श्रीरामपुरात जैन मंदिरात चोरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 24, 2020 04:19 IST2020-12-24T04:19:25+5:302020-12-24T04:19:25+5:30

श्रीरामपूर : येथील मुख्य रस्त्यावरील संभवनाथ जैन श्वेतांबर मंदिराचे बांधकाम सुरू असताना बांधकाम साहित्याची अज्ञात चोरट्यांनी चोरी केली. सुमारे ...

Theft at a Jain temple in Shrirampur | श्रीरामपुरात जैन मंदिरात चोरी

श्रीरामपुरात जैन मंदिरात चोरी

श्रीरामपूर : येथील मुख्य रस्त्यावरील संभवनाथ जैन श्वेतांबर मंदिराचे बांधकाम सुरू असताना बांधकाम साहित्याची अज्ञात चोरट्यांनी चोरी केली. सुमारे २ लाख २६ हजार रुपयांचे साहित्य चोरीला गेले. याप्रकरणी शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मंदिराचे ट्रस्टी अमित गांधी यांनी याप्रकरणी फिर्याद दिली आहे.

मंदिराच्या जीर्णोद्धाराचे काम सुरू असताना १४ डिसेंबर रोजी दर्शनसाठी गेलो असता सहा नग पितळी ग्रिल्स व मोटार दिसली नाही. त्यामुळे आजूबाजूला शोध घेतला, विचारपूस केली. परंतु, ते मिळून आले नाहीत. नंतर मंदिरातील पुजाऱ्यांनी १८ डिसेंबर रोजी हा ऐवज चोरट्यांनी चोरुन नेल्याचे सांगितले. घटनेनंतर संभवनाथ जैन श्वेतांबर मंदिराचे विश्वस्त शैलेश बाबरिया, अमित गांधी, सुमतीलाल शहा, अजित नगरकर, अनिल पांडे, ललीत कोठारी यांच्यासह जैनबांधव जमा झाले होते. यानंतर सर्वानुमते फिर्याद देण्याचा निर्णय झाला. पोलीस अधिकाऱ्यानी घटनास्थळी भेट दिली.

-------------------

Web Title: Theft at a Jain temple in Shrirampur