शहरं
Join us  
Trending Stories
1
आईच्या नावाने मुलाला ओळखणार, कागदपत्रांवर मातेचे नाव लागणार! सर्व शाळांमध्ये एकच नियम लागू
2
Watermelon Death Case Mumbai : कलिंगडामुळे मृत्यू नाही! FDA अहवालाने संभ्रम मिटला; मुंबईतील 'त्या' ४ जणांच्या मृत्यूचे गूढ कायम
3
बरगी धरणात देवदूत धावले! स्वतःचा जीव धोक्यात घालून कामगारांनी वाचवले डझनभर प्राण; मुख्यमंत्र्यांनी बक्षीस केले जाहीर
4
IPL 2026 Playoffs Race: पुढचं पुढं बघू, आधी CSK चा बदला घेऊ! याच इराद्याने चेपॉकच्या मैदानात उतरेल MI
5
Post Office Scheme : सोन्यासारखी आहे पोस्ट ऑफिसची 'ही' स्कीम; ₹१ लाख जमा करा, मिळेल ₹४५,००० चं व्याज
6
युद्धामुळे तेलाच्या दराचा भडका! सर्वाधिक फटका भारताला, पेट्रोल-डिझेलच्या किमतींचा ‘टाइम बॉम्ब’
7
‘त्या’ मृतांपैकी एकाच्या अवयवाचा रंग हिरवट; खरे कारण अहवाल आल्यानंतर कळणार?
8
बोट बुडू लागली तेव्हा आतमध्ये काय घडलं? लाईफ जॅकेट कुठे होते? दुर्घटनेच्या व्हिडीओत दिसलं असं काही
9
साडेतीन वर्षांच्या बालिकेचा लैंगिक अत्याचार करून खून; नराधमास ताब्यात द्या, ग्रामस्थ संतप्त, महामार्ग दोन तास रोखला
10
कमर्शियल LPG दरवाढीचा हॉटेल उद्योगाला जोरदार फटका; खाद्यपदार्थांचे दर १५ टक्क्यांपर्यंत वाढण्याची शक्यता
11
भारतीय उद्योगांना चीनचा विळखा; इलेक्ट्रॉनिक, रसायने, औषध क्षेत्र संकटात येण्याची भीती
12
"इराणला अण्वस्त्रे देऊ नका, ते क्षणातच विध्वंस घडवतील", ट्रम्प यांनी 'नाटो'ला केलं सावध!
13
ईव्हीएममध्ये फेरफार केल्याच्या आरोप; बंगालमधील १५ मतदान केंद्रांवर फेरमतदान सुरू
14
आजचे राशीभविष्य - २ मे २०२६, आर्थिक, सामाजिक व कौटुंबिक क्षेत्रांत लाभ होतील, कुटुंबात सुख-शांती नांदेल
15
ट्रम्प चिडले, पण फेमस झाल्या जॉर्जिया मेलोनी! तरुणाई तर त्यांच्यामागे खंबीरपणे उभी राहिली
16
मुंबईत ‘ऑपरेशन व्हाइट स्ट्राइक’, १,७४५ कोटींचे अमली पदार्थ जप्त; ३४९ किलो कोकेनही हस्तगत
17
IPL 2026 : वैभव-यशस्वी सुपरहिट जोडीचा फ्लॉप शो! तरी RR निर्धास्त; KL राहुलच्या खेळीने DC ला दिलासा
18
महामुंबईत सायकल ट्रॅकचा ‘ट्रॅक’च हरवला!, सायकल आहे, पण चालवायची कुठे?; कोट्यवधींचा खर्च वाया
19
पेट्रोल-डिझेल दरवाढ उंबरठ्यावर?; व्यावसायिक गॅस सिलिंडरही महागले, निवडणुका आटोपताच तगडा झटका
Daily Top 2Weekly Top 5

शालेय, कनिष्ठ महाविद्यालयीन मुलांच्या वजनात झाली वाढ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 8, 2021 04:14 IST

लोकमत न्यूज नेटवर्क संगमनेर : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गेल्या वर्षभरापासून ऑनलाइन शिक्षण प्रणाली अस्तित्वात आली आहे. शाळा, कनिष्ठ महाविद्यालये बंद ...

लोकमत न्यूज नेटवर्क

संगमनेर : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गेल्या वर्षभरापासून ऑनलाइन शिक्षण प्रणाली अस्तित्वात आली आहे.

शाळा, कनिष्ठ महाविद्यालये बंद असल्याने मुलांमध्ये मैदानावर खेळायला जाण्याचे प्रमाण कमी झाल्याने अनेकांचे वजन वाढले आहे. त्याचा विपरित परिणाम मुलांच्या आरोग्यावर होत असून, पालकांनी विशेष काळजी घेण्याची गरज आहे.

गेल्या वर्षीच्या मार्च महिन्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढल्याने देशभर लॉकडाऊन करण्यात आले होते. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत ‘ब्रेक द चेन’च्या माध्यमातून निर्बंध लादले. शाळा, कनिष्ठ, वरिष्ठ महाविद्यालये बंद असल्याने विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये, याकरिता ऑनलाइन शिक्षण प्रणालीद्वारे विद्यार्थ्यांना शिक्षण देण्यात येत आहे. मुले कोरोना काळात घरातच आहेत. त्यांना ऑनलाइन शिक्षणासाठी मोबाइल, संगणक, लॅपटॉप समोर तासन्‌तास बसून अध्ययन करावे लागत असल्याने एका जागी बैठक वाढली आहे. परिणामतः मुलांच्या वजनात वाढ झाली आहे.

अभ्यास करत असताना मुले विविध प्रकारचे फास्टफूड, जंकफूड सेवन करतात, तसेच घरात असल्याने विविध चमचमीत पदार्थ घरात होऊ लागल्यानेदेखील मुलांच्या वजनात वाढ झाली आहे. ग्रामीण भागातील मुले शाळेत येताना-जाताना त्यांचे एक-दोन किलोमीटर सहज पायी चालणे व्हायचे. शहरात अनेक मुले सायकलहून शाळेत जायची-यायची. आठवड्यातून काही दिवस शाळेत खेळाचे तास असायचे. मुले मैदानी खेळ खेळायचे; मात्र हे सर्व काही बंद झाले आहे. त्यामुळे लवकरच शाळा सुरू कराव्यात, असेही अनेक पालकांनी ‘लोकमत’ला सांगितले.

----------------

मुलांचे मानसिक आरोग्य काही प्रमाणात बिघडले आहे. मुले मोबाइलमध्ये मग्न असतात. ते चिडचिडे, हेकेखोर, एकलकोंडे बनले आहेत. मैदानी खेळ खेळले जात नसल्याने मुलांची चरबी वाढते आहे. त्यांना

जंकफूड, फास्टफूड देणे टाळावे. त्यांच्यासोबत खेळावे, त्यांच्याकडून योग्य पद्धतीने व्यायाम करून घ्यावा. पालकांनी मुलांचे मित्र बनावे, त्यांच्या आरोग्याची विशेष काळजी घ्यावी.

डॉ. राजेंद्र मालपाणी, बालरोग तज्ज्ञ, संगमनेर.

-------------

अनेक आजार जडण्याची शक्यता

व्यायामाचा अभाव, मैदानी खेळ न खेळणे, मोबाइलचा अतिवापर, खाण्या-पिण्याची वेळ निश्चित नसल्याने तसेच अयोग्य आहारामुळे मुलांचे वजन वाढले आहे. लठ्ठपणामुळे कमी वयात मुलांमध्ये अनेक आजार जडण्याची शक्यता नाकारता येत नसल्याचे डॉक्टरांनी सांगितले.

--------------------

ही घ्या काळजी

मुलांना फास्टफूड, जंकफूड देणे टाळावे. आहारात पालेभाज्या, फळांचा समावेश असावा. मुलांकडून योग्य पद्धतीने व्यायाम करून घ्यावा. मैदानावर जाणे शक्य नसल्यास घरासमोर मोकळ्या जागेत त्यांच्यासोबत पालकांनी वेळ घालवावा; मात्र हे करत असताना कोरोनाचा प्रादुर्भाव वाढणार नाही. याचीही काळजी घ्यावी.

--------------

कोपरगाव येथील आत्मा मालिक शैक्षणिक व क्रीडा संकुलात अकरावी सीबीएससी पॅटर्नसाठी गतवर्षी वसतिगृहात राहिलो. तेथे माझे वजन ६५ किलो होते; मात्र आता आठ-दहा महिन्यांपासून घरी आहे. ना खेळणे, ना फिरणे त्यामुळे वजन ७३ किलो झाले आहे. ते कमी करण्याचा प्रयत्न करतो आहे.

कपिल देशमुख, विद्यार्थी, कोतूळ, ता. अकोले.

---------------

मुलगा मोबाइलशिवाय जेवण करतच नाही, मोबाइल हातात असल्याने आपण काय जेवतो? किती जेवतो? याचेही भान त्याला नसते. मोबाइल हातातून घेतल्यानंतर तो रडतो, चिडतो. त्यामुळे त्याला मोबाइल देण्याशिवाय दुसरा पर्याय नसतो. लवकरच शाळा सुरू कराव्यात, ऑनलाइन अभ्यासाचा काहीही उपयोग होत नाही.

वैभव विलासलाल भंडारी, आश्वी बुद्रूक, ता. संगमनेर.

------------------