शहरं
Join us  
Trending Stories
1
ठाण्यात ऐन निवडणुकीत ठाकरेंची शिवसेना अडचणीत; एम. के. मढवींना अटक
2
माजी पंतप्रधानांच्या नातवाचे अश्लिल व्हिडीओ व्हायरल; निवडणूक होताच खासदार देशातून फरार
3
'अरे! तुमचं डोकं फुटलंय की सिलिंडर...'; बेंगलोर ब्लास्टवरून पंतप्रधान मोदी काँग्रेसवर बरसले 
4
IPL 2024 GT vs RCB : साई 'सु'दर्शन! शाहरूखही चमकला; युवा भारतीय खेळाडूंनी RCB ला धू धू धुतले
5
NCB-ATS ची मोठी कारवाई, 600 कोटी रुपयांच्या 86 किलो ड्रग्जसह 14 पाकिस्तानींना अटक
6
Narendra Modi : "राम मंदिर बांधण्याचा निर्णय देशाच्या स्वातंत्र्याच्या दुसऱ्याच दिवशी घ्यायला हवा होता"
7
'आप'च्या थीम साँगवर निवडणूक आयोगाचा आक्षेप; आतिशी म्हणाल्या, "त्यांनी हुकूमशाही केली तर योग्य, आम्ही गाणं लिहिलं तर चूक"
8
IPL 2024 GT vs RCB : WHAT A BALL सिराज! अखेर शाहरूख खानच्या घातक खेळीचा अंत
9
सांगलीत विशाल पाटलांना धक्का; चंद्रहार पाटील यांच्या प्रचारात विश्वजीत कदम सक्रिय
10
पवार कुटुंबातील आपल्या बाजूने कोण? सुप्रिया सुळेंच्या बाजूने कोण? आणि तटस्थ कोण? अजितदादांनी सविस्तर सांगितलं
11
'काँग्रेसची मुघल विचारसरणी, त्यांना औरंगजेबाचे अत्याचार आठवत नाहीत', PM मोदींचा हल्लाबोल
12
"मला त्याच्याकडून एकच गोष्ट शिकायचीय", गंभीरची 'विराट' बॅटिंग; ट्रोलर्सला दिलं प्रत्युत्तर!
13
न्यूझीलंडच्या नव्या खेळाडूंनी पाकिस्तानला घाम फोडला; आफ्रिदीने कशीबशी लाज राखली
14
भारताला वर्ल्डकप जिंकून देणारे गॅरी कस्टर्न बनले पाकिस्तानचे प्रशिक्षक 
15
भांडुपमध्ये सव्वा दोन कोटींच्या रक्कमेने खळबळ; 'ते' पैसे बँकेचेच असल्याचे समोर
16
"मी कोणाच्या बापाला घाबरत नाही", छगन भुजबळ यांचा कडा प्रहार
17
Saumya Tandon : 'भाबीजी घर पर हैं' फेम अभिनेत्री सौम्या टंडन रुग्णालयात दाखल; प्रकृती बिघडल्याने फॅन्स चिंतेत
18
Gurucharan Singh : सोढीचं शेवटचं लोकेशन, ATM मधून काढले 7 हजार; गुरुचरण सिंग अचानक बेपत्ता, गूढ कायम
19
खळबळजनक! बाईक न मिळाल्याने पती झाला हैवान; पत्नीचा काढला काटा, 8 दिवसांपूर्वी झालेलं लग्न
20
SBI ची दमदार कामगिरी; एका आठवड्यात गुंतवणूकदारांची ₹45000 कोटींची कमाई

कोरोनामुळे कर्नाटकात अडकलेल्या महाराष्ट्रातील ३५ विद्यार्थ्यांची सुटका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 22, 2020 3:05 PM

कर्नाटकात शिक्षण घेत असलेल्या महाराष्ट्रातील सुमारे ३५ विद्यार्थ्यांना कोरोनामुळे मोठ्या अडचणींचा सामना करावा लागला. त्या ट्विटची माहिती मिळताच नगरविकास राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांनी तत्काळ सूत्रे हलवून सबंधित विद्यार्थ्यांना कर्नाटकात मदत पोहोचवून महाराष्ट्रात सुखरूप आणण्यास प्रयत्न केले.

सचिन नन्नवरे/ मिरी : कर्नाटकात शिक्षण घेत असलेल्या महाराष्ट्रातील सुमारे ३५ विद्यार्थ्यांना कोरोनामुळे मोठ्या अडचणींचा सामना करावा लागला. या विद्यार्थ्यांनी मदतीच्या अपेक्षेने ट्विटरच्या माध्यमातून महाराष्ट्र सरकारचे आपल्याकडे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला होता. त्या ट्विटची माहिती मिळताच नगरविकास राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांनी तत्काळ सूत्रे हलवून सबंधित विद्यार्थ्यांना कर्नाटकात मदत पोहोचवून महाराष्ट्रात सुखरूप आणण्यास प्रयत्न केले.कोरोना विषाणूच्या वाढत्या प्रादुभार्वामुळे कर्नाटकातील कलबुर्गी येथे देशातील पहिल्या रुग्णाचा मृत्यू झाला होता. त्यामुळे या विषाणूचे गांभीर्य लक्षात घेऊन कलबुर्गी येथील मध्यवर्ती विद्यापीठात शिक्षण घेणा-या सर्व विद्यार्थ्यांना विद्यापीठाने सुट्टी जाहीर करून वसतिगृह तत्काळ खाली करण्याच्या सूचना दिल्या होत्या. त्यामुळे त्या ठिकाणी शिकणाºया महाराष्ट्रातील सुमारे ३५विद्यार्थ्यांना तत्काळ घरी परतणे आवश्यक होते. परंतु तपासणी न करता प्रवास केल्यास संसर्ग होण्याची भीती असल्याने या विद्यार्थ्यांना प्रवास करण्यास मज्जाव करण्यात आला होता. त्यामुळे हे विद्यार्थी दुहेरी संकटात सापडले होते. परंतु त्याच ठिकाणी शिक्षण घेणाºया केरळ राज्यातील विद्यार्थ्यांसाठी केरळ सरकारने पथक पाठवून तपासणी करून घेऊन जाण्यासाठी वाहने पाठवली. त्यामुळे महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांना देखील राज्य सरकारकडून मदतीची अपेक्षा होती. त्यामुळे नागपूर येथील आशीर्वाद सत्यम या विद्यार्थ्याने ट्विटरवर पोस्ट करून महाराष्ट्र सरकारकडून मदतीची अपेक्षा व्यक्त केली. सदर पोस्टला मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंसह, आरोग्यमंत्री राजेश टोपे, पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे, मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांच्यासह खासदार सुप्रिया सुळे यांना टॅग करून माहिती दिली. सर्व विद्यार्थ्यांची केली तपासणीअखेर नगर येथील युवराज चव्हाण या युवकाने मदत व पुनर्वसन राज्यमंत्री प्राजक्त तनपुरेंना माहिती दिली. तनपुरे यांनी गांभीर्य लक्षात घेऊन तत्काळ सूत्रे हलवून सोलापूरच्या जिल्हाधिकाºयांच्या मार्गदर्शनाखाली एक पथक पाठवले. कर्नाटकात अडकलेल्या विद्यार्थ्यांची तपासणी करून विशेष वाहनांनी त्यांना सुखरूपपणे महाराष्ट्रातील सोलापूर जिल्ह्यात आणले. त्यानंतर राज्यातील नगर, वर्धा, नागपूर, पुणे, मुंबई, चंद्रपूर, सातारा, नांदेड व गडचिरोली जिल्ह्यातील या विद्यार्थ्यांना त्यांच्या घरी पोहोच केले. त्यामुळे संकटकाळी मदत केल्याबद्दल या सर्व विद्यार्थ्यांर्नी व त्यांच्या पालकांनी मंत्री तनपुरे यांचे आभार मानले.

टॅग्स :AhmednagarअहमदनगरPathardiपाथर्डीcorona virusकोरोना वायरस बातम्याKarnatakकर्नाटकStudentविद्यार्थी