शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानात 'अज्ञाता'चा पुन्हा थरार; लष्करचा टॉप कमांडर शेख युसूफ अफ्रिदीचा 'खातमा'! नेटवर्कला मोठा धक्का
2
DCM शिंदेंनी केली ‘मिसिंग लिंक’च्या कामाची पाहणी; कोणत्या वाहनांना परवानगी अन् टोल किती?
3
"महिलांना वर्षाला ३६०००, प्रत्येक घुसखोराला हाकलून लावणार अन् TMC..."; पंतप्रधान मोदींची मोठी घोषणा
4
भूषण गवई-धीरेंद्र शास्त्री भेटीवरून टीका, CM फडणवीसांनी सुनावले; म्हणाले, “श्याम मानव कोण?”
5
साई सुदर्शनचा जलवा; ऋतुराजची जिगरबाज खेळी व्यर्थ! चेपॉकच्या मैदानात गुजरातनं उडवला चेन्नईचा धुव्वा
6
जय श्रीराम! आता मुंबईतून अयोध्या गाठणे सुलभ, अमृत भारत ट्रेन सुरू होणार; पाहा, थांबे-वेळा
7
जयपूरच्या राजघराण्यातील 'सुपरकॉम्प्युटर'चा लंडनमध्ये लिलाव; १७व्या शतकातील यंत्र आजही कार्यरत...
8
आता ‘वंदे भारत बुलेट ट्रेन’ येणार, बंगळुरूत बांधणी; ICF-BEMLवर जबाबदारी, रेल्वेची मेगा योजना!
9
महाराष्ट्र बोर्ड १२ वीचा निकाल कोणत्याही क्षणी! डिजीलॉकरवर 'Coming Soon' चे संकेत; निकाल पाहण्यासाठी 'हे' डिटेल्स ठेवा तयार
10
हरभजन सिंगविरोधात रोष, भाजपत प्रवेश केला म्हणून घरावर लिहिलं 'गद्दार'; बघा VIDEO
11
‘आप’ने दणके द्यायला सुरुवात केली; हरभजन सिंगची सुरक्षा काढली, पंजाब मान सरकारची नाराजी उघड
12
“छत्रपती शिवाजी महाराज कधी थकले नाहीत, झुकले नाहीत”; राऊतांचा धीरेंद्र शास्त्रींवर पलटवार
13
आपली बस, आपली सेवा…! ST प्रवाशांसाठी मोठे पाऊल; १ मे पासून ‘लालपरी’चे नवे अभियान होणार सुरू
14
“लोकशाहीत हिंसाचाराला थारा नाही”; वॉशिंग्टन हॉटेल गोळीबार प्रकरणी PM मोदींची प्रतिक्रिया
15
“ST ग्रामीण भागाची जीवनवाहिनी, विलिनीकरणाबाबात महायुती सरकार गप्प का?”: विजय वडेट्टीवार
16
वॉशिंग्टन हॉटेल गोळीबार प्रकरण, ट्रम्प यांची मोठी प्रतिक्रिया; इराण युद्धाशी संबंध जोडत म्हणाले…
17
Ruturaj Gaikwad चा संघर्ष संपला! CSK संकटात असताना पुणेकराचा ‘वन मॅन आर्मी’ शो
18
एकनिष्ठ राहिलेले...! मायक्रोसॉफ्ट जुन्या-जाणत्यांना नोकरीवरून काढणार; नोकरी सोडा नाहीतर स्वेच्छानिवृत्ती घ्या... 
19
बँकेतून काढलेले १५ लाख घरी ठेवले आणि नंतर जमा केले; आयकर विभागाने कर लावला, महिलेने दाद मागितली...
20
Vaibhav Suryavanshi Injury : विक्रमी सेंच्युरीनंतर वैभव सूर्यवंशी दुखापतग्रस्त; तो पुढील सामन्यात खेळणार का?
Daily Top 2Weekly Top 5

वाळूतस्करांनी केले मुलीचे अपहरण, पाच जणांविरुद्ध गुन्हा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 14, 2018 19:54 IST

वाळूतस्करांनी मुलीचे अपहरण केल्याची घटना बारागाव नांदूर येथे शुक्रवारी रात्री घडली़ यासंदर्भात राहुरी पोलीस ठाण्यात पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ठळक मुद्देराहुरी तालुक्यातील बारागाव नांदूर येथील घटना चारचाकी वाहनातून पळविले

बारागाव नांदूर : वाळूतस्करांनी मुलीचे अपहरण केल्याची घटना बारागाव नांदूर येथे शुक्रवारी रात्री घडली़ यासंदर्भात राहुरी पोलीस ठाण्यात पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.सोळावर्षीय युवती आईसोबत घरात झोपली होती. यावेळी वडीलही घरातच होते. वाळूतस्कर किशोर माळी व संजय बर्डे यांच्यासह अन्य तिघे जण शुक्रवारी रात्री बळजबरीने घरात घुसले. त्यांनी वडिलांसमोरच तिला उचलून चारचाकी वाहनातून पळवून नेले. मुलीस पळवून नेले जात असल्याचे लक्षात येताच वडिलांनी आरडाओरड केली. मात्र काही मिनिटातच चारचाकी वाहनातून पाचही आरोपी मुलीस पळवून नेण्यात यशस्वी झाले. याबाबत तिच्या वडिलांनी राहुरी पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली. त्यानुसार अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मुख्य सूत्रधार किशोर माळी याच्यावर वाळूतस्करीसंदर्भात यापूर्वी अनेक गुन्हे दाखल झालेले आहेत. फौजदार दिलीप राठोड तपास करीत आहेत.पोलीस आरोपींच्या मागावरमुलीला पळून नेल्यानंतर राहुरी पोलीस पाच आरोपींचा शोध घेत आहेत. शनिवारी सायंकाळपर्यंत आरोपींचा ठावठिकाणा लागलेला नव्हता. आम्ही लवकरच संबंधितांना अटक करून त्यांच्या मुसक्या आवळू, असे पोलिसांनी सांगितले. तिच्या वडिलांनी आरोपींना तत्काळ अटक करण्याची मागणी केली आहे.

टॅग्स :AhmednagarअहमदनगरRahuriराहुरी