श्रीरामपूर : स्वातंत्र्य सैनिकांना अभिप्रेत असलेले कार्य हिंद सेवा मंडळ करीत असल्याचे मंडळाचे माजी कार्याध्यक्ष ब्रिजलाल सारडा यांनी येथे सांगितले.
भि.रा.खटोड कन्या विद्यालयात आयोजित कार्यक्रमात सारडा बोलत होते. माजी आमदार भानुदास मुरकुटे, उपनगराध्यक्ष करण ससाणे, माजी सचिव अविनाश आपटे, जैन संघाचे अध्यक्ष रमेश लोढा, रमण मुथ्था, माजी नगराध्यक्ष अनिल कांबळे, संजय फंड, संजय छल्लारे, सुनील बोलके, सचिन गुजर, प्रा. शिरीष मोडक, अजित बोरा, संजय जोशी उपस्थित होते. रणजित श्रीगोड यांनी स्वागत केले. अशोक उपाध्ये यांनी प्रास्ताविक केले.
माजी आमदार भानुदास मुरकुटे, करण ससाणे व सचिन गुजर यांनी हिंद सेवा मंडळाच्या शहरातील शैक्षणिक वाटचालीचा गौरव केला. अविनाश आपटे यांनी संजय जोशी यांच्या नेतृत्वाखाली मंडळाच्या कामाचे कौतुक केले. माजी प्राचार्या चित्रा कडू, माजी पर्यवेक्षक वसंत मोरे, उपमुख्याध्यापक आबासाहेब कापसे, रत्नमाला गाडेकर, प्रा. तुळशीराम गाडेकर, प्रकाश कदम या देणगीदारांचा सत्कार करण्यात आला.
सूत्रसंचालन आदिनाश जोशी, प्रा.सतीश म्हसे यांनी केले. आभार प्रा. विनायक कुलकर्णी यांनी मानले.
----------