पत्नीचा गळा आवळून केला खून

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 6, 2021 04:20 IST2021-04-06T04:20:16+5:302021-04-06T04:20:16+5:30

अहमदनगर : एमआयडीसी येथील कामगाराने पत्नीचा गळा आवळून तिचा खून केला. ३ एप्रिल रोजी मध्यरात्रीच्या सुमारास ही घटना घडली. ...

Wife strangled to death | पत्नीचा गळा आवळून केला खून

पत्नीचा गळा आवळून केला खून

अहमदनगर : एमआयडीसी येथील कामगाराने पत्नीचा गळा आवळून तिचा खून केला. ३ एप्रिल रोजी मध्यरात्रीच्या सुमारास ही घटना घडली. घटनेनंतर एमआयडीसी पोलिसांनी आरोपी पतीस अटक केली आहे.

लता संतोष पाटोरकर असे खून झालेल्या महिलेचे नाव आहे. याप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात भागिनाथ सूर्यभान कराळे यांनी चार एप्रिल रोजी दिलेल्या फिर्यादीवरून आरोपी संतोष परसराम पाटोरकर (वय २८, रा. बीबामल, ता. धारणी, जि. अमरावती) याच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. संतोष पाटोरकर हा काही दिवसांपूर्वी एमआयडीसी येथे पत्नीसमवेत कामाला आला होता. कॉन्ट्रॅक्टर कराळे यांच्याकडे तो काम करत होता. ३ एप्रिल रोजी रात्री आरोपीने एमाआयडीसी येथील ब्रिज इंडस्ट्रीज या कंपनीच्या सिक्युरिटी केबिनमध्ये त्याची पत्नी लता हिचा गळा आवळून खून केला. याप्रकरणी सहायक पोलीस निरीक्षक युवराज अठरे हे पुढील तपास करत आहेत.

Web Title: Wife strangled to death