडणूक होताच खासदार देशातून फरार
9
'अरे! तुमचं डोकं फुटलंय की सिलिंडर...'; बेंगलोर ब्लास्टवरून पंतप्रधान मोदी काँग्रेसवर बरसले 
10
माढ्याचा खासदार प्रत्येक वेळी नवा; आता कोण? परंपरा टिकणार की बदलणार?
11
IPL 2024 GT vs RCB : साई 'सु'दर्शन! शाहरूखही चमकला; युवा भारतीय खेळाडूंनी RCB ला धू धू धुतले
12
अनेक तासांचा प्रवास आता मिनिटांत! 'वंदे भारत' मेट्रोच्या रुपात येणार, कधी सुरू होणार? पाहा...
13
IPL 2024 GT vs RCB : "विराटच्या स्लो स्ट्राईक रेटबद्दल बोललं जातं पण...", इरफानची 'मन की बात'!
14
Narendra Modi : "राम मंदिर बांधण्याचा निर्णय देशाच्या स्वातंत्र्याच्या दुसऱ्याच दिवशी घ्यायला हवा होता"
15
'आप'च्या थीम साँगवर निवडणूक आयोगाचा आक्षेप; आतिशी म्हणाल्या, "त्यांनी हुकूमशाही केली तर योग्य, आम्ही गाणं लिहिलं तर चूक"
16
IPL 2024 GT vs RCB : WHAT A BALL सिराज! अखेर शाहरूख खानच्या घातक खेळीचा अंत
17
सांगलीत विशाल पाटलांना धक्का; चंद्रहार पाटील यांच्या प्रचारात विश्वजीत कदम सक्रिय
18
पवार कुटुंबातील आपल्या बाजूने कोण? सुप्रिया सुळेंच्या बाजूने कोण? आणि तटस्थ कोण? अजितदादांनी सविस्तर सांगितलं
19
'काँग्रेसची मुघल विचारसरणी, त्यांना औरंगजेबाचे अत्याचार आठवत नाहीत', PM मोदींचा हल्लाबोल
20
"मला त्याच्याकडून एकच गोष्ट शिकायचीय", गंभीरची 'विराट' बॅटिंग; ट्रोलर्सला दिलं प्रत्युत्तर!

पवार-ठाकरे यांच्यात राजकीय फिक्सिंग नाही - बाळा नांदगावकर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 30, 2018 4:31 PM

नगरमध्ये मनसेची बैठक

अहमदनगर : मनसे पक्षप्रमुख राज ठाकरे व ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्यात कोणतीही राजकीय फिक्सिंग नसल्याचा इन्कार करत मोदीमुक्त भारतासाठी सर्व विरोधी पक्षांनी एकत्र यावे, अशी पक्षाची भूमिका असल्याचे मनसेचे बाळा नांदगावकर यांनी नगर येथे स्पष्ट केले.विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शुक्रवारी येथील शासकीय विश्रामगृहात कार्यकर्त्यांच्या बैठकीनंतर ते पत्रकारांशी बोलत होते. जिल्हाध्यक्ष सचिन डफळ, नगरसेवक गणेश भोसले, शहराध्यक्ष गजेंद्र राशीनकर आदी यावेळी उपस्थित होते. राज ठाकरे यांची पवारांशी जवळीक वाढल्याबाबत पत्रकारांनी उपस्थित केलेल्या प्रश्नाला उत्तर देताना नांदगावकर यांनी वरील खुलासा केला. ते म्हणाले, पक्षप्रमुख राज ठाकरे यांना बाळासाहेब ठाकरे यांच्या इतकाच ज्येष्ठ नेते पवार यांच्याबद्दल आदर आहे. त्यांनी पवारांची मुलाखत घेतली. ही मुलाखत काही कारणास्तव रद्द झाली हाती. मात्र गुढी पाडव्यापूर्वी ती घेण्यात आली. गुढी पाडव्याच्या सभेत पक्षप्रमुखांनी मोदी मुक्त भारताची घोषणा केली. कारण देशातील जनतेची भाजप सरकारने फसवणूक केल्याचे ते म्हणाले.लोकसभा निवडणूकपर्वूी राज ठाकरे यांनी गुजरातला भेट देऊन मोदी यांना पंतप्रधानपदासाठी पाठिंबा दिला होता, याबाबत पत्रकारांनी छेडले असता उद्योगपती रतन टाटा यांच्या सांगण्यावरून ठाकरे यांनी गुजरात भेट दिली. गुजरातचा विकास पाहून त्यांनी त्यावेळी तशी भूमिका घेतली होती. मात्र गुजरात विकास फसवा असल्याच्या सर्वांच्याच लक्षात आले आहे. त्यामुळे मोदी मुक्त भाषणाची घोषणा ठाकरे यांनी केली असून, त्यासाठी सर्व विरोधी पक्षांनी एकत्र यावे. सर्व विरोधी पक्ष एकत्र आल्यास पुढच्या राज्यातील चित्र वेगळे असेल, असे नांदगावकर म्हणाले.

पक्ष बॅकफूटवर गेल्याची कबुली

पक्ष राज्यात हळूहळू वाढणे अपेक्षित होते. मनसे राज्यात एकदम वाढल्याने कार्यकर्त्यांच्या डोक्यात हवा घुसली. त्याचा परिणाम पक्षवाढीवर झाला असून, गेल्या अडीच वर्षांत पक्षाचे मोठे नुकसान झाल्याचे सांगून नांदगावकर यांनी पक्ष बॅकफूटवर गेल्याची कबुली दिली.

टॅग्स :AhmednagarअहमदनगरBala Nandgaonkarबाळा नांदगावकरMNSमनसेRaj Thackerayराज ठाकरेSharad Pawarशरद पवार