शहरं
Join us  
Trending Stories
1
US-Iran Ceasefire: इराण-अमेरिका संघर्षात मोठी घडामोड, ट्रम्प यांच्याकडून युद्धविरामाच्या मुदतीत वाढ, नाकेबंदी मात्र कायम
2
आजचे राशीभविष्य - २२ एप्रिल २०२६, दांपत्य जीवनात उत्तम सुख मिळेल, सार्वजनिक सन्मान व प्रसिद्धी मिळेल
3
Bombay High Court: अग्निवीराच्या कुटुंबीयांच्या याचिकेला उत्तर द्या, अन्यथा दंड ठोठावण्याचा उच्च न्यायालयाचा इशारा
4
Uddhav Thackeray: देश तोडण्याचा डाव विरोधी पक्षांनी उधळला, महाराष्ट्र धर्मच देशाला वाचवू शकतो: उद्धव ठाकरे
5
Mumbai Drug Party: गोळ्यांवर मर्सिडीज, ऑडी, ॲपलचा लोगो; तरुणांना ड्रग्जच्या विळख्यात ओढण्यासाठी मोठं षडयंत्र!
6
Devendra Fadnavis: ३३ टक्के महिला निवडून देईपर्यंत लढाई थांबणार नाही: देवेंद्र फडणवीस
7
...म्हणून अश्विनी बनायची रुकसाना, पोलिसांच्या सीक्रेट मिशनमुळे अनेक धक्कादायक गोष्टी समोर!
8
चर्चा की ढोंग? इराणच्या कार्गो शिपवर अमेरिकेचा ताबा; डोनाल्ड ट्रम्प यांची थेट युद्धभूमीवर नजर!
9
Video: "गेट आउट"! भाजपाच्या मोर्च्यासाठी वाहतूक रोखली; महिला भडकली, थेट गिरीश महाजनांवर ओरडली...
10
दिंडोरीत काळाचा क्रूर घाला! बिबट्याने उचलून नेलेल्या ३ वर्षीय चिमुरडीचा दुर्दैवी अंत; परिसरात शोककळा
11
SRH vs DC : आधी अभिषेक शर्मानं धुतलं; मग मलिंगा-हर्षचा जलवा! 'ऑरेंज आर्मी'समोर दिल्लीकर ठरले हतबल
12
पेट्रोलची कटकट मिटणार? आता गाड्या अल्कोहोलवर धावणार! इंधन टंचाईवर असा आहे सरकारचा 'E85' मास्टर प्लॅन
13
विशेष लेख: चिनी महिलांना हवाय नवऱ्यापासून घटस्फोट!
14
लेख: तुमचा पिझ्झा पोहोचविणारा उन्हात होरपळतो आहे, सावधान!
15
लेख: विधेयक पडले, पन्नास हजार कोटी रुपये वाचले!
16
आजचा अग्रलेख: हे नुकसान कसे मोजणार?
17
२०० पारच्या लढाईत KL Rahul पुन्हा अपयशी! अभिषेक शर्मानं फिल्डिंगमध्येही दाखवला क्लास
18
इस्लामाबाद चर्चा २.० पूर्वी डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून इराणच्या जनतेचं कौतुक, पण...! युएस-इराण युद्ध पुन्हा भडकणार?
19
अभिषेक शर्मा ठरला जगात भारी! टी-२० क्रिकेटमध्ये अशी कामगिरी करणारा तो पहिलाच
20
केरळमध्ये फटाका कारखान्यात मोठा स्फोट; १३ जणांचा मृत्यू, अनेक गंभीर जखमी
Daily Top 2Weekly Top 5

कामगारांचा मूक मोर्चा

By admin | Updated: August 23, 2014 00:44 IST

राहुरी : संचालक मंडळाशी वाटाघाटी फिसकटल्याने राहुरी येथील डॉ़ बा़ बा़ तनपुरे साखर कारखान्याच्या कामगारांनी शुक्रवारी दुपारी तीन वाजता राहुरी शहरातून मूक मोर्चा काढला़

राहुरी : संचालक मंडळाशी वाटाघाटी फिसकटल्याने राहुरी येथील डॉ़ बा़ बा़ तनपुरे साखर कारखान्याच्या कामगारांनी शुक्रवारी दुपारी तीन वाजता राहुरी शहरातून मूक मोर्चा काढला़शुक्रवारी सकाळी कारखान्यावर कामगारांनी एक तास मौन पाळले़ कारखान्याचे अध्यक्ष प्रसाद तनपुरे यांनी कामगारांशी चर्चा केली़ यावेळी झालेल्या चर्चेत तनपुरे यांच्याशी अर्जुन दुशिंग, सुरेश थोरात, आप्पासाहेब गावडे, अशोक नगरे, सिताराम नालकर, चंद्रकांत कराळे यांनी चर्चा केली़ कामगारांचे दोन महिन्याचे पगार द्यावे अशी मागणी कामगारांनी केली़ कारखान्याकडे सध्या पैसे नाहीत़ फायनान्स कंपनी आठवडाभरात येणार असून त्यानंतर होणाऱ्या बैठकीनंतर पगाराचे नियोजन होईल, असे तनपुरे यांनी सांगितले़कामगारांचे पगार पोळ्यापूर्वी दिल्याशिवाय आंदोलन मागे घेतले जाणार नाही, अशी भूमिका कामगारांनी घेतली़ सप्टेंबरच्या अगोदर कारखान्याची सर्वसाधारण सभा घेण्यात येईल, असे अध्यक्ष प्रसाद तनपुरे यांनी स्पष्ट केले़ कामगारांनी सहकार्य करुन आंदोलन मागे घ्यावे असे आवाहन तनपुरे यांनी केले़ मात्र कामगारांनी पगार केल्याशिवाय आंदोलन मागे घेणार नाही अशी भूमिका घेतली़राहुरी येथील खरेदी विक्री संघाच्या आवारात कामगार जमा झाले़ विद्यमान अध्यक्ष तनपुरे, माजी अध्यक्ष रामदास पाटील धुमाळ यांच्या घरावर मोर्चा काढण्याचा निर्णय कामगारांनी मागे घेतला़ भिकमागो आंदोलनही रद्द करण्यात आले़ राहुरी शहरातून कामगारांनी मुक मोर्चा काढला़ मोर्चा पुन्हा राहुरी खरेदी विक्री संघाच्या आवारात आला़मोर्चासमोर प्रकाश तारडे, अशोक नगरे, सिताराम नालकर, सुरेश थोरात, सोमनाथ वाकडे, भरत पेरणे, चंद्रकांत कराळे, अर्जुन दुशींग, आप्पासाहेब गावडे यांची भाषणे झाली़ येत्या रविवारी कारखान्यावर कामगारांची बैठक आयोजित करण्यात आली असून त्यामध्ये पुढील आंदोलनाची दिशा ठरविली जाईल असे आप्पासाहेब गावडे यांनी सांगितले़ (तालुका प्रतिनिधी)