गावच्या कारभारात महिलांनी पुढाकार घ्यावा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 06:28 IST2021-02-05T06:28:55+5:302021-02-05T06:28:55+5:30

पंचायत समिती राहाता, जनसेवा फाउंडेशन, रणरागिणी महिला मंडळ, प्रियदर्शनी ग्रामीण महिला मंडळ यांच्‍या संयुक्‍त विद्यमाने प्रवरानगर येथील डॉ. ...

Women should take the lead in village affairs | गावच्या कारभारात महिलांनी पुढाकार घ्यावा

गावच्या कारभारात महिलांनी पुढाकार घ्यावा

पंचायत समिती राहाता, जनसेवा फाउंडेशन, रणरागिणी महिला मंडळ, प्रियदर्शनी ग्रामीण महिला मंडळ यांच्‍या संयुक्‍त विद्यमाने प्रवरानगर येथील डॉ. धनंजयराव गाडगीळ सभागृहात आयोजित करण्‍यात आलेल्‍या हळदी-कुंकू समारंभात विखे बोलत होत्‍या.

याप्रसंगी रणरागिणी महिला मंडळाच्‍या अध्‍यक्षा धनश्री विखे, डॉ. अशोक कोल्‍हे, सभापती नंदाताई तांबे, जिल्हा परिषद सदस्‍या कविता लहारे, उपसभापती ओमेश जपे, अर्चना आहेर, स्‍वप्‍नील निबे, माजी सभापती बबलू म्‍हस्‍के, गोरक्षनाथ तांबे, मनीषा आहेर, गटविकास अधिकारी समर्थ शेवाळे आदींची उपस्थिती होती.

शालिनी विखे म्‍हणाल्‍या, महिलांनी कोरोनाकाळात स्‍वत:ची, परिवाराची आणि गावाची, काळजी चांगल्‍या पद्धतीने घेतली. हळदी-कुंकवाच्‍या निमित्ताने विचारांची देवाणघेवाण होते, विचारांची देवाणघेवाण होण्‍यासाठी तालुक्‍यातील ३० ते ४० हजार महिलांनी बचत गट स्‍थापन केले आहेत. कोणत्‍या ना कोणत्‍या कारणामुळे आपण सर्वजण एकत्रित येत असतो. बचत गटांमुळे ए‍कत्रित आल्‍यानंतर बँकेचे व्‍यवहार समजायला मोठी मदत झाली.

कार्यक्रमाचे प्रास्‍ताविक गटविकास अधिकारी समर्थ शेवाळे यांनी केले. या कार्यक्रमात महिला बचत गटांना विविध योजनांचे प्रमाणपत्र व व्यवसायासाठी १ कोटी ५० लाख रुपयांच्या कर्जाचे धनादेशही वितरित करण्यात आले.

( ०२ विखे)

Web Title: Women should take the lead in village affairs