बनपिंपरी, रूईखेल परिसरात वादळ, पावसाचा तडाखा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 28, 2021 04:17 IST2021-05-28T04:17:30+5:302021-05-28T04:17:30+5:30

मांडवगण : श्रीगोंदा तालुक्यातील मांडवगण पंचायत समिती गणाच्या रूईखेल, बनपिंपरीसह बहुतेक गावात मान्सूनपूर्व पावसाने वादळी वाऱ्यासह जोरदार हजेरी लावली. ...

Storm, rain in Banpimpri, Ruikhel area | बनपिंपरी, रूईखेल परिसरात वादळ, पावसाचा तडाखा

बनपिंपरी, रूईखेल परिसरात वादळ, पावसाचा तडाखा

मांडवगण : श्रीगोंदा तालुक्यातील मांडवगण पंचायत समिती गणाच्या रूईखेल, बनपिंपरीसह बहुतेक गावात मान्सूनपूर्व पावसाने वादळी वाऱ्यासह जोरदार हजेरी लावली.

अचानक पडलेल्या पावसामुळे अनेक ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारचे नुकसान झाले. रूईखेल येथे एकाच्या घरकुलाचे पत्रे उडाले. पंचायत समिती गणातील बनपिंपरी, तरडगव्हाण, चवरसांगवी, थिटे सांगवी, घोगरगाव, रूईखेल, बांगर्डे, मांडवगण, कामठी आदी गावांमध्ये वादळी वाऱ्यासह जोराचा पाऊस झाला. रूईखेल येथे संभाजी तबाजी खामकर यांच्या नव्याने बांधकाम करीत असलेल्या घरकुलावरील पत्रे उडून गेले. तर थिटे सांगवी येथे अर्जुन देवा शेळके यांच्या कांदाचाळीवरील प्लॅस्टिकचा कागद उडून गेला. तरडगव्हाण येथे विजेचे खांब पडले.

काही ठिकाणी छोटी-मोठी झाडे उन्मळून पडली आहेत. अनेक ठिकाणी काढणी चालू असलेला कांदा भिजून गेला. तसेच ढिगाऱ्यावरील प्लॅस्टिक कागद उडून गेल्याने कांदा उत्पादकांचे नुकसान झाले. अनेक ठिकाणी आंब्याच्या कैऱ्या गळून पडल्या तर फळबागांचे कमी-अधिक प्रमाणात नुकसान झाले आहे. चिंच झाडांचा मोहर गळाला. यामुळे पुढील वर्षी चिंच उत्पन्नावर त्याचा परिणाम होईल, तर हवेत गारवा वाढला आहे.

----

२७ रूईखेल

रूईखेल येथील एका घरकुलावरील पत्रे वादळाने उडून गेली.

Web Title: Storm, rain in Banpimpri, Ruikhel area