शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांचे पवार यांना निवेदन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 06:28 IST2021-02-05T06:28:29+5:302021-02-05T06:28:29+5:30

अहमदनगर : अनुदानित वरिष्ठ महाविद्यालयीन शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित सुधारित सेवाअंतर्गत आश्‍वासित प्रगती योजनेच्या लाभासह, सेवानिवृत्ती वेतन प्रस्तावांना मंजुरी देऊन ...

Statement of teaching staff to Pawar | शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांचे पवार यांना निवेदन

शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांचे पवार यांना निवेदन

अहमदनगर : अनुदानित वरिष्ठ महाविद्यालयीन शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित सुधारित सेवाअंतर्गत आश्‍वासित प्रगती योजनेच्या लाभासह, सेवानिवृत्ती वेतन प्रस्तावांना मंजुरी देऊन सेवानिवृत्त झालेल्या कर्मचाऱ्यांना निवृत्तिवेतन सुरू करण्यासह इतर मागण्यांचे निवेदन राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांना दिले.

एका हॉस्पिटलच्या उद्घाटनासाठी उपमुख्यमंत्री पवार शनिवारी शहरात आले होते. यावेळी महाराष्ट्र राज्य अशासकीय महाविद्यालयीन शिक्षकेतर कर्मचारी महासंघाचे प्रदेश उपाध्यक्ष अरुण बळीद, जिल्हा सचिव संतोष कानडे, दीपक अल्हाट, सुनील नेटके, योगेश दाते यांच्यासह महाविद्यालयीन शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे अनेक प्रश्‍न प्रलंबित आहेत. ७ डिसेंबर २०१८ व १६ फेब्रुवारी २०१९ हे शासन निर्णय रद्द करून सध्या सेवेत असलेल्या शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना सेवांतर्गत आश्‍वासित प्रगती योजना पूर्वलक्षी प्रभावाने लागू करणे, सातव्या वेतन आयोगाप्रमाणे वेतन निश्‍चिती करून वेतनात लाभ मिळावा आदी प्रलंबित प्रश्‍न सोडविण्याची मागणी उपमुख्यमंत्री यांच्याकडे निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.

Web Title: Statement of teaching staff to Pawar