जिल्ह्यात युवक काँग्रेस मजबूत करणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 24, 2020 04:19 IST2020-12-24T04:19:14+5:302020-12-24T04:19:14+5:30

यशोधन कार्यालयात मंगळवारी (दि. २३) संगमनेर तालुका व शहर युवक काँग्रेसच्या आढावा बैठकीत ते बोलत होते. युवक काँग्रेसचे उत्तर ...

Youth Congress will strengthen in the district | जिल्ह्यात युवक काँग्रेस मजबूत करणार

जिल्ह्यात युवक काँग्रेस मजबूत करणार

यशोधन कार्यालयात मंगळवारी (दि. २३) संगमनेर तालुका व शहर युवक काँग्रेसच्या आढावा बैठकीत ते बोलत होते. युवक काँग्रेसचे उत्तर नगर जिल्हा कार्याध्यक्ष सुभाष सांगळे, तालुकाध्यक्ष आनंद वर्पे, शहराध्यक्ष निखिल पापडेजा, एनएसयुआयचे तालुकाध्यक्ष गौरव डोंगरे, युवकचे जिल्हा सरचिटणीस सचिन खेमनर, रमेश गफले, अनुसूचित विभागाचे शहराध्यक्ष सुमित वाघमारे, शहर कार्याध्यक्ष शेखर सोसे, उपाध्यक्ष निखिल पवार, मोहन गुंजाळ, तुषार वनवे, दत्ता वाकचौरे उपस्थित होते. यावेळी युवक काँग्रेस व एनएसयूआयच्या जडणघडणीत मोलाचा वाटा असणारे दिवंगत संदीप खताळ यांना श्रध्दांजली वाहण्यात आली.

वाबळे म्हणाले, युवक काँग्रेसच्या वतीने संगमनेर शहरात हेल्पलाईन् सुरू करण्यात आली आहे. आ. डॉ. सुधीर तांबे, युवक प्रदेशाध्यक्ष सत्यजीत तांबे यांच्या मार्गदर्शनाखाली अहमदनगर जिल्ह्यात काँग्रेसला वैभव मिळवून देण्यासाठी युवकांनी अधिकाधिक काम करणे गरजेचे आहे. शासनाच्या विविध योजना प्रभावीपणे राबवून त्याचा फायदा गरिबांना मिळवून देण्यासाठी सर्वांनी काम करावे. प्रास्ताविक वर्पे यांनी तर सूत्रसंचालन डोंगरे यांनी केले. सोसे यांनी आभार मानले.

Web Title: Youth Congress will strengthen in the district