आंदोलन मागे घ्या; अन्यथा तुमच्या बदल्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 26, 2021 04:23 IST2021-08-26T04:23:45+5:302021-08-26T04:23:45+5:30

पारनेर : तुम्ही सुरू केलेले आंदोलन बंद करा; अन्यथा जिल्हाधिकाऱ्यांना सांगून तुमच्या बदल्या करू, अशी धमकी शिवसेनेचे ज्येष्ठ नेते ...

Withdraw movement; Otherwise your replacements | आंदोलन मागे घ्या; अन्यथा तुमच्या बदल्या

आंदोलन मागे घ्या; अन्यथा तुमच्या बदल्या

पारनेर : तुम्ही सुरू केलेले आंदोलन बंद करा; अन्यथा जिल्हाधिकाऱ्यांना सांगून तुमच्या बदल्या करू, अशी धमकी शिवसेनेचे ज्येष्ठ नेते व जिल्हा परिषदेचे बांधकाम, कृषी सभापती काशीनाथ दाते यांनी दिल्याचा आरोप महसूल कर्मचारी संघटनेने बुधवारी केला, तर आपण अशी धमकी दिली नसल्याचे स्पष्टीकरण सभापती दाते यांनी दिले आहे.

तहसीलदार ज्योती देवरे यांची बदली करावी; अन्यथा आमची बदली करावी, या मागणीसाठी पारनेर तालुक्यातील महसूल कर्मचाऱ्यांनी बुधवारपासून काम बंद आंदोलन सुरू केले आहे. जिल्हा परिषद बांधकाम, कृषी सभापती काशीनाथ दाते, रामदास भोसले यांनी बुधवारी दुपारी तहसीलदार ज्योती देवरे यांची भेट घेऊन माहिती घेतली. त्यानंतर महसूल कर्मचारी आंदोलन ठिकाणी सभापती दाते यांनी येऊन तुम्ही आंदोलन मागे घ्या, तालुक्यात असा प्रकार झाला नाही, नाही तर जिल्हाधिकाऱ्यांना सांगून तुमच्या बदल्या करू, अशी धमकी दिली, असा महसूल संघटनेने आरोप केला आहे.

या प्रकाराने महसूल कर्मचारी संतप्त झाले असून, आमच्यावर अशा पद्धतीने दबाब आणू नये, अशी भूमिका कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष अशोक रोकडे, तलाठी संघटना अध्यक्ष यू.एस. मांडगे यांनी सांगितले.

---

आपण महसूल कर्मचारी आंदोलकांना कोणतीही धमकी दिली नाही. तहसीलदार आणि महसूल कर्मचारी वादात पारनेर तालुक्यातील जनतेची अडवणूक होत असून, तुमच्यातील वाद तातडीने मिटवा; अन्यथा तहसीलदारांचीही बदली करा आणि कर्मचाऱ्यांचीही बदली करा, अशी मागणी आपण जिल्हाधिकाऱ्यांकडे करणार आहोत, असे त्यांना सांगितले. याबाबत गुरुवारी जिल्हाधिकाऱ्यांना भेटणार आहे.

-काशीनाथ दाते,

बांधकाम सभापती, जिल्हा परिषद, नगर

Web Title: Withdraw movement; Otherwise your replacements