प्रलंबित प्रश्न सुटत नसल्याने ग्रामस्थ बसणार उपोषणाला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 24, 2021 04:14 IST2021-07-24T04:14:06+5:302021-07-24T04:14:06+5:30

गावातील अनेक प्रश्न प्रलंबित आहेत. अंतर्गत रस्ते, पिण्याचे व वापराचे पाणी, नादुरुस्त पाण्याची टाकी, बंदिस्त गटार योजना, प्रलंबित ...

The villagers will go on a hunger strike as the pending issues are not resolved | प्रलंबित प्रश्न सुटत नसल्याने ग्रामस्थ बसणार उपोषणाला

प्रलंबित प्रश्न सुटत नसल्याने ग्रामस्थ बसणार उपोषणाला

गावातील अनेक प्रश्न प्रलंबित आहेत. अंतर्गत रस्ते, पिण्याचे व वापराचे पाणी, नादुरुस्त पाण्याची टाकी, बंदिस्त गटार योजना, प्रलंबित घरकुल प्रश्न, पिण्याच्या पाण्यावरील अनधिकृत इलेक्ट्रॉनिक मोटारी असे अनेक प्रश्न प्रलंबित आहेत. या प्रश्नांसंबंधी ग्रामपंचायतकडे लेखी निवेदन देण्यात आले होते. त्यामध्ये गावातील अंतर्गत रस्ते, पिण्याच्या पाण्याची पाइपलाइन बदलून मिळणे, पिण्याच्या पाण्याची अनधिकृत इलेक्ट्रॉनिक मोटारीवर कारवाई करणे, दलित वस्तीतील अनेक दिवसांपासून बंद असलेली पाण्याची टाकी दुरुस्त करून मिळावी, अशा विविध मागण्या करण्यात आल्या होत्या. याबाबत कोणतेही उत्तर न मिळाल्याने १३ जुलै रोजी राहुरी पंचायत समितीचे गटविकास अधिकारी व ६ जुलै रोजी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांना निवेदन देण्यात आले.

माणिक आढाव, गहिनीनाथ राशिनकर, प्रकाश आढाव, सचिन गुंजाळ, रवींद्र गुंजाळ, दीपक आढाव, विजय आढाव, बाबासाहेब आढाव, सोमनाथ झिने, लक्ष्मण जाधव, लहानु जाधव, सुरेश जाधव, गुलाब गोलवड, विलास मोरे, ताराचंद केदारी, बबन केदारी, सुरेश गोलवाड, अनिल माळी, विजय आढाव, किशोर जाधव, भरत माळी, सुनील जाधव, इंदुबाई केदारी, अनिता पाटोळे, ताई आढाव, संगीता मनतोडे, सुरेखा जाधव, संगीता केदारी यांनी १५ ऑगस्टला ग्रामपंचायत कार्यालयासमोर उपोषणाचा इशारा दिला आहे.

...................

ग्रामपंचायत, जिल्हा परिषद, पंचायत समिती यांच्याकडे वेळोवेळी लेखी निवेदन दिले. रस्ता, पाणी, पाण्याची टाकी, नाल्या, घरकुल या बाबीकडे ग्रामपंचायत पदाधिकारी दुर्लक्ष करीत आहे. ही कामे लवकरात लवकर मार्गी न लावल्यास १५ ऑगस्ट रोजी ग्रामपंचायत कार्यालयासमोर ग्रामस्थांसमवेत उपोषणास बसणार आहे.

-विरेश आढाव, केंदळ खुर्द, राहुरी.

Web Title: The villagers will go on a hunger strike as the pending issues are not resolved