शहरं
Join us  
Trending Stories
1
धमक्या कशाला देता? ४ जूनला जनताच तुम्हाला बघून घेईल - संजय राऊत
2
Sunita Kejriwal : "प्रत्येकजण हुकूमशाही हटवण्यासाठी आणि लोकशाही..."; सुनीता केजरीवाल यांचा रोड शो
3
काँग्रेसला मोठा धक्का; अरविंदर सिंग लवली यांचा राजीनामा
4
"रावणानं सीतेचं हरण केलं आणि नरेंद्र मोदी यांनी…” काँग्रेसच्या महिला नेत्याची बोचरी टीका
5
वर्षा गायकवाडांविरोधात कसं लढणार? उज्ज्वल निकम म्हणाले, ‘कोर्टात समोरच्याला…’
6
Sahil Khan : अभिनेता साहिल खानच्या अडचणीत वाढ; महादेव बेटिंग App प्रकरणी मुंबई पोलिसांची मोठी कारवाई
7
J P Nadda : "ही ममता बॅनर्जींची सर्वात मोठी चूक, तुम्ही बंगालचं काय केलं?"; जेपी नड्डा यांचा हल्लाबोल
8
नरेंद्र मोदी आज कर्नाटकात करणार वादळी प्रचार, दिवसभरात 4 सभांचे आयोजन
9
'आम्ही नरेंद्र मोदींचं तुतारी वाजवून स्वागत करू', पुण्यातील सभेवरून सुप्रिया सुळे यांचा टोला
10
‘अमित शाह, योगी आदित्यनाथ यांनी कोकणात यायच्या भानगडीत पडू नये, इथे आल्यास…’, भास्कर जाधव यांचा इशारा
11
"ते म्हणतात की, मी अपवित्र आहे, कारण...", कंगनाचा विक्रमादित्य यांच्यावर जोरदार हल्लाबोल
12
सांगलीच्या ‘करेक्ट’ कार्यक्रमामुळे राष्ट्रवादी काॅंग्रेसची घसरगुंडी !
13
प्रचाराच्या रणधुमाळीदरम्यान मुंबईतील भांडुपमधून तीन कोटींची रोकड जप्त, तपास सुरू
14
महायुतीची डोकेदुखी वाढली, पाच जागांचा तिढा कायम; आपसांतच रस्सीखेच
15
आजचे राशीभविष्य - २८ एप्रिल २०२४, सार्वजनिक जीवनात मान-प्रतिष्ठा वाढेल
16
आमिरला पहिल्या पत्नीने लगावली होती कानशिलात, नेमकं काय घडलं होतं? अभिनेत्याने केला खुलासा
17
ईश्वराप्पा यांच्या बंडाने शिवमोग्गात लढत रंगतदार; पक्षातून सहा वर्षासाठी हकालपट्टी
18
राज्यात पारा चाळिशी पार; मुंबई ३६, तर ठाणे ४१, उष्माघाताच्या रुग्णांची संख्या १८४ वर
19
या झोपडीत राहतो लोकसभेचा उमेदवार, रावेरमधून लढणार; लोकांनी वर्गणी काढून भरले डिपॉझिट
20
राजस्थान रॉयल्सची प्ले ऑफमधील जागा निश्चित! संजू सॅमसन, ध्रुव जुरेल यांची मॅच विनिंग खेळी 

गुगल मॅपच्या आधारे जाणारी कार गेली धरणात!

By ऑनलाइन लोकमत | Published: January 11, 2021 2:25 AM

कार चालकाचा मृत्यू, दोघे बचावले

लोकमत न्यूज नेटवर्ककोतूळ (जि. अहमदनगर) : गुगल मॅपच्या अधारे प्रवास करताना रस्त्याचा अंदाज न आल्याने कार सरळ धरणाच्या पाण्यात बुडाली. त्यामधील दोघे वाचले, तर कार चालकाचा बळी गेला. कोतूळ येथील पूल पिंपळगाव खांड धरण पाण्यात असल्याचे चालकाच्या लक्षात आले नाही. 

शनिवारी रात्री पुणे येथील एमटीयू कंपनीचे मालक गुरू सत्याराज शेखर व मित्र समीर सुधीर राजूरकर, चालक सतीश घुले (औरंगाबाद) हे कारने कळसूबाईकडे निघाले होते. मात्र, कोतुळात आल्यावर गुगल मॅपवर कोतूळ-राजूर-कळसुबाई असा राज्यमार्गाचा रस्ता असताना  गुगल मॅपवर  कोतूळ ते  अकोले असे दाखवल्याप्रमाणे  पर्यटक  रात्री पावणेदोन वाजता कोतूळ पुलाच्या रस्त्याने निघाले. पावसाने रस्ता ओला असल्याने पाण्याचा अंदाज आला नाही.  त्यात समोर पूल पाण्याखाली असल्याचा कोणताही फलक अथवा गुगलवर पूल पाण्याखाली असल्याची सूचना  नसल्याने ते सरळ पिंपळगाव खांड धरणाच्या पाण्यात गेले. कार बुडू लागताच तिघेही खिडक्यांतून बाहेर आले. समीर राजूरकर व गुरू शेखर यांना पोहता येत असल्याने ते कडेला आले. चालक सतीश घुले यास पोहता येत नसल्याने तो पाण्यात बुडाला.अचानक अपरात्री आरडाओरडा झाल्याने जवळच असलेल्या पेविंग ब्लॉक कंपनीचे कामगार जागे झाले. त्यांनी मालक बाळासाहेब घाटकर, संतोष देशमुख, अरविंद देशमुख यांना कळविले.  कोतूळ पोलीस स्टेशनचे सुनील साळवे तातडीने घटनास्थळी दाखल झाले. स्थानिक पोहणारे घुले यांचा शोध घेत आहेत.  संगमनेरचे पोलीस निरीक्षक मुकुंद देशमुख, अकोलेचे पोलीस उपनिरीक्षक दीपक ढोमणे घटनास्थळी दाखल झाले आहेत.

टॅग्स :carकारgoogleगुगलAccidentअपघात