शहरं
Join us  
Trending Stories
1
Priyanka Gandhi : "माझ्या भावाला राजपुत्र म्हणतात...; नरेंद्र मोदी हे सम्राट, महालात राहतात", प्रियंका गांधी कडाडल्या
2
रोहित शर्माचे काल प्लेइंग इलेव्हनमध्ये नसणे ही भारतासाठी डोकेदुखी; MI ने सांगितलं टेंशन वाढवणारं कारण
3
"अरविंद केजरीवालांनी वाराणसीतून नरेंद्र मोदींच्या विरोधात निवडणूक लढवावी"; सपा नेत्याची मागणी
4
मला धमक्या देऊ नका, मी मनात आणलं तर..., नारायण राणे यांचा उद्धव ठाकरेंना इशारा
5
पाकिस्तानच्या माजी मंत्र्यांकडून दुसऱ्यांदा राहुल गांधींचं कौतुक; भाजपानं घेरलं
6
IPL 2024 मधील दोन भारतीय स्टार गोलंदाज स्पर्धेत आता पुढे कदाचित नाही खेळू शकणार 
7
NSE Share : एकावर ४ बोनस शेअर्स, ९०००% डिविडंड; 'या' एक्सचेंजनं गुंतवणूकदारांना दिलं डबल गिफ्ट
8
"हार्दिक पांड्याबद्दल आदर दिसत नाही", इरफान पठाणकडून MI च्या कॅप्टनची बिनपाण्याने धुलाई
9
सलमान खान फायरिंग प्रकरणात आत्महत्या करणाऱ्या आरोपीच्या कुटुंबाची मुंबई उच्च न्यायालयात धाव, सीबीआय चौकशीची मागणी
10
T20 World Cup : यजमान विडिंजने उतरवला तगडा संघ; IPL गाजवणाऱ्यांना संधी, नवे चेहरेही मैदानात!
11
रोहित शर्माबद्दल 'ती' अफवा पसरवली; आकाश चोप्रा भडकला, दिली संतप्त प्रतिक्रिया
12
कांदा निर्यातबंदी उठवण्याच्या निर्णयावर काँग्रेसची टीका, बाळासाहेब थोरात म्हणाले...
13
Kotak Mahindra Bank Q4: नफा वाढून ४१३३ कोटींवर, व्याजातून होणारी कमाई १३.३% वाढली
14
शुबमनने हरलीनला दिले क्रिकेटचे धडे; महिला क्रिकेटपटूसाठी गिल बनला कोच, Video
15
दुबईहून कपड्यात लपवून आणलं २५ किलो सोनं; अफगाणिस्तानच्या बड्या अधिकाऱ्याला पकडलं
16
Income Tax नियमांमध्ये बदल होणार आहेत का? शेअर बाजारही आपटला; अर्थमंत्र्यांनी दिली प्रतिक्रिया
17
T20 World Cup साठी अमेरिकेचा संघ जाहीर; भारताच्या विश्वविजेत्या कर्णधाराला डच्चू
18
एल्विश यादव पुन्हा अडचणीत! सापाचं विष प्रकरणानंतर आता मनी लॉड्रिंग केस, ED करणार चौकशी
19
Ravi Pradosh 2024: कोर्ट कचेऱ्या आणि कौटुंबिक वादातून सुटका मिळावी म्हणून करा रवी प्रदोष व्रत!
20
केंब्रिजमधून M. Phil, राहण्यासाठी घर नाही, स्वत:ची कारही नाही, एवढी आहे राहुल गांधींची संपत्ती 

नगरमध्ये युती की घोडेबाजार?

By ऑनलाइन लोकमत | Published: December 11, 2018 2:01 AM

महापालिका निवडणुकीत कोणत्याच पक्षाला बहुमत न मिळाल्याने शिवसेना-भाजपा ही नैसर्गिक युती पुन्हा साकारणार की सत्तेचा घोडेबाजार रंगणार याबाबत उत्सुकता आहे.

- सुधीर लंके अहमदनगर : महापालिका निवडणुकीत कोणत्याच पक्षाला बहुमत न मिळाल्याने शिवसेना-भाजपा ही नैसर्गिक युती पुन्हा साकारणार की सत्तेचा घोडेबाजार रंगणार याबाबत उत्सुकता आहे. युतीतील भांडणाचा फायदा राष्ट्रवादी काँग्रेस उठविण्याची शक्यताही व्यक्त होत आहे. काँग्रेस व छोट्या पक्षांनाही प्रचंड महत्त्व आले आहे.महापालिकेत ६८ जागा असून बहुमतासाठी ३५ जागांची आवश्यकता आहे. शिवसेना (२४) व भाजपा (१४) एकत्र आल्यास त्यांचे संख्याबळ ३८ वर पोहोचून त्यांची सहजासहजी सत्ता स्थापन होऊ शकते. मात्र, सेना-भाजपामध्ये येथे विस्तवही जात नाही. सेनेचे नेते माजी आमदार अनिल राठोड व भाजपाचे खासदार दिलीप गांधी हे एकमेकांचे कट्टर विरोधक बनले आहेत. राठोड यांना शहरात ‘भैय्या’ म्हणून ओळखले जाते. त्यांनी नगरच्या दहशतीचा मुद्दा सातत्याने उपस्थित केला असून प्रत्येक निवडणुकीत ते ‘भयमुक्त नगर’ ही घोषणा देतात. गांधी यांनी त्यांच्यावर टीका करताना ‘नगर शहर भयमुक्त करण्यापेक्षा भैयामुक्त करावयाचे आहे’ असे विधान निवडणुकीत केले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही ‘भयमुक्तीची घोषणा करणाऱ्यांचेच या शहराला भय असून त्यांनाही आम्ही आत घालू शकतो’ असा इशारा प्रचार सभेत दिला होता. त्यामुळे राठोड हे भाजपाला सहजासहजी सोबत घेतील अशी परिस्थिती नाही. निकालानंतर प्रतिक्रिया देताना देखील राठोड, गांधी यांनी एकमेकावर टीका केली. त्यामुळे पक्षश्रेष्ठींनी आदेश दिल्यासच स्थानिक नेते एकत्र येऊ शकतात.राष्ट्रवादी (१८) व काँग्रेस (५) मिळून ही आघाडी २३ जागांवर पोहोचते. त्यांना बहुमतासाठी १२ जागा कमी पडतात. बसपाचे चार, अपक्ष दोन व समाजवादी पक्षाच्या एका उमेदवाराने त्यांना साथ दिली तरी त्यांचे संख्याबळ ३० च्या पुढे जात नाही. त्यामुळे त्यांना सत्ता स्थापन करावयाची असल्यास सेना, भाजपापैकी कुणाचीतरी साथ घेणे क्रमप्राप्त आहे. मात्र, शिवसेना व राष्ट्रवादी यांच्यात शहरात तात्विक मतभेद असून शिवसेनेने राष्टÑवादीला आजवर उघड साथ केलेली नाही. सेनेने सातत्याने राष्ट्रवादीवर आरोप केलेले असल्याने या दोघांनी एकमेकांसोबत जाणे हे विरोधाभास दर्शविणारे ठरेल. हे दोन्ही पक्ष एकमेकाची छुपी साथ करतात मात्र, उघडपणे एकमेकांची साथ करतील का?, ही शंका आहे.पक्षीय बलाबलपक्ष                  २०१३      २०१८शिवसेना            १७          २४भाजपा               ०९          १४राष्ट्रवादी             १८          १८काँग्रेस               ११           ०५मनसे                ०४           ००बसपा               ००           ०४समाजवादी       ००           ०१अपक्ष               ०९           ०२शिवसेना-काँग्रेस एकत्र येणार?नगर शहरात विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे यांचे चिरंजीव सुजय विखे हे सध्या काँग्रेसचे नेतृत्व करत आहेत.राष्ट्रवादीला दूर ठेवत काँग्रेसने सेनेसोबत हातमिळवणी केली व इतर छोट्या पक्षांना त्यांनी सोबत घेतले तर त्यातूनही बहुमत साकारु शकते.विखे हे फोडाफोडीचे राजकारण करु शकतात. त्यामुळे काँग्रेस व छोट्या पक्षांच्या हातीही सत्तेच्या चाव्या आहेत.

टॅग्स :Ahmednagar Municipal Electionअहमदनगर महानगरपालिका निवडणूकcongressकाँग्रेसBJPभाजपाShiv SenaशिवसेनाNCPराष्ट्रवादी काँग्रेस