राशीन येथे दिलीप गांधी यांना श्रद्धांजली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 23, 2021 04:21 IST2021-03-23T04:21:49+5:302021-03-23T04:21:49+5:30

राशीन : कर्जत तालुक्यातील राशीन येथील शिवाजी महाराज चौकात भाजप व ग्रामस्थांच्या वतीने माजी खासदार दिलीप गांधी यांना श्रद्धांजली ...

Tribute to Dilip Gandhi at Rashin | राशीन येथे दिलीप गांधी यांना श्रद्धांजली

राशीन येथे दिलीप गांधी यांना श्रद्धांजली

राशीन : कर्जत तालुक्यातील राशीन येथील शिवाजी महाराज चौकात भाजप व ग्रामस्थांच्या वतीने माजी खासदार दिलीप गांधी यांना श्रद्धांजली वाहण्यात आली.

यावेळी मान्यवरांच्या हस्ते दिलीप गांधी यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यात आले. यावेळी भाजपचे माजी तालुकाध्यक्ष अशोक खेडकर, युवा मोर्चाचे जिल्हा उपाध्यक्ष धनंजय मोरे, पहिलवान श्याम कानगुडे, उपसरपंच शंकर देशमुख, साहील काझी, नवीन बोरा, करपडीचे माजी सरपंच सुनील काळे, संभाजी ब्रिगेडचे गणेश कदम, शिवसेनेचे तालुका उपप्रमुख सुभाष जाधव, ग्रामपंचायत सदस्य दीपक थोरात, ज्येष्ठ नागरिक शरदचंद्र शेटे, महिला आघाडीच्या सुलोचना दोशी, शिवसेना शहरप्रमुख मालोजी भिताडे, योगेश शर्मा, बापू धोंडे आदींनी मनोगतातून गांधींच्या आठवणींना उजाळा दिला.

यावेळी दत्ता गोसावी, समीर दोशी,उमेश शेटे, प्रीतम शहा, व्यापारी असोसिएशनचे अध्यक्ष अजिनाथ मोढळे, सुभाष चुत्तर, मोहसीन काझी, विनोद राऊत, औदुंबर देवगावकर, सोयब काझी, तात्यासाहेब माने, पांडुरंग भंडारे, संकेत पाटील आदी उपस्थित होते.

---२२ राशीन गांधी

राशीन येथे माजी केंद्रीय मंत्री दिलीप गांधी यांना श्रद्धांजली वाहण्यात आली.

Web Title: Tribute to Dilip Gandhi at Rashin