सांडवेतील ट्रान्सफॉर्मर बिघडल्याने गाव अंधारात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 24, 2021 04:14 IST2021-07-24T04:14:40+5:302021-07-24T04:14:40+5:30

जन आधार सामाजिक संघटनेचे संस्थापक अध्यक्ष प्रकाश पोटे, नगर जिल्हा युवक अध्यक्ष बापू खांदवे, महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष दीपक गुगळे, ...

The village is in darkness due to a faulty transformer in the sewer | सांडवेतील ट्रान्सफॉर्मर बिघडल्याने गाव अंधारात

सांडवेतील ट्रान्सफॉर्मर बिघडल्याने गाव अंधारात

जन आधार सामाजिक संघटनेचे संस्थापक अध्यक्ष प्रकाश पोटे, नगर जिल्हा युवक अध्यक्ष बापू खांदवे, महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष दीपक गुगळे, अमित गांधी, शहराध्यक्ष शहानवाज शेख, गौतम सातपुते, अतुल पवार आदी उपस्थित होते. सांडवे येथील रोहित्र मागील दोन ते तीन महिन्यांपासून बंद आहे. त्यामुळे चांगला पाऊस होऊनही पाणी उपसा करता येत नाही. परिणामी शेतकऱ्यांच्या फळबागा व पिके पाण्याअभावी जळून जाण्याची भीती निर्माण झाली आहे. गावातील शेतकऱ्यांची महावितरण कार्यालयाकडे दीड महिन्यापूर्वी अर्ज करून देखील अद्यापपर्यंत दखल घेतलेली नाही. गावामध्ये रात्री संपूर्ण अंधार होत आहे. पंधरा दिवसांत रोहित्र दुरुस्त अथवा बदलून न दिल्यास शेतकऱ्यांसह महावितरण कार्यालयावर तीव्र स्वरूपाचे आंदोलन करणार असल्याचे निवेदनात म्हटले आहे.

----------------

फोटो - २३जन आधार

सांडवे येथील शिंदे वस्तीवरील रोहित्र बिघडल्याने ते बदलून देण्याच्या मागणीसाठी जन आधार सामाजिक संघटनेच्या वतीने महावितरणचे अतिरिक्त कार्यकारी अभियंता कन्हैयालाल ठाकूर यांना निवेदन दिले.

Web Title: The village is in darkness due to a faulty transformer in the sewer