शहरं
Join us  
Trending Stories
1
"चारित्र्यशील लोक निवडून द्या, तरच हे थांबेल"; आपमधील फुटीवर अण्णा हजारे संतापले, नव्या कायद्याची मागणी
2
Paytm वॉलेट आणि UPI सुरक्षित आहे का, तुमचे पैसे तर अडकणार नाहीत ना? लायसन्स रद्द झाल्यावर कंपनीनं काय म्हटलं?
3
IPL 2026: शतकवीर साई सुदर्शनचा धमाका! केला विराट, रोहित, धोनीलाही न जमलेला धडाकेबाज विक्रम
4
Bank of Baroda मध्ये ५ वर्षांच्या FD मध्ये ₹२,२५,००० डिपॉझिट कराल तर किती मिळेल रिटर्न? जाणून घ्या संपूर्ण गणित
5
२.५ लाखांना विकला बाभळीचा पाला! मनोहर मामाकडे अमावास्या-पौर्णिमेला भक्तांची गर्दी, अखेर अटकेत
6
Tulja Bhavani Temple: तुळजाभवानीच्या पुजाऱ्याला ५ वर्षे मंदिरात प्रवेशबंदी
7
लेख: ट्रम्प यांनी युद्ध केले, की आपल्यांचेच खिसे भरले?
8
Beed: जेलमध्ये चाललंय काय? तिसऱ्या दिवशीही कुख्यात गुन्हेगारांचे कॉल रेकॉर्डिंग व्हायरल!
9
आजचा अग्रलेख: शिवभक्त? नव्हे, शिव्याभक्त!
10
Bike Loan साठी किमान CIBIL स्कोअर किती असला पाहिजे? जाणून घ्या महत्त्वाची माहिती
11
२०३८ आशियाई क्रीडा स्पर्धेसाठी भारताचा दावा; अहमदाबाद शहर बनू शकते प्रमुख दावेदार
12
आजचे राशीभविष्य, २५ एप्रिल २०२६: धनप्राप्ती होईल, प्रवास आनंददायी होईल; पण वाहन चालवताना काळजी घ्या!
13
Mumbai Local: तिन्ही मार्गांवर ‘मेगाब्लॉक’जाचामुळे आजपासून दोन दिवस प्रवासखोळंबा  
14
'किंग कोहली'ने दाखवला दर्जा! साई सुदर्शनचे दमदार शतक व्यर्थ; RCB गुजरातवर पडली भारी
15
Manohar Bhosale: काळी जादू करणाऱ्या भोंदूबाबा मनोहर भोसलेसह दोघांना अटक
16
नायक नहीं, खलनायक हूं मैं! संजय दत्तने पुन्हा पेटवली आग, 'खलनायक रिटर्न्स'ची घोषणा
17
"भाऊ म्हणाले तुझ्या सिनेमात तर मी असणारच...", 'राजा शिवाजी'मध्ये सलमानची एन्ट्री कशी झाली? रितेशने सगळं सांगितलं
18
पालिकेचे १३ अधिकारी आता चौकशीच्या फेऱ्यात, गायकवाड प्रकरणानंतर ‘एसीबी’ नवी मुंबईत सक्रिय
19
कसोटीसाठी चांगल्या खेळपट्ट्या पाहिजेत, जर हे असेच सुरू राहिले तर...; भज्जीने व्यक्त केली भीती
20
मुंबई घामाघूम, तर विदर्भात सूर्याचा प्रकोप; अकोल्याचा पारा ४५ अंशांवर, आज पावसाची शक्यता!
Daily Top 2Weekly Top 5

हजारे यांना धमकी

By admin | Updated: January 16, 2016 23:09 IST

पारनेर : तुम्ही तुमचा वारसदार ठरवा, अन्यथा तुम्हाला ठार मारू, अशा आशयाचे धमकीचे पत्र ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांना नेवासा तालुक्यातून आले आहे.

पारनेर : तुम्ही तुमचा वारसदार ठरवा, अन्यथा तुम्हाला ठार मारू, अशा आशयाचे धमकीचे पत्र ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांना नेवासा तालुक्यातून आले आहे. या पत्रात नेवासा तालुक्यातील तिघांची नावे व क्रमांक आहेत. याप्रकरणी पारनेर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.हजारे यांच्या कार्यालयात चार ते पाच दिवसापूर्वी पत्र आले असून पत्रातील एका पानावर अण्णा हजारे यांचा शेवटचा दिवस २६ जानेवारी असून ‘तुमचा आम्ही गेम करणार आहे. तुम्ही खूप मजा केली़ तुमचे वारसदार, मालमत्तेचे लवकर वितरण करा,’ असेही पत्रात म्हटले आहे. पत्रात नेवासा तालुक्यातील अंबादास चिमा लष्करे, निलेश ज्ञानेश्वर पोहेकर, पप्पू पवार, पांडे मिस्तरी, अमोल या नावाचा उल्लेख आहे. याबाबत शाम पठाडे, अमोल झेंडे यांनी पारनेर पोलीस ठाण्याचे निरीक्षक दिलीप पारेकर यांना माहिती दिली. त्यांनी याप्रकरणी फिर्याद घेऊन गुन्हा दाखल केला आहे. चार ते पाच दिवसापूर्वीच हा गुन्हा दाखल करताना केवळ प्रसिद्धीसाठी असे प्रकार होऊ नये म्हणून याबाबत गोपनीयता पाळण्यात आली होती. परंतु नंतर सोशल मीडियावर याची शनिवारी दिवसभर चर्चा झाल्याने हजारे यांच्या कार्यालयाने नंतर प्रसिद्धी माध्यमांना माहिती दिली. दरम्यान, पारनेर पोलिसांनी या प्रकरणी तपास सुरू केला असून या पत्रात स्वत:ची नावे कोणी देणार नाही तर या चौघांच्या नावावर पत्र पाठविल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे़