शहरं
Join us  
Trending Stories
1
Monsoon Update : केरळात मान्सून कधी येणार? हवामान विभागाने दिली मोठी अपडेट, तारीख सांगितली
2
४ जूननंतर पुन्हा एकदा उबाठा, शरद पवारांचा पक्ष फुटणार; भाजपा नेत्याचा दावा
3
आता कोव्हॅक्सिनचे साईड इफेक्ट्स समोर आले; केस गळती, त्वचा विकार आणि मासिक पाळीच्या समस्या...
4
विकासाची ब्ल्यू प्रिंट तयार, तरुणांनी पाठवाव्या आयडिया, २०४७ पूर्वीच...; PM मोदींचा निर्धार
5
VIDEO: १६० किमी वेग असताना सुरु केलं इन्स्टाग्राम लाईव्ह; मुंबईला येताना अपघातात कारचा चेंदामेंदा
6
मुंबई विमानतळाचा बडा अधिकारी, अमेरिकेतून मुलगा फोन लावत होता, उचलेना; घाटकोपरच्या होर्डिंगखाली पती-पत्नी सापडले
7
आजचे राशीभविष्य १६ मे २०२४; उत्तम वस्त्रे, दागिने, वाहन प्राप्ती होण्याची शक्यता
8
२३ दिवस उलटूनही 'तारक मेहता' फेम सोढीचा काहीच पत्ता नाही, वडील म्हणाले- "मुलाची वाट पाहून..."
9
इंदूरमध्ये रात्री उशिरा भीषण अपघात, पार्क केलेल्या डंपरला कार धडकली, ८ जण ठार
10
दहावी पास लेकाची कमाल; वडिलांचा डबघाईला आलेला उद्योग मालामाल, ३ हजार कोटींची उलाढाल
11
₹४३ कोटींच्या वेतन घेणाऱ्या व्यक्तीवर अझीम प्रेमजींच्या Wipro नं केला ₹२५ कोटींचा खटला; काय आहे प्रकरण?
12
कांदा, द्राक्ष उत्पादकांसाठी केंद्राचे झुकते माप: PM मोदी, ‘ऑपरेशन ग्रीन’ पुन्हा राबविणार
13
पक्ष सांभाळू शकत नाहीत, ते देश काय सांभाळणार? PM नरेंद्र मोदी, ‘रोड शो’मधून शक्तिप्रदर्शन
14
कल्याण शहर झाले ‘नरेंद्र मोदी’मय; जयघोष, जल्लोष, सेल्फी पॉइंट अन् बरेच काही...
15
दोन पक्ष संपवण्याच्या प्रयत्नात भाजपलाच संपवले: आदित्य ठाकरे, लोकमतला खास मुलाखत
16
पंतप्रधान मोदींच्या मुंबई दौऱ्यात उपमुख्यमंत्री अजित पवार गैरहजर; चर्चांना उधाण
17
मुंबईला आर्थिकदृष्ट्या कमजोर करण्याचा भाजपाचा प्रयत्न आहे; आदित्य ठाकरे यांची टीका
18
२६/११च्या खटल्यात कोणी दबाव आणला होता का? उज्ज्वल निकम यांनी सांगावे: प्रकाश आंबेडकर
19
वाहतूककोंडीवर काढणार कायमस्वरुपी तोडगा; प्रचार फेरीत पीयूष गोयल यांची ग्वाही
20
घाटकोपर होर्डिंग प्रकरण: ‘व्हीजेटीआय’ची नियुक्ती, भिंडेच्या शोधासाठी ७ तपास पथके

भाजपाचे आमदार शिवाजी कर्डिले यांच्या पोलीस कोठडीत २ दिवसांची वाढ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 10, 2018 5:29 PM

पोलीस अधीक्षक कार्यालयाच्या तोडफोड प्रकरणी अटकेत असलेले भाजपाचे आमदार शिवाजी कर्डिले यांच्या पोलीस कोठडीत २ दिवसांची वाढ करण्यात आली आहे. तसेच याप्रकरणी अटकेत असणा-या २२ कार्यकर्त्यांना न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. कर्डिले यांना १२ एप्रिलपर्यत पोलीस कोठडीत वाढ करण्यात आली आहे. याप्रकरणी कर्डिले यांच्याविरोधात भा.द.वि.३०८ हे कलम (सदोष मनुष्यवधाचा प्रयत्न करणे) वाढविण्यात आले आहे.

अहमदनगर -  पोलीस अधीक्षक कार्यालयाच्या तोडफोड प्रकरणी अटकेत असलेले भाजपाचे आमदार शिवाजी कर्डिले यांच्या पोलीस कोठडीत २ दिवसांची वाढ करण्यात आली आहे. तसेच याप्रकरणी अटकेत असणा-या २२ कार्यकर्त्यांना न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. कर्डिले यांना १२ एप्रिलपर्यत पोलीस कोठडीत वाढ करण्यात आली आहे. याप्रकरणी कर्डिले यांच्याविरोधात भा.द.वि.३०८ हे कलम (सदोष मनुष्यवधाचा प्रयत्न करणे) वाढविण्यात आले आहे.केडगाव दुहेरी हत्याकांड प्रकरणी आमदार संग्राम जगताप यांना पोलिसांनी ताब्यात घेतल्यानंतर शनिवारी रात्री राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी पोलीस अधीक्षक कार्यालयाची मोडतोड केली. या प्रकरणी भाजपाचे आमदार शिवाजी कर्डिले यांना सोमवारी अटक करण्यात आले होते. न्यायालयाने त्यांना १० एप्रिलपर्यत पोलीस कोठडी सुनावण्यात आली होती. त्याची मुदत आज संपल्याने कर्डिले यांना आज दुपारी साडेचार वाजण्याच्या सुमार कर्डिले यांना न्यायालयात हजर करण्यात आले होते. त्यानंतर न्यायालयाने पोलीस कोठडीत वाढ केली.याप्रकरणी राष्ट्रवादी कॉग्रेसच्या अडीचशे ते तीनशे कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला असून २२ कार्यकर्त्यांना आतापर्यत पोलीसांनी अटक केली होती. त्यानंतर या आरोपींना रविवारी न्यायालयात हजर केल्यानंतर १० एप्रिलपर्यत पोलीस कोठडी देण्यात आली होती. ही मुदत संपल्यानंतर आज सर्व जणांना न्यायालयात हजर करण्यात आले. याप्रकरणी अटक असलेल्या कैलास गिरवले, शरिफ शेख, राहुल अरुण चिंतामण, अ?ॅड. प्रसन्न जोशी, सय्यद अकबर, आवेश शेख, सय्यद असिफ, सागर वाव्हळ, संजय वाल्हेकर, अनिल राऊत, अनिकेत चव्हाण, गिरीष गायकवाड, दिपक गाडीलकर, रियाज तांबोळी, दत्ता उगले, कुणाल घोलप, साईनाथ लोखंडे, सचिन गवळी, सोमनाथ गाडेकर, संतोष सुर्य वंशी, धर्मा करांडे, इम्रान शेख यांना न्यायालयात हजर करण्यात आले होते. या सर्वांची न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यात आली. याप्रकरणी सुरेश बनसोडे व सागर पंधाडे यांनाही अटक करण्यात आली आहे.याशिवाय याप्रकरणी दादाभाऊ कळमकर, सचिन अरुण जगताप, अभिजित कळमकर, बाबासाहेब गाडळकर, अभिजित खोसे, कुमार वाकळे, निखिल वारे, दादा दरेकर, गजानन भांडवलकर, मुसा सादीक शेख, सागर ठोंबरे, घनश्याम बोडखे, मतीन सय्यद, सागर डोंगरे, अफजल शेख, कुलदीप भिंगारदिवे, बबलू सुर्यवंशी, विशाल सुर्यवंशी, सुनिल त्रिंबके, दत्ता तापकीरे, अंकुश चत्तर, वैभव वाघ, सादीक अब्दुल रौफ सय्यद, मुस्सदीक सादीक सय्यद, अवधूत जाधव, राजेश परकाळे, धीरज उकीर्डे, मयूर कुलथे यांच्यावर गुन्हा दाखल आहे.आमदार संग्राम जगताप यांना चौकशीसाठी शनिवारी रात्री पोलीस अधीक्षक कार्यालयात आणले असताना राष्ट्रवादी मोठ्या संख्येने कार्यकर्ते कार्यालयात दाखल झाले. या कार्यकर्त्यांनी पोलीस अधीक्षक कायार्लायवर दगडफेक करुन, कार्यालयाचे दरवाजे लाकडी दांडक्याने तोडून सार्वजनिक मालमत्तेचे नुकास करुन अनधिकृतरित्या कार्यालयात प्रवेश केला व बंदोबस्तासाठी असलेले पोलीस अधिकारी, कर्मचारी व महिला पोलीस कर्मचारी यांना शिवीगाळ करुन धक्काबुक्की करत सरकारी कामात अडथळा निर्माण केला होता.

 

टॅग्स :AhmednagarअहमदनगरShivaji Kardileyआ. शिवाजी कर्डिलेKedgoan double murderकेडगाव दुहेरी हत्याकांडPoliceपोलिसSangram Jagtapआ. संग्राम जगतापArun Jagtapआ. अरुण जगताप