शहरं
Join us  
Trending Stories
1
Donald Trump: इराणी लहान बोटी कुठेही दिसल्या तर उडवून टाका, ट्रम्प यांचे नौदलाला आदेश
2
आजचे राशीभविष्य - २४ एप्रिल २०२६, शुभ फलदायी दिवस, नोकरी, व्यवसायात अनुकूल वातावरण राहील
3
Sanjay Gaikwad: ‘शिवाजी कोण होता?’वरून वाद; आ. संजय गायकवाडांची प्रकाशकाला धमकी
4
प. बंगाल, तामिळनाडूत ‘मत रेकॉर्ड’, विधानसभा निवडणुकीत मतदारांचा उत्साह
5
होर्मुजमध्ये इराणचा सापळा! ६ महिने तेलपुरवठा ठप्प होण्याची भीती, जागतिक अर्थव्यवस्थेसमोर मोठे आव्हान
6
'हेल-होल' वादानंतर ट्रम्प यांचं 'हृदयपरिवर्तन'! म्हणाले, "भारत 'महान देश' आणि मोदी..."
7
MI vs CSK: मॅचदरम्यान भर मैदानात वाद; तिलक वर्मा-जेमी ओवर्टन भिडले, नेमकं काय घडलं? (VIDEO)
8
लग्नाहून परतणाऱ्या वऱ्हाड्यावर काळाचा घाला; व्हॅनला अपघात, पाच जणांचा मृत्यू
9
संजूचं नाबाद शतक! गोलंदाजीत अकिलचा इम्पॅक्टफुल 'चौकार'; MI च्या घरच्या मैदानात CSK चा विक्रमी विजय
10
पश्चिम रेल्वेच्या ट्रेन मॅनेजरला होमगार्ड शिपायाची लाथ; गुन्हा नोंदवण्यास टाळाटाळ केल्याचा आरोप
11
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी व कुटुंबियांना सोशल मीडियावर आक्षेपार्ह व्हिडिओद्वारे धमकी; नागपुरातील आरोपीविरोधात गुन्हा दाखल
12
लैंगिक शोषणामुळे पत्नी बनली मनोरुग्ण; न्याय मागणाऱ्या पतीवर वेडा होण्याची पाळी
13
MI vs CSK: क्विंटन डी कॉकची विकेट आणि आईच्या आठवणीत भावूक झाला मुकेश चौधरी (VIDEO)
14
Baramati bypoll election: बारामती विधानसभा पोटनिवडणुकीत मतदानाचा टक्का घसरला; सुनेत्रा पवार यांच्या ‘रेकॉर्डब्रेक’ मताधिक्याचा ४ 'मे'ला होणार फैसला
15
Sanju Samson Record: वानखेडेवर संजूची विक्रमी सेंच्युरी! हिटमॅन रोहित शर्माची बरोबरी; कोहली-अभिषेकचा रेकॉर्डही धोक्यात
16
जळगाव महापालिकेत पोलिसांचे तळ, कागदपत्रांची झाडाझडती; ४१ कोटींच्या अपहाराचा आरोप
17
MI vs CSK : मुकेश चौधरीला सलाम! आईच्या निधनानंतर काळजावर दगड ठेवून उतरला मैदानात
18
पुतळ्यासारखे थिजले लेकाचे हात; बापासाठी पदक जिंकले, सुवर्ण सोहळा पाहायला येतानाच वडिलांचा अपघाती मृत्यू
19
पश्चिम बंगालमध्ये पहिल्या टप्प्यात भाजप किती जागा जिंकणार? विक्रमी मतदानानंतर सुवेंदू अधिकारी यांचा धक्कादायक दावा!
20
बंगाल-तमिळनाडूत मतदानाची विक्रमी टक्केवारी; बंपर मतदानाने कोणाचे नशीब उजळणार?
Daily Top 2Weekly Top 5

देवळाली प्रवरातील कोविड सेंटर खासगी का?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 26, 2021 04:21 IST

देवळाली प्रवरा येथील नगरपालिका इमारतीमध्ये सुरू असलेले खासगी कोविड सेंटर शासकीय करावे किंवा नागरिकांना मोफत सुविधा देण्यासाठी नगरपालिकेने स्वतः ...

देवळाली प्रवरा येथील नगरपालिका इमारतीमध्ये सुरू असलेले खासगी कोविड सेंटर शासकीय करावे किंवा नागरिकांना मोफत सुविधा देण्यासाठी नगरपालिकेने स्वतः ते कोविड सेंटर चालवावे. अन्यथा नगरपालिकेच्या गेटसमोर आमरण उपोषण करणार असल्याचे आंतरराष्ट्रीय खेळाडू आप्पासाहेब ढुस यांनी अहमदनगरचे जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांना पाठविलेल्या निवेदनात म्हटले आहे.

इमारत नगरपालिकेची, पाणी नगरपालिकेचे, वीज नगरपालिकेची, सफाई कामगार नगरपालिकेचे ... मग कोविड सेंटरच खासगी का? असा देवळाली प्रवराच्या नागरिकांना प्रश्न पडला आहे. नगरपालिकेच्या मालमत्तेमध्ये खासगी कोविड सेंटर चालवून रुग्णाला भरमसाठ बिलाची आकारणी कशी काय करू शकता? असा सवाल आप्पासाहेब ढुस यांनी विचारून तात्काळ हे कोविड सेंटर शासकीय करा नाहीतर चले जाव आंदोलन छेडावे लागेल, असा इशारा दिला होता.

चार दिवसाचे चाळीस हजार रुपये बिल भरायला पैसे नसल्याने खासगी कोविड सेंटरमध्ये अडकून पडलेल्या देवळाली प्रवरा येथील रुग्णाला सोडवायला आंदोलन करायची वेळ आल्याने ढुस यांनी अहमदनगरचे जिल्हाधिकारी यांना आमरण उपोषणाचे निवेदन दिले आहे. कोरोनाची तिसरी लाट येण्यापूर्वी या खासगी कोविड सेंटरमध्ये आणखी काही बेड वाढवून त्याचे शासकीय मोफत कोविड सेंटरमध्ये रूपांतर करावे किंवा नगरपालिकेने ते स्वतः चालवावे या बाबत आम्ही नगरपालिकेला वारंवार विनंती केली आहे. त्यावरही नगरपालिकेने अद्यापपावेतो कोणताही निर्णय घेतला नाही.

...........

या खासगी कोविड सेंटरची नगरपालिकेकडून माहिती मिळावी

या कोविड सेंटरमध्ये आणखी काही बेड वाढवून ते शासकीय कोविड सेंटर करावे किंवा नगर परिषदेने ते कोविड सेंटर स्वतः चालविण्यासाठी आवश्यक ती उपाययोजना करावी. येथील नागरिकांना मोफत सेवा उपलब्ध करून कोरोनाची तिसरी लाट येण्यापूर्वी देवळाली प्रवरा परिसरातील नागरिकांना करावे. आमच्या मागण्या मान्य होईपर्यंत देवळाली प्रवरा नगरपालिकेच्या गेटसमोर आम्ही आमरण उपोषण करणार आहोत असे निवेदनात आप्पासाहेब ढुस यांनी म्हटले आहे. निवेदनाची प्रत राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, अहमदनगरचे जिल्हा पोलिस अधीक्षक, राहुरीचे तहसीलदार व देवळाली प्रवरा नगरपालिकेचे मुख्याधिकारी यांना पाठविण्यात आली आहे.