शहरं
Join us  
Trending Stories
1
ठाण्यात ऐन निवडणुकीत ठाकरेंची शिवसेना अडचणीत; एम. के. मढवींना अटक
2
माजी पंतप्रधानांच्या नातवाचे अश्लिल व्हिडीओ व्हायरल; निवडणूक होताच खासदार देशातून फरार
3
'अरे! तुमचं डोकं फुटलंय की सिलिंडर...'; बेंगलोर ब्लास्टवरून पंतप्रधान मोदी काँग्रेसवर बरसले 
4
IPL 2024 GT vs RCB : साई 'सु'दर्शन! शाहरूखही चमकला; युवा भारतीय खेळाडूंनी RCB ला धू धू धुतले
5
NCB-ATS ची मोठी कारवाई, 600 कोटी रुपयांच्या 86 किलो ड्रग्जसह 14 पाकिस्तानींना अटक
6
Narendra Modi : "राम मंदिर बांधण्याचा निर्णय देशाच्या स्वातंत्र्याच्या दुसऱ्याच दिवशी घ्यायला हवा होता"
7
'आप'च्या थीम साँगवर निवडणूक आयोगाचा आक्षेप; आतिशी म्हणाल्या, "त्यांनी हुकूमशाही केली तर योग्य, आम्ही गाणं लिहिलं तर चूक"
8
IPL 2024 GT vs RCB : WHAT A BALL सिराज! अखेर शाहरूख खानच्या घातक खेळीचा अंत
9
सांगलीत विशाल पाटलांना धक्का; चंद्रहार पाटील यांच्या प्रचारात विश्वजीत कदम सक्रिय
10
पवार कुटुंबातील आपल्या बाजूने कोण? सुप्रिया सुळेंच्या बाजूने कोण? आणि तटस्थ कोण? अजितदादांनी सविस्तर सांगितलं
11
'काँग्रेसची मुघल विचारसरणी, त्यांना औरंगजेबाचे अत्याचार आठवत नाहीत', PM मोदींचा हल्लाबोल
12
"मला त्याच्याकडून एकच गोष्ट शिकायचीय", गंभीरची 'विराट' बॅटिंग; ट्रोलर्सला दिलं प्रत्युत्तर!
13
भारताला वर्ल्डकप जिंकून देणारे गॅरी कस्टर्न बनले पाकिस्तानचे प्रशिक्षक 
14
भांडुपमध्ये सव्वा दोन कोटींच्या रक्कमेने खळबळ; 'ते' पैसे बँकेचेच असल्याचे समोर
15
"मी कोणाच्या बापाला घाबरत नाही", छगन भुजबळ यांचा कडा प्रहार
16
Saumya Tandon : 'भाबीजी घर पर हैं' फेम अभिनेत्री सौम्या टंडन रुग्णालयात दाखल; प्रकृती बिघडल्याने फॅन्स चिंतेत
17
Gurucharan Singh : सोढीचं शेवटचं लोकेशन, ATM मधून काढले 7 हजार; गुरुचरण सिंग अचानक बेपत्ता, गूढ कायम
18
खळबळजनक! बाईक न मिळाल्याने पती झाला हैवान; पत्नीचा काढला काटा, 8 दिवसांपूर्वी झालेलं लग्न
19
SBI ची दमदार कामगिरी; एका आठवड्यात गुंतवणूकदारांची ₹45000 कोटींची कमाई
20
...तर परत मी लोकसभा निवडणूक लढवणार नाही; भोरमध्ये अजित पवारांची घोषणा

गुंठाभरही जमीन नसताना कर्जमाफीचा एसएमएस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 06, 2018 7:51 PM

गुंठाभरही जमीन नावावर नसलेल्या मजुराला कर्जमाफीची रक्कम बँक खात्यात जमा झाल्याचा एसएमएस मोबाईलवर प्राप्त झाला. मात्र बँकेत चौकशी केल्यावर खात्यात फक्त पूर्वीचेच अडीच हजार शिल्लक असल्याचे समजल्यावर आनंदावर विरजण पडले.

ठळक मुद्देश्रीगोंदा तालुक्यातील प्रकार

श्रीगोंदा : गुंठाभरही जमीन नावावर नसलेल्या मजुराला कर्जमाफीची रक्कम बँक खात्यात जमा झाल्याचा एसएमएस मोबाईलवर प्राप्त झाला. मात्र बँकेत चौकशी केल्यावर खात्यात फक्त पूर्वीचेच अडीच हजार शिल्लक असल्याचे समजल्यावर आनंदावर विरजण पडले.छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेतून कर्जमाफी मिळविण्यासाठी शेतकऱ्यांनी आॅनलाईन अर्ज केले. आधार कार्ड, बँक खाते, कर्जखाते आणि मोबाईल नंबर अशी सविस्तर माहिती अर्ज करताना घेतली. अर्ज दाखल करताना ग्रामीण शेतक-यांची चांगलीच ससेहोलपट झाली. एवढे सोपस्कार पार पाडल्यानंतरही कर्जमाफी योजनेचे अनेक किस्से ग्रामीण भागात घडत आहेत.श्रीगोंदा तालुक्यातील आढळगाव येथील मनोज भिमराव छत्तिसे यांना कर्जमाफीची रक्कम सेंट्रल बँकेच्या खात्यात जमा झाल्याचा एसएमएस मोबाईलवर आल्यानंतर त्यांना आश्चर्य वाटले. नावावर गुंठाभरही जमीन नाही त्यामुळे योजनेसाठी अर्जही केला नसताना रक्कम खात्यावर कशी जमा झाली ? असा प्रश्न त्यांना पडला. बँकेत चौकशी केल्यानंतर कसलीही रक्कम जमा झाली नसल्याचे समजले. कर्जमाफीचे अर्ज मागविताना सगळी प्रक्रिया आॅनलाईन करुनही माफी एकाला आणि एसएमएस भलत्यालाच असेही प्रकार झाले आहेत.

 

टॅग्स :AhmednagarअहमदनगरShrigondaश्रीगोंदाFarmerशेतकरी