शरद पवारांना आताच का चौंडी आठवली? रोहित पवारही त्यांचेच व्हर्जन; पडळकर यांचा हल्लाबोल

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 31, 2022 18:08 IST2022-05-31T18:07:30+5:302022-05-31T18:08:18+5:30

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीनिमित्त पडळकर चौंडी येथे अभिवादन करण्यासाठी आले होते. शरद पवार यांची सभा झाल्यानंतर दुपारी पडळकर यांची सभा झाली.

Why did Sharad Pawar just remember Choundi ask Gopichand Padalkar | शरद पवारांना आताच का चौंडी आठवली? रोहित पवारही त्यांचेच व्हर्जन; पडळकर यांचा हल्लाबोल

शरद पवारांना आताच का चौंडी आठवली? रोहित पवारही त्यांचेच व्हर्जन; पडळकर यांचा हल्लाबोल

अहमदनगर: शरद पवार यांना आताच का चौंडी आठवली? ते चार वेळा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते. त्यावेळी एकदाही ते चौंडीला आले नाहीत. चौंडीला कार्यक्रम होतात ते पवारांना थेट २०२२ मध्येच कळले का? शरद पवार हे केवळ नातवाच्या प्रेमापोटी चौंडीला आले आहेत, असा आरोप भाजप नेते गोपीचंद पडळकर यांनी केला आहे.

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीनिमित्त पडळकर चौंडी येथे अभिवादन करण्यासाठी आले होते. शरद पवार यांची सभा झाल्यानंतर दुपारी पडळकर यांची सभा झाली. यावेळी माजी मंत्री प्रा. राम शिंदे,  सदाभाऊ खोत आदी उपस्थित होते.

यावेळी पडळकर म्हणाले, चौंडीचा कार्यक्रम हा पूर्णपणे राष्ट्रवादीचा कार्यक्रम होता. जयंती उत्सव त्यांनी हायजॅक केला. चौंडीमध्ये अहिल्यादेवी यांचे वारसदार राहतात, याचाही त्यांना विसर पडला. त्यांनी कोणालाही निमंत्रण दिले नाही. शरद पवार हे केवळ नातवाच्या प्रेमापोटी इथे आले आहेत. रोहित पवार हेही शरद पवार यांचेच व्हर्जन आहे, अशी टीकाही त्यांनी यावेळी केली.  

शरद पवार यांच्या राजकीय कारकिर्दीला पन्नास वर्षे पूर्ण होऊन गेले.  या काळात ते येथे कधीच आले नाहीत. रोहित पवार यांचा संबंध इथे काय?  असा सवालही त्यांनी यावेळी केला.

 

Web Title: Why did Sharad Pawar just remember Choundi ask Gopichand Padalkar