शहरं
Join us  
Trending Stories
1
Nepal Plane Fire: नेपाळमध्ये काळ आला होता, पण वेळ आली नव्हती! लँडिंग दरम्यान विमानाच्या टायरला आग; २८९ प्रवाशांचे प्राण थोडक्यात वाचले
2
'असदुद्दीन ओवेसी हे ओसामा बिन लादेनसारखेच, त्यांच्यात काही फरक नाही', मंत्री नितेश राणेंचे विधान
3
मोदींचं आवाहन, पेट्रोलियम मंत्र्यांनी मांडलं गणित, देशात पेट्रोल, डिझेलचे दर भडकणार, किमती एवढ्या रुपयांनी वाढणार
4
भारतीय रणरागिणींचा सुवर्णवेध! शांघाय तिरंदाजी विश्वचषकात जिंकलं गोल्ड, यजमान चीनचा उडवला धुव्वा
5
Keralam CM: केरळचे मुख्यमंत्रिपद कोणाला मिळणार, महाराष्ट्राचे प्रभारी चेन्निथलांसह तीन नेत्यांच्या नावांची चर्चा
6
हंटाव्हायरसच्या विळख्यात सापडलेले जहाज अखेर स्पेनमध्ये पोहोचले, युद्धपातळीवर मोहीम
7
'वंदे मातरम्' : मुख्यमंत्री विजय यांच्या चालीने भाजप बॅकफूटवर; बंगालमध्ये भाजपकडून उच्चार नाही
8
SBI च्या गुंतवणूकदारांना ₹४४,७२२ कोटींचं नुकसान, 'या' कंपन्यांमध्ये पैसा गुंतवणारे झाले मालामाल
9
शेतकऱ्याच्या कांद्याला मिळतात ५० पैसे, ग्राहक मोजतो २५ रुपये; उत्पादन खर्चही निघेना, शेतकऱ्यांचा आक्रोश
10
छत्रपती संभाजीनगर: विहीर ढासळून बापासह दोन मुलांचा मृत्यू, पत्नीने फोडला टाहो; सहा तासांनंतर मृतदेह काढले बाहेर
11
आजचे राशीभविष्य - ११ मे २०२६, कार्यसिद्धीचा दिवस, सामाजिक मान-सन्मान होतील
12
तीन वेळा कार बदलून रुपाली चाकणकर चौकशीला हजर, अशोक खरातप्रकरणी एसआयटीने केली प्रश्नांची सरबत्ती
13
"जगात कोणत्याही देशात कॅश करता येणार प्रॉपर्टी कार्ड; सरकारचा विचार; महाराष्ट्रात लवकरच 'लँड टायटलिंग अ‍ॅक्ट" 
14
'तामिळनाडूत नव्या युगाचा आरंभ'; विजय यांच्याकडून धडाकेबाज निर्णय; तरुण कीर्तनांनी वेधले लक्ष
15
अग्रलेख: मराठीचा अभिमान की आभास? मातृभाषेवरील हे सावट दूर करता येईल
16
Iran US War Update: युद्धविराम मोठ्या संकटात ! मालवाहू जहाजाला आग, कुवेतवर ड्रोन हल्ला
17
विशेष लेख: अमित शाह यांच्या खेळीने ममता बॅनर्जी चारीमुंड्या चीत
18
तामिळनाडू 'विजय'पथावर! मुख्यमंत्रिपदाची शपथ घेताच जनतेला दिले मोफत विजेचे गिफ्ट
19
सोनेखरेदी टाळा, पेट्रोल-डिझेलचा वापर कमी करा, 'वर्क फ्रॉम होम' सुरू करा; पंतप्रधान मोदींचे भारतीयांना आवाहन
20
"इराणचं हसणं आता कायमचं बंद होईल"; ट्रम्प यांचा थेट इशारा; ओबामांनी विमानाने पैसे दिल्याचा आरोप
Daily Top 2Weekly Top 5

विद्यार्थ्यांनी आयटीआयकडे का फिरवली पाठ!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 26, 2021 04:23 IST

आयटीआय प्रवेशासाठी १५ जुलैपासून प्रवेश प्रक्रिया सुरू झाली असून, आतापर्यंत नगर जिल्ह्यात खासगी व शासकीय आयटीआयमधील एकूण ७ ...

आयटीआय प्रवेशासाठी १५ जुलैपासून प्रवेश प्रक्रिया सुरू झाली असून, आतापर्यंत नगर जिल्ह्यात खासगी व शासकीय आयटीआयमधील एकूण ७ हजार २० जागांसाठी ७ हजार ४७ अर्ज प्राप्त झाले आहेत. ही संख्या मागील वर्षीच्या तुलनेत साडेपाच हजाराने कमी आहे. अर्ज करण्याची मुदत ३१ ॲागस्टपर्यंत आहे. तोपर्यंत आणखी अर्ज वाढतील. यात उपलब्ध जागांपैकी अर्ज करणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या अधिक असली तरी नंतर प्रवेशावेळी ही संख्या आणखी कमी होते. कारण मागील वर्षी प्रत्यक्षात १२ हजार ७०० अर्ज आले असले तरी प्रवेश केवळ ४ हजार २८६ एवढेच झाले होते.

त्यामुळे अर्ज संख्या आणखी वाढविण्यासाठी आयटीआय संचालनालयाकडून ‘प्रवेश प्रोत्साहन अभियान’ राबविण्यात येत आहे. यानुसार गावोगावी किंवा शाळेत जाऊन पालक, विद्यार्थ्यांना आयटीआयचे महत्त्व पटवून दिले जात आहे.

--------------

जिल्ह्यातील शासकीय आयटीआय - १६

एकूण प्रवेश क्षमता - २८८८

खासगी आयटीआय - २८

एकूण प्रवेश क्षमता - ४१३२

आतापर्यंत आलेले अर्ज - ७०४७

-----------------

का मिळतो कमी प्रतिसाद

- दहावीचा निकाल जास्त लागल्याने विज्ञान, वाणिज्य शाखेकडे किंवा इतर अभ्यासक्रमाकडे विद्यार्थ्यांचा ओढा वाढला आहे.

- आयटीआय प्रवेशासाठी सर्वच विद्यार्थ्यांकडून फिटर, टर्नर ट्रेडला सर्वाधिक पसंती दिली जाते. परंतु, या ट्रेडला मर्यादित जागा असल्याने प्रवेश मिळत नाही.

--------------

आयटीआयला अर्ज भरला आहे. त्याचवेळी अकरावी विज्ञानसाठीही अर्ज भरला आहे. यात चांगले काॅलेज मिळाले नाही तर आयटीआयलाच प्रवेश घेणार आहे.

- संकेत कोळगे, विद्यार्थी

-----------

आयटीआयच्या इलेक्ट्रिशिएन, फिटरसाठी अर्ज केला आहे. तो ट्रेड मिळाला तरच प्रवेश ठेवेन, अन्यथा अकरावीसाठी प्रवेश घेणार आहे.

- प्रीती जाधव, विद्यार्थिनी

-----------

नगर जिल्ह्यात शासकीय व खासगी आयटीआयच्या एकूण ७ हजार जागा आहेत. आतापर्यंत ७ हजार ४७ अर्ज आले आहेत. अजून अर्ज येण्यासाठी ‘प्रवेश प्रोत्साहन अभियाना’नुसार प्रयत्न सुरू आहेत.

- सुनील शिंदे, प्राचार्य, आयटीआय काॅलेज