शहरं
Join us  
Trending Stories
1
Vaibhav Suryavanshi : फक्त १६ चेंडू खेळला अन् हवा करून गेला! वर्ल्ड रेकॉर्ड थोडक्यात हुकला, पण...
2
मोठी बातमी : भाजपचं धक्कातंत्र! विधान परिषद निवडणुकीसाठी ५ जणांची यादी जाहीर, कुणाला मिळाली संधी?
3
पोलीस आयुक्तांचा धडाकेबाज निर्णय, एकाच दिवसात ४० शस्त्र परवाने रद्द 
4
मंत्री उदय सामंत अंतरवाली सराटीत मनोज जरांगे यांच्या भेटीला, एक तास चर्चा; कारण काय?
5
निवडणूक संपताच पेट्रोल-डिझेल महागणार? केंद्र सरकारनं दिलं मोठं स्पष्टीकरण! काय होणार?
6
नागपूर भाजप शहराध्यक्ष तिवारींचा मोबाईल हॅक, आरोपींकडून लोकांना पैशांची मागणी
7
PBKS vs RR : वैभव-यशस्वीचा धमाका; फरेरा-दुबेचा फिनिशिंग टच! राजस्थानने रोखला पंजाबचा विजयरथ
8
भाजपचे धक्कातंत्र, विदर्भातून प्रस्थापितांऐवजी सहकारतज्ज्ञ संजय भेंडेंना संधी; ‘मायक्रो प्लॅनर’ म्हणून आहे ओळख
9
१ मे पासून खिशाला कात्री! बँकिंगसह 'हे' मोठे नियम बदलणार; गॅस सिलिंडर स्वस्त होणार की महागणार?
10
PBKS vs RR : 'वंडर बॉय' वैभव सूर्यवंशीनं धु धु धुतलं! मग अर्शदीपनं लो फुलटॉसवर हिशोब केला चुकता
11
‘मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे’ मिसिंग लिंकवर किती स्पीडने जाता येणार?; वेगमर्यादेची नियमावली आली!
12
विदर्भात १ मे पर्यंत पावसाळी ढग; पारा खाली येणार, पण उष्णतेची तीव्रता कायम राहणार
13
गुजरातमध्ये BJPचा डंका! १५ महानगरपालिकांवर कमळ फुलले; आप-काँग्रेस आपटले, कुणाला किती जागा?
14
PBKS vs RR: परफेक्ट सेटअप! १५० kmph वेगवान चेंडूसह पुन्हा प्रियांश आर्यवर भारी पडला जोफ्रा (VIDEO)
15
"हे 'सेल्फ रेडिकलायझेशन'चं प्रकरण, जिहाद करायचा म्हणजे..."; मिरा रोड हल्ल्यासंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्पष्टच बोलले
16
इराण-अमेरिका युद्धात UAE चा मोठा निर्णय; OPEC आणि OPEC+ गटातून बाहेर पडणार
17
म्हाडाच्या २६४० घरांच्या लॉटरीला मुदतवाढ; १४ मे पर्यंत अर्ज सादर करण्याची मुदत
18
१३६३५७ घन मीटर क्षमता, गायब होते LNG टँकर जहाज; अचानक भारताजवळ दिसले, महिनाभर कुठे होते?
19
इंडियन एअरलाईन बंद पडण्याची शक्यता! इंधनाच्या दरवाढीमुळे सरकारकडे मदतीची याचना; संघटनेकडे साकडे
20
Fastest Chase In IPL History : जे मुंबई इंडियन्सनं करून दाखवलं ते १८ वर्षांत कुणालाच नाही जमलं
Daily Top 2Weekly Top 5

कार्यकर्त्यांच्या डोळ्यात अश्रू

By admin | Updated: June 4, 2014 00:16 IST

जामखेड : केंद्रीय ग्रामविकास मंत्री गोपीनाथ मुंडे यांच्या अपघाती निधनाची बातमी समजताच नागरिकांना एक धक्का बसला.

जामखेड : केंद्रीय ग्रामविकास मंत्री गोपीनाथ मुंडे यांच्या अपघाती निधनाची बातमी समजताच नागरिकांना एक धक्का बसला. जामखेडकरांशी त्यांचे असलेले जिव्हाळ्याचे नाते यामुळे स्वयंपूर्तीने जामखेड बंद केले. दुपारी बाराच्या सुमारास सर्वपक्षीय कार्यकर्त्यांच्या वतीने शोकसभा आयोजित करून श्रद्धांजली वाहण्यात आली. केंद्रीयमंत्री गोपीनाथ मुंडे दोन दिवसापूर्वीच तालुक्यातील चोंडी येथे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीनिमित्त आले होते. त्यांनी राष्टÑीय समाज पक्षाच्या वतीने आयोजित धनगर समाजाच्या मेळाव्यात भाषण करून समाजाला आपलेसे केले होते. ‘‘तुमचं घोंगडं अंगावर घेतलं आहे’’ तुमचे प्रश्न मी सोडवणार अशी ग्वाही दिली. माझ्या खात्यामार्फत ग्रामीण भागाचा चेहरामोहरा बदलून अहिल्यादेवींच्या कारभाराप्रमाणे राज्य कारभार करू, असे बोलले होते. माझा राजकीय वारसा म्हणून महादेव जानकर यांचे नाव घेतले होते. या घटनेला ४८ तास होत नाही तोच मुंडे यांच्या निधनाचे वृत्त आले. दोन दिवसापूर्वी बोललेल्या शब्दाने संपूर्ण धनगर समाज व तालुका मंत्रमुग्ध झाला होता. जामखेड तालुक्याचे सर्व व्यवहार बंद ठेवून आदरांजली वाहिली. तहसील कार्यालयासमोर शोकसभा आयोजित केली. त्यामध्ये अनेक व्यक्तींनी मुंडेच्या कामाचा व व्यक्तीगत भेटीचा उल्लेख करून विश्वास बसत नाही, अशी घटना असा उल्लेख केला. पं. स. सभापती डॉ.भगवान मुरूमकर, शिवसेना जिल्हा उपप्रमुख प्रा.मधुकर राळेभात, राष्टÑवादीचे दत्तात्रय वारे, प्रा.संजय वराट, शहाजी राळेभात, भाजप तालुकाध्यक्ष रवी सुरवसे, इस्माईल सय्यद, जाकीर सर, मनसे प्रमुख प्रदिप टापरे, काँग्रेस तालुकाध्यक्ष अ‍ॅड. बंकटराव बारवकर, सुरेश भोसले, डॉ.कैलास हजारे, पोलिस निरीक्षक संजय पाटील, वैजीनाथ पाटील, अमित जाधव, अ‍ॅड.हर्षल डोके, कुंडळ राळेभात, अ‍ॅड. हिरालाल गुंदेचा यांनी श्रद्धांजली वाहिली.