सुपा एमआयडीसीत पडणार नव्याने ७ कारखान्यांची भर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 24, 2020 04:19 IST2020-12-24T04:19:34+5:302020-12-24T04:19:34+5:30

कारखाने सुरू होत असताना त्या माध्यमातून अनेकांना रोजगार उपलब्ध होणार आहे. ग्रामीण भागातील नागरिकांचे आरोग्य, शैक्षणिक विकास व अन्य ...

Supa MID will add 7 new factories | सुपा एमआयडीसीत पडणार नव्याने ७ कारखान्यांची भर

सुपा एमआयडीसीत पडणार नव्याने ७ कारखान्यांची भर

कारखाने सुरू होत असताना त्या माध्यमातून अनेकांना रोजगार उपलब्ध होणार आहे. ग्रामीण भागातील नागरिकांचे आरोग्य, शैक्षणिक विकास व अन्य सुविधा निर्माण करून देण्यासाठी कारखाने प्रयत्न करणार आहेत. सध्या सुपा परिसराचे बदललेले चित्र पाहता आगामी ५ ते १० वर्षांत अनपेक्षित असा बदल या भागात कारखानदारीच्या माध्यमातून होणार असल्याचे प्रादेशिक अधिकारी गवळी व उपविभागीय अधिकारी सुधाकर भोसले यांनी सांगितले.

यात वरुण बेव्हरेज कारखान्याच्या माध्यमातून १९५० जणांना रोजगार दिला जाणार असून उर्वरित कारखान्यांकडून प्रत्येकी २०० ते ३०० च्या आसपास बेरोजगारांना नोकरी व्यवसायाची संधी मिळणार आहे. विस्तारित सुपा एमआयडीसी झपाट्याने प्रगती करीत असून सध्या येथे कॅरिअर मायडिया, केएसपीजी, मिंडा असे तीन मोठे प्रकल्प आहेत. त्यात आता नव्याने ७ कारखान्यांची भर पडणार आहे.

----------

नव्याने येणारे कारखाने व त्यांची गुणवणूक (कंसात लाखात)

एअरकॉन प्रा लि.(२०५०)

अंबर एंटर प्रायझेस इंडिया लि. (१०००)

वरुण बेव्हरेज लि. (८२१६७)

अथर्व बायोफार्मा प्रा लि. (३९७४.९),

इंडियाक्यो फूड्स प्रा. लि. (२२६१)

आर्वी कोल्ड चैन लॉगिस्टिक्स प्रा. लि.(६५९९)

आयडियल केमी प्लास्ट प्रा. लि. (११७१७.२)

-----------

Web Title: Supa MID will add 7 new factories