राळेगण थेरपाळ-गव्हाणवाडी फाटा रस्त्यावरील खड्डे बुजविण्यास प्रारंभ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 16, 2021 04:15 IST2021-07-16T04:15:25+5:302021-07-16T04:15:25+5:30

जवळे : पारनेर तालुक्यातील राळेगण थेरपाळ ते गव्हाणवाडी फाटा रस्त्यावर खड्डेच खड्डे या शीर्षकाखाली २८ जूनच्या ‘लोकमत’ मध्ये वृत्त ...

Start filling potholes on Ralegan Therapal-Gawanwadi fork road | राळेगण थेरपाळ-गव्हाणवाडी फाटा रस्त्यावरील खड्डे बुजविण्यास प्रारंभ

राळेगण थेरपाळ-गव्हाणवाडी फाटा रस्त्यावरील खड्डे बुजविण्यास प्रारंभ

जवळे : पारनेर तालुक्यातील राळेगण थेरपाळ ते गव्हाणवाडी फाटा रस्त्यावर खड्डेच खड्डे या शीर्षकाखाली २८ जूनच्या ‘लोकमत’ मध्ये वृत्त प्रसिद्ध होताच नऊ जुलैपासून रस्त्यावरील खड्डे बुजविण्यास प्रारंभ झाला. यामुळे वाहन चालकांना दिलासा मिळणार आहे.

पारनेर तालुक्यातील राळेगण थेरपाळ ते गव्हाणवाडी फाटा हा नगर-पुणे रस्त्याकडे जाण्यासाठी महत्त्वाचा रस्ता आहे. नाशिककडे जाण्यासाठी जवळचा मार्ग आहे. त्यामुळे रांजणगाव एमआयडीसी, सुपा एमआयडीसी व परिसरातून नाशिककडे जाणाऱ्या वाहनांची संख्या मोठी असते. वाहनांच्या वाढत्या रहदारीमुळे रस्त्यावर खड्डे पडू लागले आहेत. राळेगण थेरपाळ ते गव्हाणवाडी फाटा दरम्यान दहा किलोमीटर पडलेल्या खड्ड्यांमुळे वाहन चालकांना प्रचंड कसरत करावी लागत होती. अवजड वाहतूक करणाऱ्या वाहन चालकांना तर अतिरिक्त वेळ लागतो. त्यातच छोटे-मोठे अपघातही वाढले होते. याकडे बांधकाम विभागाचे लक्ष वेधण्यासाठी ‘लोकमत’ने वृत्त प्रसिद्ध करताच आठ दिवसांत खड्डे बुजविण्यास प्रारंभ झाला.

----

..तर बिले काढणार नाही

‘लोकमत’मध्ये वृत्त प्रसिद्ध होताच खासदार डॉ. सुजय विखे यांनीही दौऱ्यानिमित्त आले असता संबंधित ठेकेदाराला खड्डे बुजविण्यास सांगितले. याबाबत राळेगण थेरपाळचे सरपंच पंकज कारखिले म्हणाले, ठेकेदाराला रस्त्याचे काम लवकरात लवकर पूर्ण करण्यास संबंधित विभागाने सांगितले आहे. रस्त्याची कामेही दर्जेदार करण्यास सांगितली आहेत. कोठेही हलगर्जीपणा केला तर संबंधित ठेकेदाराची बिले काढली जाणार नाहीत.

----

१४ जवळे

राळेगण थेरपाळ-गव्हाणवाडी फाटा रस्त्यावरील खड्डे बुजविण्यास प्रारंभ झाला.

Web Title: Start filling potholes on Ralegan Therapal-Gawanwadi fork road