शहरं
Join us  
Trending Stories
1
उमेदवारी अर्ज मागे घेऊन काँग्रेस उमेदवार भाजपत; तिसऱ्या जागी विजय निश्चित
2
एआयद्वारे फेक व्हिडीओ; अघटित घडविण्याचा डाव; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा विराेधकांवर हल्लाबाेल
3
सेक्स स्कँडल : प्रज्वलची पक्षातून हकालपट्टी; माजी पंतप्रधान देवेगौडांचे कुटुंब आरोपांनी घेरले
4
भाजप व रा. स्व. संघाची संविधान बदलण्याची योजना : राहुल गांधी
5
तीन विधानसभा निवडणुकीत मतांची टक्केवारी घसरली, तरीही राज ठाकरे महायुतीला का हवे आहेत?
6
पारा वाढता वाढे, देशभरात उकाडा; वाढत्या तापमानाने नागरिक हैराण, राज्यातही उष्णता वाढणार
7
राहुल शेवाळे यांच्या स्थावर मालमत्तेत सात कोटींची वाढ; २०१९'ला स्थावर मालमत्ता नसल्याचे नमूद होते
8
अरविंद सावंत यांच्याकडे एकच कार; संपत्ती पाच वर्षांत दुप्पट
9
अनिल देसाई यांच्या मालमत्तेत पावणेतीन कोटींची वाढ; स्थावर मालमत्तेत वाढ नाही
10
कांद्याची फसवी फाेडणी; सरकारचे शेतमाल निर्यातीचे धाेरण नेहमीच ग्राहकहिताचे
11
मुख्यमंत्री खूप दिवस गैरहजर राहू शकत नाहीत; विद्यार्थ्यांचे हक्क पायदळी तुडवता येणार नाहीत; दिल्ली हायकोर्ट
12
राजन विचारे यांच्या मालमत्तेत ११ कोटींची वाढ; रत्नागिरी जिल्ह्यात शेतजमीन
13
नागपूर विमानतळ उडविण्याची धमकी; ई-मेलनंतर प्रशासन अलर्ट मोडवर; सुरक्षा व्यवस्थेत वाढ
14
‘ठाण्या’चे नाक दाबून तीन मतदारसंघ भाजपने घेतले सोडवून
15
कोलकाता नाईट रायडर्सचा सहज विजय; दिल्ली कॅपिटल्सचे Play Off चे स्वप्न अधांतरी
16
"सुप्रिया बाहेरची असण्याचं कारण नाही, मी बारामतीत ज्या घरात राहतो ते तिचंच"; शरद पवारांनी स्पष्टच सांगितलं
17
भाजप नेते दुष्यंत गौतम यांच्या कारला अपघात, मणक्याला दुखापत
18
अस्वस्थ झालेल्या सत्ताधाऱ्यांकडून वैयक्तिक आरोप; सामान्य मतदारांना EVM वर शंका- शरद पवार
19
स्वप्न पूर्ण न झालेले आत्मे देशाला अस्थिर करत आहेत; PM मोदींचा नाव न घेता पवारांवर निशाणा
20
पुण्यात महायुतीच्या उमेदवारांसाठी मोदींची सभा; मंचावर दिसले मनसे नेते अमित ठाकरे

पंचायत राज समितीचे ‘पंचतारांकित’ स्वागत!

By ऑनलाइन लोकमत | Published: October 06, 2018 7:05 AM

श्रीगोंद्यात अवतरला स्वर्ग : बंगळुरूची फुले, दिल्लीच्या ‘फ्रेशनर’ने रिझविले मन

श्रीगोंदा (अहमदनगर) : बंगळुरूची फुले, दिल्लीचे रूम फ्रेशनर, मखमली गालीचे, मुंबईचा सुकामेवा अन् सामिष भोजन असा पंचतारांकित बेत. गुलाबी रंगाच्या पायघड्यांवरुन चालत सनईचा मंजूळ स्वर श्रवण करीत श्रीगोंदा पंचायत समितीत दाखल झालेली पंचायत राज समिती अवाक् झाली. जिल्हा परिषद, तालुका पंचायत समिती तसेच गावागावांतील कामांची पाहणी करण्यासाठी अहमदनगर जिल्ह्यात पंचायत राज समिती दाखल झाली. पहिल्या दिवशी जिल्हा परिषदेतील अधिकाऱ्यांची खरडपट्टी केल्यानंतर दुसऱ्या दिवशी शुक्रवारी समिती श्रीगोंदा पंचायत समितीत आली. तेथील समितीने केलेले जंगी स्वागत पाहून सदस्यांना श्रीगोंदा स्वर्गच जमिनीवर अवतरल्याचा भास झाला.

समितीकडून अहवालात झुकते माप मिळावे, म्हणून हा सर्व आटापिटा होता. ठिकठिकाणी रंगीबेरंगी झाडांच्या कुंड्या ठेवून समितीच्या सदस्यांचे मन रिझविण्याचा प्रयत्नही अधिकाºयांनी केला़ समितीतील प्रत्येक सदस्याला ५०० रूपयांचा ‘गोल्डन पेन’ही देण्यात आला. हा शाही थाट पाहून समितीचे सदस्यही अवाक् झाले. दोन मिनिटे तर एकही सदस्य मखमली गालीच्यावर बसला नाही. ज्यांच्यासाठी एवढी उधळपट्टी केली ती समिती अवघ्या ३० मिनिटांतच पंचायत समितीतून बाहेर पडली.फुलांकडे पाहून अहवाल देणार नाहीदुष्काळाचे सावट, हुमणीसारख्या किडीच्या संकटामुळे शेतकरी अडचणीत सापडला आहे़ पण श्रीगोंदा पंचायत समितीने लाखो रुपये खर्च करून केलेला पाहुणचार योग्य वाटला का?, असा प्रश्न पत्रकारांनी विचारताच पाहुण्यांचे स्वागत कसे करायचे हा त्यांचा प्रश्न असल्याचे सदस्यांनी सांगितले.आम्ही तर जालन्यात चहाही प्यायलो नाही. श्रीगोंद्यात शाही स्वागत झाले असले तरी आम्ही अहवाल फुलांकडे पाहून देणार नाही, असे पंचायत राज कमिटीचे अध्यक्ष आमदार सुधीर पारवे यांनी सांगितले.

टॅग्स :panchayat samitiपंचायत समिती