शहरं
Join us  
Trending Stories
1
दिल्लीतील स्फोटाचं पुलवामा कनेक्शन समोर, सलमानने काश्मीरमधील तारिकला विकली होती ती कार
2
बिहारमध्ये दुसऱ्या टप्प्यासाठी आज मतदान, २० जिल्हे, १२२ मतदारसंघ, ३.७ कोटींवर मतदार
3
दिल्लीतील स्फोट हा आत्मघाती हल्ला? समोर येतेय अशी माहिती, पोलिसांकडून गुन्हा दाखल
4
ना स्फोटाच्या ठिकाणी खड्डा, ना मृतांच्या शरीरात सापडले तारा आणि खिळे, या कारणांनी गुढ वाढवलं
5
दिल्लीत लाल किल्ला मेट्रो स्टेशनजवळ झालेल्या स्फोटातील जखमी आणि मृतांची यादी समोर
6
देशातील ७०% कैदी अजूनही दोषी नाहीत, केवळ ८% जणांनाच मिळाली कायदेशीर मदत
7
व्हिडीओत संपादनात चूक, दिशाभूल केल्याचा ठपका, बीबीसीचे प्रमुख संचालक, वृत्त प्रमुखांचा राजीनामा
8
पासवर्ड बदला, अन्यथा डल्ला, ७६ लाख लोकांचा आहे एकच पासवर्ड; पासवर्ड चोरल्यास बसू शकतो फटका
9
निवड समितीसोबतचा पंगा मोहम्मद शमीला भोवणार? कसोटी संघातील पुनरागमन अनिश्चित काळ लांबणीवर जाण्याची शक्यता
10
कंपनीला कर्मचाऱ्यांनीच घातला दीड कोटीचा गंडा, बनावट कॅश व्हाऊचरची छपाई, अतिरिक्त पगार
11
लाल किल्ल्याजवळ कारचा भीषण स्फोट, ८ ठार; 'प्रत्येक अँगलने तपास करा', गृहमंत्री अमित शाह यांचे तातडीचे आदेश!
12
दिल्लीतील ‘ब्लास्ट’, मागील पाच वर्षांतील केरळनंतरचा ठरला सर्वात मोठा स्फोट
13
लाल किल्ल्याजवळ स्फोट, दुर्घटनेनंतर देश हादरला! राहुल गांधी ते शरद पवार... कोण काय म्हणाले?
14
लाल किल्याजवळील स्फोटाने देश हादरला; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा अमित शाह यांना फोन, पोस्ट करत म्हणाले-
15
Red Fort Blast Video: अनेकांच्या उडाल्या चिंधड्या! स्फोटानंतरची दृश्ये बघून होईल थरकाप, नेमकी कुठे घडली घटना?
16
Prem Chopra : दिग्गज अभिनेते प्रेम चोप्रा यांच्या प्रकृतीत सुधारणा; लीलावती रुग्णालयात दाखल
17
Red Fort Blast:  कार हळूहळू सिग्नलजवळ येऊन थांबली अन् झाला स्फोट; पोलीस आयुक्तांनी सांगितली घटना
18
लाल किल्ल्याजवळील स्फोटानंतर महाराष्ट्र आणि उत्तर प्रदेशमध्ये हाय अलर्ट! तपास यंत्रणा सतर्क
19
Delhi Red Fort Blast: मोठी बातमी! दिल्लीत लाल किल्ल्याजवळ भीषण स्फोट, 8 जणांचा मृत्यू, अनेक गंभीर जखमी
20
अभिनेते धर्मेंद्र व्हेंटिलेटरवर? आयसीयूत सुरु आहेत उपचार; टीमने दिली हेल्थ अपडेट, म्हणाले...

आज रंग उत्सवाचे, रूप गणेशाचे..!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 12, 2016 23:11 IST

अहमदनगर : विघ्नहर्ता गणेशाचे आगमन मोठ्या उत्साहात झाले आहे. बुद्धीदेवता संकटहारी श्री गणेश म्हणजे चैतन्याची सुरुवात.

अहमदनगर : विघ्नहर्ता गणेशाचे आगमन मोठ्या उत्साहात झाले आहे. बुद्धीदेवता संकटहारी श्री गणेश म्हणजे चैतन्याची सुरुवात. प्रसन्न वातावरण ढोल ताशांचा गजर. आरती अभंग मंत्रोच्चारणाचे पवित्र मंगलमय स्वर, विविध फुलांची सुवासिक दरवळ प्रसादाचा गोड सुवास, सर्वकाही चैतन्यमय, शाश्वत, देखणा, डोळे दिपवणारा हा उत्सव म्हणजे चराचरातून चेतना जागविणारा आकंठ चिरस्मरणीय असा हा सोहळा.हा सोहळा कलर्स आणि लोकमत सखी मंच प्रस्तुत रंग उत्सवाचे रूप गणेशाचे या अंतर्गत संपूर्ण महाराष्ट्र आणि गोवा येथे साजरा होत आहे.या निमित्ताने विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले असून कार्यक्रम १३ सप्टेंबर २०१६ रोजी कोहिनूर मंगल कार्यालय, एकवीरा चौकाजवळ येथे दु. ३ वा. होणार आहे. यात गणपतीला आवडणारे खाद्य म्हणजे मोदक आणि म्हणूनच या सोहळ्यात पहीली स्पर्धा म्हणचे मोदक स्पर्धा (यात मोदक घरून तयार करून आणायचे आहे) दुसरी स्पर्धा म्हणजे गणेश - रेखाटन स्पर्धा - यात (धान्य, पाने, फुले, पूजेचे साहित्य इत्यादी वापरून) गणेश रेखाटन करायचे आहे.तिसरी स्पर्धा म्हणजे पुष्पहार स्पर्धा यात (फुले , सुई-दोरा साहित्य घरून आणायचे आहे) ठराविक वेळेत हार तयार करायचा आहे. खरे सांगायचे तर भक्तीचे अनेक रंग या स्पर्धांद्वारे कर्लस आणि लोकमत सखीमंच घेवून येत आहे. गेल्या वर्षभर कलर्स चॅनेलने सखींसाठी विविध उपक्रम राबविले आणि ते संपूर्ण स्तरावर पसंत देखील केले गेले. कलर्स चॅनेल म्हणजे भारतातील सर्वश्रेष्ठ लोकप्रिय प्रिमियम हिंदी जनरल एंटरटेनमेंट चॅनल आहे. भारतीय इतिहासात पहिल्यांदा असे कार्यक्रम कलर्सने आणले आहे. जे वेगळे आहेत आणि मनाला भावणारे आहेत. प्रत्येक मालिकांचे कथानक असे होते ज्यांच्यामध्ये ताकत होती, जुन्या बुरसटलेल्या रूढी परंपरेविरुद्ध जाब विचारण्याची, फिक्शन शो पासून तर फॉरमॅट शो, रिअ‍ॅलिटी शोपासून तर ब्लॉक बास्टर चित्रपट - सदैव विविध शो आणि कार्यक्रमांनी भरलेला भरगच्च नजराणा प्रेक्षकांसाठी कायम हजर. कलर्सचे नागिन २ शनी, दिव्यांशी, आणि बिग बॉस हे आगामी आकर्षण आहे. तेव्हा मनोरंजनाची धमाल करण्यासाठी तयार रहा आणि या उत्सवात सामील व्हा. या प्रसंगी उपस्थित सखीसाठी एक मिनिट गेम शो आणि पैठणी जिंकण्याची संधी. या कार्यक्रमा दरम्यान मिळणार आहे. विजेत्या सखीना कलर्स तर्फे आकर्षक पुरस्कार देण्यात येतील. स्पर्धा सर्वांसाठी नि:शुल्क आणि खुली. अधिक माहिती व नोंदणीसाठी संपर्क लोकमत भवन, पत्रकार चौक, सावेडी, अहमदनगर, ९८५०२६४२००, ९७६७१२८००६ या क्रमांकावर संपर्क साधावा. (प्रतिनिधी)