ट्रीपल सीट वाहनचालकांना आवरणार कोण?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 7, 2021 04:26 IST2021-09-07T04:26:13+5:302021-09-07T04:26:13+5:30
---------- अरुण वाघमोडे अहमदनगर : ट्रिपल सीट वाहन चालविणे कायद्याने गुन्हा असला तरी अनेक जण या नियमांकडे दुर्लक्ष करताना ...

ट्रीपल सीट वाहनचालकांना आवरणार कोण?
----------
अरुण वाघमोडे
अहमदनगर : ट्रिपल सीट वाहन चालविणे कायद्याने गुन्हा असला तरी अनेक जण या नियमांकडे दुर्लक्ष करताना दिसत आहेत. गेल्या वर्षभरात पोलिसांनी ट्रिपल सीटच्या चालणाऱ्या १२ हजार ९८८ वाहनचालकांना तब्बल २५ लाख ९७ हजार ६०० रुपयांचा दंड ठोठावला आहे. दंडात्मक कारवाई होत असतानाही वाहनचालकांचा बेशिस्तपणा काही कमी होताना दिसत नाही.
वाहतूक नियमांकडे दुर्लक्ष करणाऱ्या वाहनधारकांमुळे अपघातांचे प्रमाण वाढले असून, वाहतूक कोंडीही होते. ट्रिपल सीटवाले पोलिसांच्या निदर्शनास आल्यानंतर कारवाई होते. मात्र बहुतांशी जण पोलिसांची नजर चुकवून नियम तोडतात. सिग्नलवर वाहतूक कर्मचारी दिसला की, दुचाकीवर बसलेल्या तिघांपैकी मागचा मागेच उतरतो. पोलीस नजरेआड झालेत, की पुन्हा दुसऱ्याच्या मागे तिसरा बसून सुसाट जातात.
-----------------------------
दुचाकी वाहनचालकांनो, हे नियम पाळा
१) डावी-उजवीकडे वळताना हाताचे इशारे दिले पाहिजेत.
२) प्रखर दिवे न वापरता दुचाकीचा वेग नियंत्रित असावा.
३) हेल्मेट वापरावे. हेड लाइट, ब्रेक लाइट, इंडिकेटर वेळोवेळी तपासा.
४) दोनपेक्षा जास्त व्यक्तीने प्रवास करू नये.
५) मोबाइलवर बोलत बाइक चालवू नये.
६) लहान मुलांना टाकीवर बसवू नका किंवा बॅकसिटवर उलटे बसवू नका.
किती जणांवर झाली कारवाई.
१ जानेवारी ते ३० ऑगस्टपर्यंत जिल्ह्यात ट्रिपल सीट वाहन चालविल्याबद्दल १२ हजार ९८८ वाहनचालकांना २५ लाख ९७ हजार ६०० रुपयांचा दंड झाला आहे.
-----------
नियम मोडाल, तर असा होईल दंड
ट्रिपल सिट : २००
विनालायसन्स : ५००
कर्कश हॉर्न : २००
मोबाइलवर बोलणे : २००
वेगात वाहन चालविणे : १०००
राॅंग साइडने चालविणे : ५००
सायलेंसर आवाज करणे : १०००
सिग्नल जंपिंग- २००