शहरं
Join us  
Trending Stories
1
Vaibhav Suryavanshi : फक्त १६ चेंडू खेळला अन् हवा करून गेला! वर्ल्ड रेकॉर्ड थोडक्यात हुकला, पण...
2
मोठी बातमी : भाजपचं धक्कातंत्र! विधान परिषद निवडणुकीसाठी ५ जणांची यादी जाहीर, कुणाला मिळाली संधी?
3
विदर्भकराचा इम्पॅक्ट! PBKS ला शह देण्यासाठी RR नं खेळलेली 'ती' चाल ठरली मॅचचा टर्निंग पॉइंट
4
नांदेड विमानतळ परिसरात ‘गूढ गोलाकार वस्तू’! उडती तबकडी की साधा बलून?
5
पोलीस आयुक्तांचा धडाकेबाज निर्णय, एकाच दिवसात ४० शस्त्र परवाने रद्द 
6
मंत्री उदय सामंत अंतरवाली सराटीत मनोज जरांगे यांच्या भेटीला, एक तास चर्चा; कारण काय?
7
बाबासाहेबांनी ध्वनी प्रदूषणाचे कधीच समर्थन केले नसते, हायकोर्टाने समाजाला विचार व तत्वज्ञानाची जाणिव करून दिली
8
निवडणूक संपताच पेट्रोल-डिझेल महागणार? केंद्र सरकारनं दिलं मोठं स्पष्टीकरण! काय होणार?
9
नागपूर भाजप शहराध्यक्ष तिवारींचा मोबाईल हॅक, आरोपींकडून लोकांना पैशांची मागणी
10
PBKS vs RR : वैभव-यशस्वीचा धमाका; फरेरा-दुबेचा फिनिशिंग टच! राजस्थानने रोखला पंजाबचा विजयरथ
11
भाजपचे धक्कातंत्र, विदर्भातून प्रस्थापितांऐवजी सहकारतज्ज्ञ संजय भेंडेंना संधी; ‘मायक्रो प्लॅनर’ म्हणून आहे ओळख
12
१ मे पासून खिशाला कात्री! बँकिंगसह 'हे' मोठे नियम बदलणार; गॅस सिलिंडर स्वस्त होणार की महागणार?
13
PBKS vs RR : 'वंडर बॉय' वैभव सूर्यवंशीनं धु धु धुतलं! मग अर्शदीपनं लो फुलटॉसवर हिशोब केला चुकता
14
‘मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे’ मिसिंग लिंकवर किती स्पीडने जाता येणार?; वेगमर्यादेची नियमावली आली!
15
विदर्भात १ मे पर्यंत पावसाळी ढग; पारा खाली येणार, पण उष्णतेची तीव्रता कायम राहणार
16
गुजरातमध्ये BJPचा डंका! १५ महानगरपालिकांवर कमळ फुलले; आप-काँग्रेस आपटले, कुणाला किती जागा?
17
PBKS vs RR: परफेक्ट सेटअप! १५० kmph वेगवान चेंडूसह पुन्हा प्रियांश आर्यवर भारी पडला जोफ्रा (VIDEO)
18
"हे 'सेल्फ रेडिकलायझेशन'चं प्रकरण, जिहाद करायचा म्हणजे..."; मिरा रोड हल्ल्यासंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्पष्टच बोलले
19
इराण-अमेरिका युद्धात UAE चा मोठा निर्णय; OPEC आणि OPEC+ गटातून बाहेर पडणार
20
म्हाडाच्या २६४० घरांच्या लॉटरीला मुदतवाढ; १४ मे पर्यंत अर्ज सादर करण्याची मुदत
Daily Top 2Weekly Top 5

यंदा प्रथमच हजारो भाविक घेणार एकाच वेळी दर्शन

By admin | Updated: September 23, 2014 01:37 IST

पाथर्डी : शारदीय नवरात्रौत्सव अवघ्या दोन दिवसावर येवून ठेपला असून, मोहटादेवी गडावर व पाथर्डी शहरात सर्वत्र नवरात्राची लगबग सुरु झाली आहे.

पाथर्डी : शारदीय नवरात्रौत्सव अवघ्या दोन दिवसावर येवून ठेपला असून, मोहटादेवी गडावर व पाथर्डी शहरात सर्वत्र नवरात्राची लगबग सुरु झाली आहे. यंदा वरुणराजाने कृपा केल्याने गडाचा परिसर निसर्गरम्य बनला आहे. मंदिराच्या जीर्णाेद्धाराचे काम अत्यंत सुबक पद्धतीने झाल्यामुळे तसेच गाभाऱ्यातून एकाचवेळी हजारो भाविक दर्शन घेवू शकतील, अशी व्यवस्था असल्यामुळे भाविकांमधून समाधान व्यक्त होत आहे.बीड-नगर जिल्ह्याच्या हद्दीवर पाथर्डीपासून ९ कि.मी. अंतरावर अग्नेय दिशेला उंच डोंगरावर मोहटादेवी गड आहे. गडावर राज्यासह परराज्यातून भाविक देवीच्या दर्शनासाठी येतात. मोहटादेवीचे स्थान हे माहूरच्या देवीचे ठाणे आहे. भक्तांच्या प्रार्थनेनुसार अश्विन शुद्ध एकादशीला देवी गडावर येवून राहिली अशी अख्यायिका आहे. राज्यात सर्वत्र विजयादशमीच्या दिवशी देवीच्या यात्रा होतात. मात्र मोहट्याची यात्रा एकादशीला भरते. अलीकडील काही वर्षात मोहटा देवस्थान नावारुपाला आले असून शिर्डीनंतर मोठी गर्दी मोहटा गडावर असते. भाविकांची संख्या दिवसेंदिवस वाढत असून मंगळवार, शुक्रवार व पौर्णिमेच्या दिवशी अलोट गर्दी होते़नवरात्रौत्सव दोन दिवसावर येऊन ठेपल्याने गडावर स्वच्छता करण्यात आली आहे़ तसेच पाथर्डी शहरातही पालिकेने स्वच्छता मोहीम हाती घेतली आहे. नवरात्रकाळात भाविकांची सेवा करण्यासाठी शहरात सुमारे दहा ते बारा मंडळे असतात त्यांचेही सध्या मंडप उभारणीचे काम सुरु असून भाविकांसाठी मोफत चहा, नाष्टा व फराळ या मंडळामार्फत दिला जातो. सर्व जाती धर्माचे युवक भाविकांची सेवा करण्यासाठी पुढे असतात हे येथील विशेष! गेल्या अनेक वर्षापासून तरुणांमध्ये वाढत चाललेला सेवाभाव शहरात कुतुहलाचा विषय बनला आहे़ यंदा परिसरात चांगला पाऊस झाल्याने गडावरील परिसर हिरवाकंच झाला आहे. तसेच डोंगरपायथ्याला असलेल्या चार ते पाच पाझर तलावात मुबलक पाणी साचल्याने हा परिसर अधिकच मोहक दिसत आहे़(तालुका प्रतिनिधी)