The accused came home due to corona and was found by the police | कोरोना इम्पॅक्ट; बलात्कारातील फरार आरोपी घरी आला, पोलिसांच्या तावडीत सापडला!

कोरोना इम्पॅक्ट; बलात्कारातील फरार आरोपी घरी आला, पोलिसांच्या तावडीत सापडला!

ठळक मुद्देशेंगाळ याच्यावर घारगाव पोलीस ठाण्यात २०१३ मध्ये अत्याचाराचा गुन्हा दाखल झाला होता.कोरोना साथीच्या प्रादुर्भावामुळे मात्र हा आरोपी त्याचे मूळ गाव असलेल्या शेंगाळवाडी येथे आला होता.

अहमदनगर : बलात्काराच्या गुन्ह्यात गेल्या सात वर्षांपासून फरार असलेला आरोपी कोरोनामुळे पोलिसांच्या तावडीत सापडला आहे. पांडुरंग यशवंत शेंगाळ (वय ५२ रा़ शेंगाळवाडी ता़ संगमनेर) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. 


शेंगाळ याच्यावर घारगाव पोलीस ठाण्यात २०१३ मध्ये अत्याचाराचा गुन्हा दाखल झाला होता. तेव्हापासून तो पोलिसांना गुंगारा देत होता. कोरोना साथीच्या प्रादुर्भावामुळे मात्र हा आरोपी त्याचे मूळ गाव असलेल्या शेंगाळवाडी येथे आला होता. आरोपी गावात आला असल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेचे निरीक्षक दिलीप पवार यांना मिळाली होती. माहितीनुसार पोलीस हेड कॉन्स्टेबल सुनील चव्हाण, दत्तात्रय हिंगडे, पोलीस नाईक अण्णा पवार, भागीनाथ पंचमुखी, रवींद्र कर्डिले, संतोष लोढे, योगेश सातपुते, बाळासाहेब भोपळे यांनी शेंगाळवाडी येथे जाऊन आरोपी शेंगाळ याला अटक केली. या आरोपीला पुढील कार्यवाहीसाठी घारगाव पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे. 

Web Title: The accused came home due to corona and was found by the police

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.