श्रीरामपूर : येथील बाजार समितीच्या मुख्य आवारात बुधवारी तीन हजार २६० कांदा गोण्यांची आवक झाली. भावात मोठ्या प्रमाणात घट झाल्यामुळे शेतकर्यांची निराशा झाली. अडचणीच्या काळात कांद्याचे बाजारभाव घटल्यामुळे शेतकरी संकटात सापडला आहे. लिलावात प्रथम श्रेणीचा कांदा ७५० ते १०००, द्वितीय ४५० ते ७५०, तर हलक्या प्रतीचा माल २०० ते ४०० रुपये दराने विकला गेला. गोल्टी कांद्याला ५०० ते ७५० रुपये प्रतीक्विंटल भाव मिळाला. कांद्याची आंध्र, कर्नाटक, तामीळनाडू राज्यात रवानगी होत आहे. गोल्टी कांद्यास मागणी असून अन्य कांद्यापेक्षा भाव चांगले आहेत. श्रीरामपूर मुख्य आवार व टाकळीभान उपबाजारात शेतकऱ्यांनी कांदा विक्रीस आणावा असे आवाहन सभापती संगिता शिंदे, उपसभापती नितीन भागडे व सचिव किशोर काळे यांनी केले आहे.
श्रीरामपूर बाजार समितीत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 16, 2021 04:19 IST
श्रीरामपूर : येथील बाजार समितीच्या मुख्य आवारात बुधवारी तीन हजार २६० कांदा गोण्यांची आवक झाली. भावात मोठ्या प्रमाणात घट ...
श्रीरामपूर बाजार समितीत
{{#config.logo.enabled}} {{/config.logo.enabled}}
{{/allowed}}