शहरं
Join us  
Trending Stories
1
उमेदवारी अर्ज मागे घेऊन काँग्रेस उमेदवार भाजपत; तिसऱ्या जागी विजय निश्चित
2
गोवंडीत महायुतीचे उमेदवार मिहिर कोटेचा यांच्या प्रचार रॅलीवर दगडफेक; अज्ञातांवर गुन्हा
3
धक्कादायक! कोरोनावरील या लसीमुळे होऊ शकतात साईड इफेक्ट्स, कंपनीने स्वत:च दिली कबुली    
4
कार्यकर्तेच ठरविणार विजयाचा गुलाल...! शाहू छत्रपती आणि मंडलिक लढतीकडे महाराष्ट्राचे लक्ष
5
एआयद्वारे फेक व्हिडीओ; अघटित घडविण्याचा डाव; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा विराेधकांवर हल्लाबाेल
6
सेक्स स्कँडल : प्रज्वलची पक्षातून हकालपट्टी; माजी पंतप्रधान देवेगौडांचे कुटुंब आरोपांनी घेरले
7
भाजप व रा. स्व. संघाची संविधान बदलण्याची योजना : राहुल गांधी
8
तीन विधानसभा निवडणुकीत मतांची टक्केवारी घसरली, तरीही राज ठाकरे महायुतीला का हवे आहेत?
9
पारा वाढता वाढे, देशभरात उकाडा; वाढत्या तापमानाने नागरिक हैराण, राज्यातही उष्णता वाढणार
10
राहुल शेवाळे यांच्या स्थावर मालमत्तेत सात कोटींची वाढ; २०१९'ला स्थावर मालमत्ता नसल्याचे नमूद होते
11
अरविंद सावंत यांच्याकडे एकच कार; संपत्ती पाच वर्षांत दुप्पट
12
अनिल देसाई यांच्या मालमत्तेत पावणेतीन कोटींची वाढ; स्थावर मालमत्तेत वाढ नाही
13
कांद्याची फसवी फाेडणी; सरकारचे शेतमाल निर्यातीचे धाेरण नेहमीच ग्राहकहिताचे
14
१८% ‘कलंकित’; २९% कोट्यधीश; तिसऱ्या टप्प्यातील १,३५२ उमेदवारांकडे आहे ५.७७ कोटींची सरासरी संपत्ती
15
मुख्यमंत्री खूप दिवस गैरहजर राहू शकत नाहीत; विद्यार्थ्यांचे हक्क पायदळी तुडवता येणार नाहीत; दिल्ली हायकोर्ट
16
राजन विचारे यांच्या मालमत्तेत ११ कोटींची वाढ; रत्नागिरी जिल्ह्यात शेतजमीन
17
नागपूर विमानतळ उडविण्याची धमकी; ई-मेलनंतर प्रशासन अलर्ट मोडवर; सुरक्षा व्यवस्थेत वाढ
18
‘ठाण्या’चे नाक दाबून तीन मतदारसंघ भाजपने घेतले सोडवून
19
"सुप्रिया बाहेरची असण्याचं कारण नाही, मी बारामतीत ज्या घरात राहतो ते तिचंच"; शरद पवारांनी स्पष्टच सांगितलं
20
भाजप नेते दुष्यंत गौतम यांच्या कारला अपघात, मणक्याला दुखापत

बैलगाडा शर्यतींना विरोध; अहमदनगरमध्ये कटारिया यांच्या घरासमोर बैलासह शेतक-यांचे आंदोलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 25, 2017 3:18 PM

अहमदनगर : बैलगाडा शर्यतींना विरोध करीत उच्च न्यायालयात याचिका दाखल करणा-या प्राणी मित्र अनिल कटारिया यांच्या घरासमोर बुधवारी अखिल भारतीय बैलगाडा संघटनेच्यावतीने बैलांसह आंदोलन सुरु केले आहे. कटारिया यांच्या घरासमोर बैलगाडा संघटनेच्यावतीने बैलं आणून बांधण्यात आली आहेत.नुकतीच राज्य सरकारने बैलगाडा शर्यतींना परवानगी दिली. या अध्यादेशावर राष्ट्रपतींनी सही केली. मात्र, कटारिया यांनी प्राणी ...

अहमदनगर : बैलगाडा शर्यतींना विरोध करीत उच्च न्यायालयात याचिका दाखल करणा-या प्राणी मित्र अनिल कटारिया यांच्या घरासमोर बुधवारी अखिल भारतीय बैलगाडा संघटनेच्यावतीने बैलांसह आंदोलन सुरु केले आहे. कटारिया यांच्या घरासमोर बैलगाडा संघटनेच्यावतीने बैलं आणून बांधण्यात आली आहेत.नुकतीच राज्य सरकारने बैलगाडा शर्यतींना परवानगी दिली. या अध्यादेशावर राष्ट्रपतींनी सही केली. मात्र, कटारिया यांनी प्राणी संरक्षणाचा मुद्दा उपस्थितीत करीत राज्य सरकारच्या या निर्णयाला उच्च न्यायालयात आव्हान दिले. उच्च न्यायालयाने सरकारच्या या निर्णयाची अंमलबजावणी करु नये, असे आदेश दिले आहेत. त्यामुळे राज्यात बैलगाडा शर्यत बंदी कायम राहिली आहे, असे अखिल भारतीय बैलगाडा संघटनेचे अध्यक्ष रामकृष्ण टाकळकर, विश्वनाथ कोरडे, अंकुश ठुबे, निलेश लंके, गोरख पठारे, बळीराम पायमोडे आदींचे म्हणणे आहे. त्यामुळे त्यांनी कटारिया यांच्या घरासमोर मोठ्या प्रमाणात बैलं आणून बांधली आहेत. तसेच कटारिया यांच्याविरोधात घोषणाबाजी सुरु आहे. या आंदोलनात पारनेर तालुक्यासह नगर जिल्ह्यातील विविध भागातून आलेले बैलगाडा मालक व शेतकरी सहभागी झाले आहेत.दिल्ली गेट परिसरातील शनि मंदिरामागे कटारिया यांचे घर आहे. तेथे हे आंदोलन सुरु आहे. दरम्यान कटारिया हे घरी नसल्यामुळे त्यांच्यासोबत आंदोलकांचे फोनवरुन चर्चा सुरु आहे. या चर्चेला जिल्हा परिषदेचे माजी सदस्य सचिन जगताप, नगरेसवक गणेश कवडे यांच्यासह बैलगाडा संघटनेचे पदाधिकारी चर्चा करीत आहेत. डीवासएसपी अक्षय शिंदे हेही पोलीस फौजफाट्यासह आंदोलनस्थळी पोहोचले आहेत.

टॅग्स :AhmadnagarअहमदनगरFarmerशेतकरीHigh Courtउच्च न्यायालयMaharashtra Governmentमहाराष्ट्र सरकार