शहरं
Join us  
Trending Stories
1
Vaibhav Suryavanshi : फक्त १६ चेंडू खेळला अन् हवा करून गेला! वर्ल्ड रेकॉर्ड थोडक्यात हुकला, पण...
2
मोठी बातमी : भाजपचं धक्कातंत्र! विधान परिषद निवडणुकीसाठी ५ जणांची यादी जाहीर, कुणाला मिळाली संधी?
3
CSK फ्रँचायझीकडून MI विरुद्ध केला होता मोठा पराक्रम! तोच Donovan Ferreira झाला RR चा 'बाहुबली'
4
नांदेड विमानतळ परिसरात ‘गूढ गोलाकार वस्तू’! उडती तबकडी की साधा बलून?
5
विदर्भकराचा इम्पॅक्ट! PBKS ला शह देण्यासाठी RR नं खेळलेली 'ती' चाल ठरली मॅचचा टर्निंग पॉइंट
6
पोलीस आयुक्तांचा धडाकेबाज निर्णय, एकाच दिवसात ४० शस्त्र परवाने रद्द 
7
मंत्री उदय सामंत अंतरवाली सराटीत मनोज जरांगे यांच्या भेटीला, एक तास चर्चा; कारण काय?
8
बाबासाहेबांनी ध्वनी प्रदूषणाचे कधीच समर्थन केले नसते, हायकोर्टाने समाजाला विचार व तत्वज्ञानाची जाणिव करून दिली
9
निवडणूक संपताच पेट्रोल-डिझेल महागणार? केंद्र सरकारनं दिलं मोठं स्पष्टीकरण! काय होणार?
10
नागपूर भाजप शहराध्यक्ष तिवारींचा मोबाईल हॅक, आरोपींकडून लोकांना पैशांची मागणी
11
PBKS vs RR : वैभव-यशस्वीचा धमाका; फरेरा-दुबेचा फिनिशिंग टच! राजस्थानने रोखला पंजाबचा विजयरथ
12
भाजपचे धक्कातंत्र, विदर्भातून प्रस्थापितांऐवजी सहकारतज्ज्ञ संजय भेंडेंना संधी; ‘मायक्रो प्लॅनर’ म्हणून आहे ओळख
13
१ मे पासून खिशाला कात्री! बँकिंगसह 'हे' मोठे नियम बदलणार; गॅस सिलिंडर स्वस्त होणार की महागणार?
14
PBKS vs RR : 'वंडर बॉय' वैभव सूर्यवंशीनं धु धु धुतलं! मग अर्शदीपनं लो फुलटॉसवर हिशोब केला चुकता
15
‘मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे’ मिसिंग लिंकवर किती स्पीडने जाता येणार?; वेगमर्यादेची नियमावली आली!
16
विदर्भात १ मे पर्यंत पावसाळी ढग; पारा खाली येणार, पण उष्णतेची तीव्रता कायम राहणार
17
गुजरातमध्ये BJPचा डंका! १५ महानगरपालिकांवर कमळ फुलले; आप-काँग्रेस आपटले, कुणाला किती जागा?
18
PBKS vs RR: परफेक्ट सेटअप! १५० kmph वेगवान चेंडूसह पुन्हा प्रियांश आर्यवर भारी पडला जोफ्रा (VIDEO)
19
"हे 'सेल्फ रेडिकलायझेशन'चं प्रकरण, जिहाद करायचा म्हणजे..."; मिरा रोड हल्ल्यासंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्पष्टच बोलले
20
इराण-अमेरिका युद्धात UAE चा मोठा निर्णय; OPEC आणि OPEC+ गटातून बाहेर पडणार
Daily Top 2Weekly Top 5

हजार गावे टँकरवर

By admin | Updated: June 5, 2014 00:07 IST

अहमदनगर : जिल्ह्यात टंचाईची तीव्रता प्रचंड प्रमाणात वाढली आहे. सध्या १८९ गावे आणि ८१८ वाड्या-वस्त्यांना टँकरच्या पाण्यावर तहान भागवावी लागते आहे.

अहमदनगर : जिल्ह्यात टंचाईची तीव्रता प्रचंड प्रमाणात वाढली आहे. सध्या १८९ गावे आणि ८१८ वाड्या-वस्त्यांना टँकरच्या पाण्यावर तहान भागवावी लागते आहे. तब्बल २४७ टँकरद्वारे पाणी पुरवठा सुरू आहे. उन्हाळा सुरू होण्यापूर्वी अवघ्या १५ गावांत टंचाई होती. आजअखेर पाथर्डी तालुक्यात सर्वाधिक टंचाई आहे. तेथे ३८ गावे व १२८ वाड्यांना टँकरने पाणी दिले जात आहे. जिल्ह्यात ४ लाख ३४ हजार ६६१ लोकांना टँकरद्वारे पाणी पुरविले जात आहे. जिल्ह्यात श्रीरामपूर आणि राहुरीत एकही गाव टंचाईग्रस्त नाही. श्रीगोंदा व नेवाशात प्रत्येकी दोन गावे टंचाईग्रस्त आहेत. एकूण २४७ पैकी २४ शासकीय व २२३ टँकर हे खासगी आहेत. जून महिन्यात पावसाला सुरूवात झाल्यास त्याचा फायदा होणार असून टँकर कमी होण्यास मदत होणार आहे. जिल्ह्यातील शेतकर्‍यांचा डोळा आकाशाकडे लागला असून सर्वांना पावसाची प्रतीक्षा आहे. (प्रतिनिधी) जिल्ह्यात टंचाई वाढल्याने खासगी विहिरी, कुपनलिका अधिग्रहित केल्या आहेत. टंचाई काळात टँकरची मागणी वाढत असल्याने सरकारने ते त्वरित मिळावे यासाठी तहसीलदारांना मंजुरीचे आदेश दिले आहेत. संबंधित गावांमध्ये मागणीप्रमाणे रोहयोची कामेही मंजूर केली आहेत. -अनिल कवडे, जिल्हाधिकारीमंगळवारी सायंकाळी जिल्ह्यात काही ठिकाणी पावसाला सुरू झाली असून त्याचा फायदा होणार असल्याची शक्यता आहे. यंदाच्या उन्हाळ्यात राहुरी आणि श्रीरामपूर तालुका लकी ठरला असून या ठिकाणी एकही टँकर सुरू करण्याची वेळ प्रशासनावर आली नाही. संगमनेर - ३८, अकोले - ७, कोपरगाव ७, नेवासा - ४, राहाता ७, नगर - ३९, पारनेर - २३, पाथर्डी -५७, शेवगाव - १९, कर्जत - २३, जामखेड - २१, श्रीगोंदा -२.