शहरं
Join us  
Trending Stories
1
कोलकाता नाईट रायडर्सचा सहज विजय; दिल्ली कॅपिटल्सचे Play Off चे स्वप्न अधांतरी
2
"सुप्रिया बाहेरची असण्याचं कारण नाही, मी बारामतीत ज्या घरात राहतो ते तिचंच"; शरद पवारांनी स्पष्टच सांगितलं
3
भाजप नेते दुष्यंत गौतम यांच्या कारला अपघात, मणक्याला दुखापत
4
जय शाह T20 WC साठीचा भारतीय संघ फायनल करणार, अजित आगरकर लिस्ट घेऊन अहमदाबादला 
5
मुंबई उत्तर पूर्वमध्ये वादाची ठिणगी; मिहीर कोटेचा यांच्या प्रचार रॅलीवर दगडफेक केल्याचा आरोप, पोलिसांत तक्रार
6
अस्वस्थ झालेल्या सत्ताधाऱ्यांकडून वैयक्तिक आरोप; सामान्य मतदारांना EVM वर शंका- शरद पवार
7
स्वप्न पूर्ण न झालेले आत्मे देशाला अस्थिर करत आहेत; PM मोदींचा नाव न घेता पवारांवर निशाणा
8
पुण्यात महायुतीच्या उमेदवारांसाठी मोदींची सभा; मंचावर दिसले मनसे नेते अमित ठाकरे
9
रिषभ पंतच्या निर्णयाने दिल्लीच्या पायावर धोंडा! पण, कुलदीप यादवने चोपल्या सर्वाधिक धावा
10
"भाजप भयभीत, UCC मुळे हिंदूंना…"; ममता बॅनर्जी यांचा केंद्र सरकारवर निशाणा
11
वातावरण विरोधात जातंय हे पाहून देवेंद्र फडणवीसांनी...; जयंत पाटलांचा गंभीर आरोप
12
187 रुपयांच्या आईस्क्रीमसाठी Swiggy ला मोजावे लागले 5 हजार रुपये; जाणून घ्या काय आहे प्रकरण?
13
ओला कॅब्सचे सीईओ हेमंत बक्षी यांचा राजीनामा; 10 टक्के कर्मचाऱ्यांना काढून टाकण्याची तयारी
14
गुजरातमध्ये सर्वात श्रीमंत उमेदवार कोण? एकाकडे तर केवळ २ हजार रूपयांची संपत्ती
15
सुरेश रैनाने T20 World Cup 2024 साठी निवडला परफेक्ट संघ; गोलंदाजीत अनपेक्षित निवड
16
"मी जिवंत असेपर्यंत काँग्रेसला..."; पंतप्रधान मोदींनी साताऱ्याच्या सभेत विरोधकांना भरला सज्जड दम
17
'रामायण' साठी ही डिझायनर जोडी फायनल, संजय लीला भन्साळींशी आहे कनेक्शन
18
उद्धव ठाकरेंना शरद पवारांनी राजीनामा द्यायला लावला, राऊतांचा पाठिंबा होता; शिंदे गटाचा दावा
19
T20 World Cup 2024 साठी टीम इंडियाचा उपकर्णधार कोण? मोठी अपडेट समोर
20
VIDEO : 'लेव्हल सबके निकलेंगे' मधील व्हायरल मुलगी खरंच कोट्यधीश झाली का?

कवडीमोल भावामुळे १५०० किलो कांद्याचे फुकटात केले वाटप; नेवाशात शेतकऱ्याचे अजब आंदोलन

By ऑनलाइन लोकमत | Published: December 10, 2018 5:25 AM

‘फुकट कांदे, फुकट कांदे’... अशी आरोळी ऐकून ग्राहकांची झुंबड; मुख्यमंत्री निधीसाठी ठेवली दानपेटी

नेवासा (जि. अहमदनगर) : योग्य भाव मिळत नसल्याने पुनतगाव येथील शेतकºयाने राज्य सरकारचा निषेध करीत नेवाशाच्या आठवडे बाजारात १,५०० किलो उन्हाळ कांद्याचे मोफत वाटप केले. मुख्यमंत्री निधीसाठी दानपेटी तयार करून त्यात दान टाकावे, असे आवाहनही करण्यात आले होते. मोफत कांदा घेण्यासाठी एकच झुंबड उडाली होती. काहींनी पाच-दहा रुपये दानपेटीमध्ये टाकले.पोपटराव वाकचौरे यांनी नेवासा खुर्द जिल्हा परिषद शाळेच्या प्रवेशद्वारासमोर चारचाकी वाहनावर ‘मोफत कांदा’ असा फलक लावलेला होता. ते ‘फुकट कांदे, फुकट कांदे’, अशी आरोळी देत होते. त्यांनी आणलेला तब्बल १,५०० किलो कांदा अर्ध्या तासात संपला.यापूर्वी सातारा बाजार समितीत साडेचारशे किलो कांदा विकल्यानंतर वाहतूक व हमालीचे पैसे देऊन रामचंद्र जाधव या शेतकºयाच्या हाती काहीच शिल्लक राहिले नव्हते. उलट त्यांना व्यापाºयालाच जास्तीचे पाच रुपये देण्याची वेळ आली होती.‘मोफत कांदा’ फलक : चार वर्षांपासून शेतमालाला योग्य बाजारभाव मिळत आहे. त्यामुळे आम्ही शेतकरी बांधव खूश आहोत. त्यानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे जाहीर अभिनंदन. प्रत्येक व्यक्तीस पाच किलो कांदा मोफत, असा उपरोधिक मजकूर वाकचौरे यांनी ‘मोफत कांदा’ या फलकावर लिहिला होता.एक व दीड रुपया किलो, असा भाव निघाल्याने हवालदिल झालो. शासनाकडून शेतकऱ्यांची क्रूर चेष्टा सुरू आहे. एक लीटर पाण्याच्या बाटलीला तुम्ही वीस रुपये देता. मात्र आम्हा शेतकऱ्यांच्या पिकाला कवडीमोल भाव देऊन देशोधडीला लावण्याचा प्रयत्न सुरू आहे.- पोपटराव वाकचौरे, शेतकरीफुकट वाटपासाठी १३ हजारांचा भुर्दंडकांदा उत्पादनासाठी एकरी ८० हजारांपर्यंत खर्च झाला. एका एकरात १२ टन उत्पादन झाले. त्यामधील दीड टन कांद्याचे मोफत वाटप केले. त्याचा उत्पादन खर्च अंदाजे १० हजार रुपये, कांद्यासाठी वापरण्यात आलेल्या ३० गोण्यांचे ९०० रुपये, कांदा भरण्यासाठी२५ रुपये गोणीप्रमाणे ७५० रुपये, नेवाशापर्यंत वाहतूक खर्च ५०० रुपये, बनविण्यात आलेल्या फलकाची किंमत ४०० रुपये होती. असा एकूण १२ हजार ८५० रुपये खर्च झाल्याचे वाकचौरे यांनी सांगितले.

टॅग्स :onionकांदाFarmerशेतकरीAhmednagarअहमदनगरDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीस