शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांनी युद्धविराम वाढवला, पण इराणला नाही विश्वास, अमेरिकेसमोर ठेवली 'अशी' अट!
2
solar energy: सौरऊर्जा ग्राहकांना आणखी एक ‘झटका’, आता वीज शुल्क करही द्यावा लागणार
3
ट्रम्प यांची 'पीस-डील' धोक्यात! इराणच्या कट्टर धोरणामुळे मध्यपूर्वेत पुन्हा युद्धाचे सावट
4
ट्रम्प यांना खूश करण्यासाठी युक्रेनचा नवा डाव; डोनबासचा काही भाग आता होणार 'डोनीलँड'?
5
‘नाव मोठं लक्षण खोटं’... तरीही LSG संघ मालक संजीव गोयंका यांनी थोपटली रिषभ पंतची पाठ (VIDEO)
6
इराणनं अमेरिकेची नाकाबंदी तोडली, नाकाखालून घेऊन गेला ३४ टँकर्स; ९० कोटी डॉलर्सचं तेल 'होर्मुज'बाहेर! असा दिला चकमा
7
कॅप्टन रियान परागची चाल अन् गोलंदाजांची कमाल! RR नं पंतच्या LSG ला घरच्या मैदानात दिला पराभवाचा दणका
8
उकाड्याने हैराण पुण्यात अचानक पावसाचा वर्षाव; स्वारगेट, शास्त्री रोड परिसरात मध्यम सरी
9
LSG vs RR :अवघ्या ११ धावांत पंतसह तिघांच्या पदरी भोपळा! बडोनीनं स्वतःच्या पायावर मारून घेतली कुऱ्हाड
10
खर्गे मोदींना म्हणाले 'दहशतवादी'; निवडणूक आयोगाची मोठी कारवाई, २४ तासांत मागवलं उत्तर
11
एव्हीएशन सेक्टरमध्ये हाहाकार! या विमान कंपनीने अचानक २०,००० विमानफेऱ्या रद्द केल्या; एवढे काय घडले...?
12
Vaibhav Suryavanshi Fastest 500 : छोट्याखानी खेळीत महारेकॉर्ड! वैभव सूर्यवंशीनं रचला इतिहास
13
मालेगाव बॉम्बस्फोट खटल्यात मोठा निकाल; पुराव्याअभावी ४ आरोपींची निर्दोष मुक्तता!
14
LSG vs RR : शमीचा जलवा! यशस्वीपाठोपाठ ध्रुव जुरेल ठरला झिरो! लगेच संजीव गोएंकांनी काढला फोटो
15
प्रियकर मुलीच्या खोलीतून निघाला; चिडलेल्या बापाने पोटच्या १७ वर्षीय मुलीला संपवले
16
इराण-अमेरिका युद्धाचा फटका आता थेट 'फॅमिली प्लॅनिंग'ला! ३० टक्क्यांपर्यंत वाढू शकतात कंडोम्सचे भाव
17
उल्हासनगर महापालिकेत 'डम्पिंग'वरून रणकंदन; भाजप नगरसेवकांचे ठिय्या आंदोलन
18
कल्याणमध्ये ७० हजार रुपयांचा सायबर क्राईम : हेल्पलाईन तक्रार करुन दाद नाही
19
पाकिस्तानमधून इराणमध्ये दहशतवादी घुसले! रास्क सीमेवर मोठी चकमक; १२ दहशतवादी ठार
20
ममता बॅनर्जींचा हस्तक्षेप लोकशाहीसाठी धोकादायक! आयपॅक-ईडी कारवाईवरून सर्वोच्च न्यायालयाचे ताशेरे
Daily Top 2Weekly Top 5

लंडनच्या वऱ्हाडात सखी झाल्या मंत्रमुग्ध

By admin | Updated: July 30, 2014 00:45 IST

अहमदनगर : विश्वविक्रम करणारे रंगकर्मी, नाट्य दिग्दर्शक, लेखक प्रा. डॉ. लक्ष्मणराव देशपांडे यांनी ‘वऱ्हाड निघालंय लंडनला’च्या एकपात्री प्रयोगाने रसिकमनावर अधिराज्य गाजविले होते.

अहमदनगर : विश्वविक्रम करणारे रंगकर्मी, नाट्य दिग्दर्शक, लेखक प्रा. डॉ. लक्ष्मणराव देशपांडे यांनी ‘वऱ्हाड निघालंय लंडनला’च्या एकपात्री प्रयोगाने रसिकमनावर अधिराज्य गाजविले होते. त्यांचाच वसा पुढे नेत सिने अभिनेता संदीप पाठक यांनीही हे लंडनचे वऱ्हाड अहमदनगर, संगमनेर व श्रीगोंदा येथील मंचावर हुबेहूब साकारले. लोकमत सखी मंचच्या वतीने ‘वऱ्हाड निघालंय लंडनला’ या एकपात्री प्रयोगाचे आयोजन करण्यात आले होते. अहमदनगर येथील सहकार सभागृहात हा कार्यक्रम सखींच्या उत्स्फूर्त प्रतिसादात पार पडला. साईदिप ग्रुप प्रस्तुत असोसिएट स्पॉन्सर्स हॉटेल यश ग्रॅण्ड, आशा भेळ, धर्मवीर संभाजी राजे प्रतिष्ठान भोसले आखाडा, शांती चौक मित्रमंडळ राहुरी फॅक्टरी या सर्वांच्या सहकार्याने पार पडलेल्या या कार्यक्रमात पात्र परिचयापासून नाट्य प्रयोगाच्या शेवटच्या संवादापर्यंत संदीप यांनी साकारलेले अभिनयविश्व सखी प्रेक्षकांना खळखळून हसविणारे होते. बप्पा, बबन्या, काशिनाथ, जॉन राव आणि घरातील महिला मंडळींचे संवाद ताकदीने संदीप पाठक यांनी सादर करुन सखी प्रेक्षकांकडून वाहवा मिळविली. डॉ. लक्ष्मणराव देशपांडे यांच्या लेखणीतील जादू अभिनयात उतरविण्याचा पुरेपूर प्रयत्न संदीप यांनी केला. काशिनाथचे लग्न अन् तेही लंडनला, त्यासाठी गावाकडचे निघालेले वऱ्हाड ही तारांबळ विनोदी अन् तितक्याच धीरगंभीर संवादासह सादर झाली. गावातील अन् तेही एकत्र कुटुंबातील हे कथानक अवतीभवतीचे वाटावे असे आहे. रडणे, हसणे, रागावणे, लहान मुलांचे लडीवाळपणे बोलणे, महिलांची कुजबुज आणि भांडण, घरातील कारभाऱ्याचा रुबाब या साऱ्याच छटा एकाच मंचावर संदीप पाठक यांनी दिलखेचकपणे सादर केल्या. (प्रतिनिधी)१संगमनेर : येथे पार पडलेल्या कार्यक्रमाचे उद्घाटन लोकमतचे संस्थापक संपादक स्व. जवाहरलालजी दर्डा यांच्या प्रतिमापूजनाने झाले. यावेळी व्यासपीठावर लोकमतचे आश्विन मुथा, संदीप पाठक, संदीप सोनार आदी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अर्चना सूर्यवंशी यांनी केले. २श्रीगोंदा : लीलावती बन्सीलाल नाहाटा मानवसेवा चॅरिटेबल ट्रस्ट व जागर युवती प्रतिष्ठान प्रस्तुत बालाजी मंगल कार्यालयात सखींच्या उत्स्फूर्त प्रतिसादात हा प्रयोग पार पडला. सखींनी संदीप पाठक यांच्या अभिनयाला दाद दिली. कार्यक्रमाचे उद्घाटन लोकमतचे संस्थापक संपादक स्व. जवाहरलालजी दर्डा यांच्या प्रतिमापूजनाने झाले. यावेळी व्यासपीठावर मनिषा नाहाटा, रुपाली नाहाटा, आशा खोसे, अंजली बगाडे, अनुपमा बगाडे आदी उपस्थित होत्या. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी देवयानी खेंडके, मंदाकिनी खेंडके, पूनम फिरोदिया, जयश्री औटी, विद्या गुंदेचा आदींनी सहकार्य केले. सूत्रसंचालन रोहिणी काकडे यांनी केले.