शहरं
Join us  
Trending Stories
1
दिल्लीला हाय अलर्ट! आत्मघाती दहशतवादी हल्ल्याची शक्यता; BJP मुख्यालय, सरकारी कार्यालये रडारवर
2
लखनौमध्ये भाजप नेत्यावर गोळीबार, प्रकृती चिंताजनक; ट्रामा सेंटरबाहेर कार्यकर्त्यांची गर्दी
3
डोकं वापरा...! नेहराचा मास्टरस्ट्रोक अन् DSP सिराजनं वैभव सूर्यवंशीसमोर दाखवलं मॅजिक (VIDEO)
4
मोठी बातमी! खासदार सुप्रिया सुळे यांच्या कारला अपघात, मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवरील घटना
5
पश्चिम बंगालमध्ये ममता बॅनर्जी यांच्या TMC नं केली विरोधी पक्षनेत्याची घोषणा, कुणाला मिळाली जबाबदारी?
6
'करामती' खानच्या फिरकीची जादू; यशस्वीच्या नेतृत्वाखाली RR अपयशी, विक्रमी विजयासह GT नं मारली मुसंडी
7
उन्हाळ्यात कलिंगड खाणं पडलं महागात! बक्सरमध्ये एकाच कुटुंबातील ८ जणांना विषबाधा; आरोग्य विभाग अलर्टव
8
मुंबई-बंगळूरू ट्रेनचे फायनल टाइमटेबल आले, १३ मे रोजी सुरू; पुणे-मिरज मार्ग, स्लीपर वंदे भारत?
9
अखेर पेच सुटला! 'टीव्हीके' प्रमुख जोसेफ विजय उद्या मुख्यमंत्रीपदाची शपथ घेणार; असा गाठला बहुमताचा आकडा
10
Vaibhav Suryavanshi World Record: वैभव सूर्यवंशी जगात भारी! षटकारांच्या शतकासह १५ व्या वर्षी भीम पराक्रम
11
शपथविधी सुवेंदू अधिकारींचा, पण PM मोदी-DCM शिंदे भेटीची चर्चा; काय बोलले? सगळा तपशील समोर
12
सुवेंदू अधिकारी ते हिमंता बिस्व सरमा, भाजपने दुसऱ्या पक्षातून आलेल्या कोण कोणत्या नेत्यांना बनवलं थेट मुख्यमंत्री? बघा संपूर्ण यादी
13
खामेनेईंबद्दल अमेरिकन गुप्तचर यंत्रणेचा मोठा रिपोर्ट; ट्रम्प यांचे टेन्शन वाढले, सगळे दावे फोल!
14
अतरंगी फटका मारण्याच्या नादात शतक हुकलं; पण गिलनं सलग सातव्यांदा हा पराक्रम करून दाखवत रचला इतिहास
15
“पुढील २० वर्षे भाजपा पंजाबमध्ये पाय रोवू शकणार नाही”; अरविंद केजरीवाल यांची PM मोदींवर टीका
16
होर्मुझ सामुद्रधुनीत युद्धाचा भडका! नाकेबंदी फोडण्याचा प्रयत्न फसला; अमेरिकेचा इराणच्या दोन तेलवाहू जहाजांवर हल्ला
17
Rohit Sharma: रोहितसोबत सेल्फी घेताना महिलेचा फोन झाला बंद; मग हिटमॅन म्हणाला असं काही, सगळेच हसले!
18
“RG कर प्रकरणातील पीडितेला न्याय मिळेल”; सुवेंदू अधिकारी यांच्या आईने व्यक्त केली अपेक्षा
19
सुवेंदू अधिकारी यांच्या शपथविधीनंतर अभिषेक बॅनर्जी यांची प्रदीर्घ पोस्ट; लोकशाहीचा दाखला दिला
20
२ शत्रू ग्रहांचा शुभ राजयोग २०२६: ९ राशींना अकल्पनीय लाभ, पदोन्नती-उत्पन्न वाढ; करारात नफा!
Daily Top 2Weekly Top 5

सिद्धटेकच्या भक्तनिवासाची तिसरी निविदा प्रक्रियाही रद्द

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 22, 2021 04:14 IST

सिद्धटेक : सिद्धटेक (ता. कर्जत) येथील शासकीय भक्तनिवास ठेक्याची मुदत साडेतीन वर्षांपूर्वीच संपली आहे. तेव्हापासून भक्तनिवास बंदच आहे. ...

सिद्धटेक : सिद्धटेक (ता. कर्जत) येथील शासकीय भक्तनिवास ठेक्याची मुदत साडेतीन वर्षांपूर्वीच संपली आहे. तेव्हापासून भक्तनिवास बंदच आहे. निविदा प्रक्रिया पूर्ण होत नसल्याने शासनाचा लाखो रुपयांचा महसूलही बुडाला आहे. तसेच भाविकांचीही गैरसोय होत असून तिसरी निविदा प्रक्रियाही रद्द करण्यात आली आहे.

अष्टविनायकांपैकी एक असलेल्या सिद्धटेक येथील भक्तनिवासाची डिसेंबर २०१७ पर्यंत मागील ठेक्याची मुदत होती. तेव्हापासून आतापर्यंत निविदा प्रक्रियेचा गोंधळ चालू आहे. आतापर्यंत तीन वेळा निविदा काढल्या होत्या. परंतु, वार्षिक रक्कम कमी येत असल्याने निविदा प्रक्रियाच रद्द केली आहे.

गणेश उत्सव, दिवाळी, नाताळ सुट्ट्यांमधील भाविकांची गर्दी लक्षात घेता प्रशासन याबाबत काही निर्णय घेणार आहे की नाही, असा प्रश्न ग्रामस्थ करीत आहेत. अगोदरच बंद असलेले बहुउद्देशीय सभागृह यामध्ये आता भक्तनिवास व व्यापारी गाळे यांची भर पडल्याने कोट्यवधींच्या वास्तू बंद राहून त्यांची दुरवस्था होत आहे. अष्टविनायक यात्रा करणाऱ्या भाविकांची संख्या लक्षणीय आहे. यात्रेदरम्यान त्यांना येथे राहण्याची सुविधा मिळणे आवश्यक आहे. खासगी भक्तनिवासाचे भाडे अनेक भाविकांना न परवडणारे असते. चिंचवड देवस्थान ट्रस्टचे भक्तनिवास अपुरे आहे. भाविकांची गैरसोय होत असल्याने या वास्तू म्हणजे असून अडचण नसून खोळंबा अशी स्थिती झाली आहे.

-----

भक्तनिवास साडेतीन वर्षांपासून बंद असल्याने भाविकांचे हाल होत आहेत. कोट्यवधींच्या वास्तूंची वापराविना दुरवस्था होत आहे. वार्षिक कमी रकमेवर का होईना कोणाला तरी ठेका देऊन भक्तनिवास, बहुउद्देशीय सभागृह सुरू करणे आवश्यक आहे.

-पल्लवी सुजित गायकवाड, योगिता अमोल भोसले,

सरपंच, उपसरपंच, सिद्धटेक-बेर्डी

----

२१ सिद्धटेक

सिद्धटेक येथील बंद असलेले कोट्यवधी खर्चून बांधलेले भक्तनिवास.