पिंप्री गवळीत विकासाला कौल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 12, 2021 04:20 IST2021-02-12T04:20:21+5:302021-02-12T04:20:21+5:30

अहमदनगर : पिंप्री गवळी (ता. पारनेर) येथे गेल्या काही वर्षात आदर्श गाव कृती समितीचे राज्याचे कार्याध्यक्ष पोपटराव पवार यांच्या ...

Support for development in Pimpri Gawli | पिंप्री गवळीत विकासाला कौल

पिंप्री गवळीत विकासाला कौल

अहमदनगर : पिंप्री गवळी (ता. पारनेर) येथे गेल्या काही वर्षात आदर्श गाव कृती समितीचे राज्याचे कार्याध्यक्ष पोपटराव पवार यांच्या मार्गदर्शनाखाली जनसुविधेची मोठी विकासकामे झाली. त्यामुळेच या निवडणुकीत जनतेने भैरवनाथ ग्रामविकास पॅनलला सत्तेत बसून विकासाला कौल दिला, असे भाजपच्या महिला जिल्हाध्यक्ष तथा सरंपच परिषदेच्या राज्य उपाध्यक्ष आश्विनी थोरात यांनी सांगितले.

पिंप्री गवळीच्या सरपंचपदी पंडीत थोरात व उपसरपंचपदी किसन मांडगे यांची निवड झाल्यानंतर त्यांचा थोरात यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी त्या बोलत होत्या. थोरात म्हणाल्या, गेल्या पाच वर्षात गावात ज्ञानमंदिर, सभागृह, अंतर्गत रस्त्यांचे काँक्रीटीकरण, गावाला जोडणाऱ्या रस्त्यांचे डांबरीकरण, पाणी पुरवठा असे अनेक पायाभुत सुविधा निर्माण केल्या. त्यामुळे गावानेही पुन्हा आमच्यावर विश्वास ठेवला, असे त्या म्हणाल्या. यावेळी आनंदराव रणिसंग, संपतराव मांडगे, विजय रणसिंग, सदस्य निर्मला थोरात, छाया चहाळ यांच्यासह ग्रामस्थ यावेळी उपस्थित होते.

Web Title: Support for development in Pimpri Gawli