नगर - पाथर्डी मार्गावर वाहतूक कोंडी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 2, 2019 13:25 IST2019-04-02T13:25:00+5:302019-04-02T13:25:08+5:30

पाथर्डी तालुक्याचे प्रवेशद्वार समजल्या जाणा-या करंजी घाटात आज सकाळी दहा वाजल्यापासून मोठ्या प्रमाणावर ट्राफिक जाम झाल्याचे चित्र पाहावयास मिळाले.

The traffic congestion on the city - Pathardi road | नगर - पाथर्डी मार्गावर वाहतूक कोंडी

नगर - पाथर्डी मार्गावर वाहतूक कोंडी

पाथर्डी : पाथर्डी तालुक्याचे प्रवेशद्वार समजल्या जाणा-या करंजी घाटात आज सकाळी दहा वाजल्यापासून मोठ्या प्रमाणावर ट्राफिक जाम झाल्याचे चित्र पाहावयास मिळाले.
अहमदनगर शहरात राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते धनंजय मुंडे यांची सभा आहे. त्यामुळे करंजीच्या घाटातील गव्हाणे बाबा मंदिराजवळ होत असल्याने वाहतूक कोंडी होऊन मोठ्या प्रमाणावर ही सुमारे दोन ते तीन किलोमीटर लांबपर्यत वाहनांच्या रांगा लागलेल्या होत्या. या ठिकाणी कुठल्याही प्रकारचे पोलिस उपस्थित नसल्याने वाहनचालकांनी आडव्यातिडव्या गाड्या रस्त्यावर असल्याने मोठ्या प्रमाणावर वाहतूक कोंडीचा सामान्य नागरिकांना करावा लागत आहे. वाहतूक कोंडीमुळे मोठ्या प्रमाणावर त्रास सामोरे जावे लागत आहेत.

Web Title: The traffic congestion on the city - Pathardi road