राष्ट्रवादी घडविणार युवा उद्योजक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 27, 2021 04:21 IST2021-07-27T04:21:48+5:302021-07-27T04:21:48+5:30
राहुरी : तरुणांना त्यांच्या मनातील उद्योग व्यवसाय उभा करण्यासाठी आता राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस पुढे सरसावली आहे. राष्ट्रवादी विद्यार्थी ...

राष्ट्रवादी घडविणार युवा उद्योजक
राहुरी : तरुणांना त्यांच्या मनातील उद्योग व्यवसाय उभा करण्यासाठी आता राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस पुढे सरसावली आहे. राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील गव्हाणे यांच्या संकल्पनेतून आणि प्रदेश सरचिटणीस तुषार जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली संपूर्ण राज्यात हे अभियान राबविण्यात येणार आहे, अशी माहिती राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचे प्रवरा शहराध्यक्ष ऋषिकेश संसारे यांनी दिली.
या अभियानांतर्गत उद्योग-व्यवसाय सुरु करू इच्छिणाऱ्या तरुणांची नोंदणी करण्यात येणार असून त्यांना केंद्र व राज्य शासनाच्या सर्व योजनांची व अनुदानाची माहिती देण्यात येणार आहे. त्याचबरोबर तरुणांना जो उद्योग-व्यवसाय उभा करायचा आहे, त्याबाबत तज्ज्ञांचे मार्गदर्शन, उद्योग-व्यवसायाच्या प्रत्यक्ष क्षेत्र भेटी, प्रकल्प अहवाल, भांडवल उभारणीचे पर्याय, यंत्र सामुग्री आणि पायाभूत सुविधा उभारणी याबाबतचे मार्गदर्शन आणि सहकार्य राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसच्या माध्यमातून करण्यात येणार आहे. त्यासाठी जास्तीत जास्त तरुणांनी यामध्ये सहभागी व्हावे, असे आवाहन संसारे यांनी केले.
260721\img-20210726-wa0107.jpg
तरुणांनी 'राष्ट्रवादी विद्यार्थी'च्या उद्योजक निर्माण अभियानात सहभाग घ्यावा-ऋषिकेश संसारे