शहरं
Join us  
Trending Stories
1
SRH चा 'ई'शानदार विजय! आपल्यासोबत GT लाही मिळवून दिलं प्लेऑफ्सचं तिकीट; CSK चं काय?
2
उद्योगपती गौतम अदानी यांना मोठा दिलासा! अमेरिकेच्या न्याय विभागाने सर्व फौजदारी खटले केले बंद
3
आफ्रिकेत इबोला व्हायरसचा धोका वाढला, भारत सरकार 'अलर्ट मोड'वर, तपासणी अधिक तीव्र
4
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना मिळाला नॉर्वेचा सर्वोच्च सन्मान; जगातील ३२वा मानाचा पुरस्कार प्रदान
5
चेन्नई सुपर किंग्सचा डाव संपल्यावर MS धोनी मैदानात उतरला; फोटो सेशनसह त्याचा IPL प्रवास थांबला? (VIDEO)
6
हिंदू बांधव रस्त्यावर पूजा करतात, एअरपोर्टवर गरबा खेळतात, आम्ही काही बोलतो का?- वारिस पठाण
7
संतापजनक! कार-टमटम अपघातात ५ जण गंभीर जखमी; अर्धा तास उलटूनही रुग्णवाहिकेचा पत्ताच नाही...
8
संजूचा आणखी एक पराक्रम! पठ्ठ्यानं MS धोनीचा १३ वर्षांपासून अबाधित असलेला सर्वकालीन विक्रम मोडला
9
मध्यपूर्वेत काही तरी मोठं घडणार? 'या' देशानं सौदी अरेबियामध्ये तैनात केले तब्बल ८००० सैनिक अन् लढाऊ विमानं
10
"तर विनाश अटळ..!" पाकिस्तानची मोठी भविष्यवाणी, जारी केलं निवेदन; PAKला नेमकी कसली भीती?
11
"सूट असो वा नसो..."; अमेरिकन निर्बंधांना भारताचा ठेंगा, छातीठोकपणे रशियाकडून तेल खरेदी करत राहणार!  
12
चालत्या रस्त्यावर किंवा जाममध्ये मागून येणाऱ्या वाहनाने धडक दिली तर चूक नक्की कुणाची? वाचा काय सांगतो ट्रॅफिक नियम
13
गजकेसरी योगात अंगारक विनायक चतुर्थी: ८ राशींची भरभराट, अडकलेला पैसा मिळेल; मेहनतीचे फळ-यश!
14
जिहादपेक्षा डोक्यावरच्या केसांची काळजी! काश्मीरमध्ये घुसलेल्या दहशतवाद्याने करून घेतले 'हेअर ट्रान्सप्लांट'
15
CSK vs SRH : कमांडो म्हणाले; MS धोनी एकदम फिट! चेपॉकवर ऋतुराजनं सांगितली खरी गोष्ट, "तो आमच्यासोबत असला तरी..."
16
१७ राज्यात अलर्ट, १६ तासात वादळी वारे पाऊस; उष्णतेची लाटही राहणार, महाराष्ट्रात अपडेट काय?
17
सनातन धर्मावर विधान, उदयनिधींविरोधात सुप्रीम कोर्टात याचिका; CM विजय यांच्या भूमिकेकडे लक्ष
18
उन्हाळ्यात उसाचा रस आवडीने पिताय? १ ग्लासात ९ चमचे साखर; हेल्दी समजून पिणाऱ्यांनो जर थांबा!
19
Top Marathi News LIVE: CM योगींची दादागिरी, धमक्यांचा काहीही उपयोग होणार नाही- वारिस पठाण
20
नवरीच्या घराजवळच वऱ्हाडाचा भीषण अपघात; पालघरमध्ये १२ जणांचा मृत्यू, ट्रकमध्ये होते १०० वऱ्हाडी
Daily Top 2Weekly Top 5

पाणी ही निसर्गाने दिलेली अमूल्‍य भेट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 14, 2021 04:24 IST

अहमदनगर : जलसंकट ही जगासमोर भेडसावणारी मोठी समस्‍या आहे. पाणी निसर्गाने आपल्‍याला दिलेली अमूल्‍य भेट आहे. परंतु पाण्‍याचा जपून ...

अहमदनगर : जलसंकट ही जगासमोर भेडसावणारी मोठी समस्‍या आहे. पाणी निसर्गाने आपल्‍याला दिलेली अमूल्‍य भेट आहे. परंतु पाण्‍याचा जपून वापर न केल्‍यामुळे मानवजातीपुढे जलसं‍कट उभे ठाकले आहे. यासाठी समाजात, शाळा, महाविद्यालयामध्‍ये पाणी अडवा, पाणी जिरवा या संकल्‍पनेचे महत्‍व पटवूून जनजागृती केली गेली पाहिजे, असे मत अहमदनगर महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. आर. जे. बार्नबस यांनी व्यक्त केले.

भूजल सर्वेक्षण आणि विकास यंत्रणा व बी.पी.एच.ई. सोसायटीचे

अहमदनगर महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने भूजल साक्षरता अभियान ऑनलाइन वेबिनार आयोजित करण्यात आले. या शिबिराचे उद्घाटन प्राचार्य बार्नबस यांच्या भाषणाने झाले. वरिष्ठ भूवैज्ञानिक (भूजल सर्वेक्षण आणि विकास यंत्रणाचे रश्मी कदम यांनी भूजल सर्वेक्षण आणि विकास यंत्रणेची ओळख करून दिली. या वेबिनारमध्ये पाण्याची गुणवत्ता याविषयी अमृता काशीद यांनी माहिती दिली. बारव आणि त्यांचे संवर्धन याविषयी रोहन काळे यांनी माहिती दिली. भूजल सर्वेक्षणात विद्यार्थ्यांचा सहभाग याविषयी भूगोल विभाग प्रमुख डॉ. माया उंडे यांनी माहिती दिली. या वेबिनारमध्ये १४४ पदवी, पदव्युत्तर व पीएच.डी.च्या अहमदनगर महाविद्यालयाबरोबरच न्यू आर्ट्स, कॉमर्स अँड सायन्स महाविद्यालय, पेमराज सारडा महाविद्यालय आणि राधाबाई काळे महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी आपला सहभाग नोंदवला.

महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ. ए. व्ही. नागवडे, डॉ. बी. एम. गायकर, डॉ. रज्जाक सय्यद, डॉ. एन. आर. सोमवंशी, समन्वयक डॉ. पी. सी. बेदरकर, प्रबंधक डी. आर. आल्हाट यांचे कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी मार्गदर्शन लाभले.

या कार्यक्रमाचे आयोजन प्रा. जी. एल. उंडे, डॉ. एस. ए. बोरुडे, डॉ. एम. एस. जाधव, प्रा. अजय काकडे, प्रा. दादासाहेब जवरे, भूगोल विभाग, अहमदनगर महाविद्यालय, आणि वरिष्ठ भूवैज्ञानिक, भूजल सर्वेक्षण आणि विकास यंत्रणा यांनी यशस्वीपणे केले. आभार डॉ. एस. ए. बोरुडे यांनी मानले.