शहरं
Join us  
Trending Stories
1
दिल्लीला हाय अलर्ट! आत्मघाती दहशतवादी हल्ल्याची शक्यता; BJP मुख्यालय, सरकारी कार्यालये रडारवर
2
मोठी बातमी! खासदार सुप्रिया सुळे यांच्या कारला अपघात, मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवरील घटना
3
पश्चिम बंगालमध्ये ममता बॅनर्जी यांच्या TMC नं केली विरोधी पक्षनेत्याची घोषणा, कुणाला मिळाली जबाबदारी?
4
'करामती' खानच्या फिरकीची जादू; यशस्वीच्या नेतृत्वाखाली RR अपयशी, विक्रमी विजयासह GT नं मारली मुसंडी
5
उन्हाळ्यात कलिंगड खाणं पडलं महागात! बक्सरमध्ये एकाच कुटुंबातील ८ जणांना विषबाधा; आरोग्य विभाग अलर्टव
6
मुंबई-बंगळूरू ट्रेनचे फायनल टाइमटेबल आले, १३ मे रोजी सुरू; पुणे-मिरज मार्ग, स्लीपर वंदे भारत?
7
अखेर पेच सुटला! 'टीव्हीके' प्रमुख जोसेफ विजय उद्या मुख्यमंत्रीपदाची शपथ घेणार; असा गाठला बहुमताचा आकडा
8
Vaibhav Suryavanshi World Record: वैभव सूर्यवंशी जगात भारी! षटकारांच्या शतकासह १५ व्या वर्षी भीम पराक्रम
9
शपथविधी सुवेंदू अधिकारींचा, पण PM मोदी-DCM शिंदे भेटीची चर्चा; काय बोलले? सगळा तपशील समोर
10
सुवेंदू अधिकारी ते हिमंता बिस्व सरमा, भाजपने दुसऱ्या पक्षातून आलेल्या कोण कोणत्या नेत्यांना बनवलं थेट मुख्यमंत्री? बघा संपूर्ण यादी
11
खामेनेईंबद्दल अमेरिकन गुप्तचर यंत्रणेचा मोठा रिपोर्ट; ट्रम्प यांचे टेन्शन वाढले, सगळे दावे फोल!
12
अतरंगी फटका मारण्याच्या नादात शतक हुकलं; पण गिलनं सलग सातव्यांदा हा पराक्रम करून दाखवत रचला इतिहास
13
“पुढील २० वर्षे भाजपा पंजाबमध्ये पाय रोवू शकणार नाही”; अरविंद केजरीवाल यांची PM मोदींवर टीका
14
होर्मुझ सामुद्रधुनीत युद्धाचा भडका! नाकेबंदी फोडण्याचा प्रयत्न फसला; अमेरिकेचा इराणच्या दोन तेलवाहू जहाजांवर हल्ला
15
Rohit Sharma: रोहितसोबत सेल्फी घेताना महिलेचा फोन झाला बंद; मग हिटमॅन म्हणाला असं काही, सगळेच हसले!
16
“RG कर प्रकरणातील पीडितेला न्याय मिळेल”; सुवेंदू अधिकारी यांच्या आईने व्यक्त केली अपेक्षा
17
सुवेंदू अधिकारी यांच्या शपथविधीनंतर अभिषेक बॅनर्जी यांची प्रदीर्घ पोस्ट; लोकशाहीचा दाखला दिला
18
२ शत्रू ग्रहांचा शुभ राजयोग २०२६: ९ राशींना अकल्पनीय लाभ, पदोन्नती-उत्पन्न वाढ; करारात नफा!
19
PAK vs BAN : गडबड घोटाळा! पाकिस्तानच्या संघात भारतीयांचा भरणा; रोहित शर्माचं नाव कॅप्टनच्या रुपात झळकलं
20
IPL 2026: सूर्यकुमार खेळणार की नाही? हार्दिकच्या फिटनेसचं काय? MIचा कॅप्टन कोण? पाहा अपडेट
Daily Top 2Weekly Top 5

स्वराज्य प्रतिष्ठानचा संकट काळात गरिबांना मदतीचा हात, एक हजार किराणा किटचे वाटप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 29, 2021 18:59 IST

नवनागापूर व एमआयडीसीमधील गोरगरीब नागरिकांना स्वराज्य सामाजिक प्रतिष्ठानच्या वतीने किराणा किटचे वाटप करण्यात आले. परिसरातील गरजू कुटुंबीयांना एक हजार किटचे वाटप करण्यात आले. यासाठी प्रतिष्ठानचे अध्यक्ष योगेश गलांडे यांनी पुढाकार घेतला.

अहमदनगर : नवनागापूर व एमआयडीसीमधील गोरगरीब नागरिकांना स्वराज्य सामाजिक प्रतिष्ठानच्या वतीने किराणा किटचे वाटप करण्यात आले. परिसरातील गरजू कुटुंबीयांना एक हजार किटचे वाटप करण्यात आले. यासाठी प्रतिष्ठानचे अध्यक्ष योगेश गलांडे यांनी पुढाकार घेतला.

नवनागापूरचे सरपंच डॉ.बबन डोंगरे, उपसरपंच दत्ता पाटील सप्रे, ग्रामपंचायत सदस्य दीपक गीते, शंकर शेळके, नरेश शेळके, सुनील शेवाळे, आकाश दंडवते, उद्योजक अमोल घोलप, अमित बारावकर, संतोष कांबळे, संजय चव्हाण, सुभाष दांगट, अरबाज खान, अमोल घुटे, स्वप्निल खराडे, संतोष शेवाळे, सागर गलांडे, संतोष दळवी, अक्षय बहिर, विशाल गीते, हुसेन सय्यद, बाबा दांगट, हर्षल बिरंगळ आदी उपस्थित होते.

योगेश गलांडे म्हणाले, मनुष्य जीवनावर कोरोना महामारीचे भयंकर संकट आले आहे. नागरिक भयभीत झाले आहेत. लॉकडाऊनमुळे अनेक नागरिकांचा रोजगार गेला आहे. अनेक कुटुंबीयांवर उपासमारीची वेळ आली आहे. या संघटनांमध्ये प्रत्येकाने मदतीचा हात पुढे केला पाहिजे. समाजाचे काहीतरी देणे लागतो, या भावनेतून स्वराज्य सामाजिक प्रतिष्ठानने एक महिनाभर पुरेल, एवढा किराणा साहित्य देण्यात आले. एमआयडीसीमध्ये गेल्या आठ वर्षांपासून स्वराज्य कामगार संघटनेने प्रामाणिकपणे काम करून कामगारांना त्यांचा न्याय्य हक्क मिळवून दिला आहे.

दीपक गीते म्हणाले, संकट काळामध्ये युवकांनी एकत्रित येऊन सामाजिक जबाबदारी सांभाळली पाहिजे. प्रतिष्ठानच्या माध्यमातून एम.आय.डी.सी व गजानन कॉलनी परिसरातील गरजू कुटुंबीयांना एक हजार किराणा वस्तूंचे किट मोफत देण्यात आले. शंकर शेळके म्हणाले, स्वराज्य सामाजिक प्रतिष्ठानच्या माध्यमातून गोरगरीब कुटुंबीयांना आपला उदरनिर्वाह करण्यासाठी एक महिन्याच्या किराणा मालाचे किट देण्यात येत आहे. यामध्ये साखर, शेंगदाणे, बेसन पीठ, तेल, चहा पावडर, मिरची पावडर, तांदूळ, हळद, मीठ, गव्हाचा आटा, तूरडाळ, पोहे, सोयाबीन आदी वस्तू या किराणा किटमध्ये आहेत.

टॅग्स :AhmednagarअहमदनगरCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस