शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझवरुन इराणसोबत तणाव वाढला! पंतप्रधान मोदी आणि डोनाल्ड ट्रम्प यांच्यात ४० मिनिटे चर्चा
2
युद्धाचा मोठा फटका! इराणचं २७० अब्ज डॉलर्सचं नुकसान; या ५ आखाती देशांकडे मागितली भरपाई
3
लोकसभेतील खासदारांची संख्या ८५० पर्यंत वाढणार, महाराष्ट्रातून किती निवडून जाणार? केंद्राने तयार केला मसुदा
4
मध्य पूर्वेतील तणाव : इटलीचा इस्रायलला मोठा दणका! पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी यांनी सर्व संरक्षण करार रोखले
5
CSK साठी डोकेदुखी ठरतोय Ruturaj Gaikwad चा खराब फॉर्म; कमबॅक करण्यासाठी आता एकच मार्ग उरला
6
7 वर्षांपासून बेपत्ता! 10 हजार डॉलर्सचे बक्षीस, 'या' भारतीय विद्यार्थिनीला FBI का शोधतेय? जाणून घ्या...
7
पेट्रोल १८ तर डिझेल ३५ रुपयांनी महागणार?; ५ राज्यांच्या निवडणुकीनंतर दर वाढण्याची शक्यता
8
"मी आंबेडकरांची फॅन आहे", चिन्मयी सुमीतनं स्पष्टच सांगितलेलं 'जय भीम' म्हणण्यामागचं कारण
9
छत्तीसगडमधील वेदांता पॉवर प्लांटमध्ये बॉयलर स्फोटात १० जण ठार, अनेक जण जखमी
10
IPL 2026 : आधी एका रात्रीत दोन 'क्षेपणास्त्र' लॉन्च केली; आता काव्या मारनच्या SRH नं खेळला नवा डाव
11
आरजेडी-जेडीयूमध्ये पंख विस्तारले, भाजपामध्ये येऊन बनले मुख्यमंत्री; कोण आहेत सम्राट चौधरी?
12
तिजोरी रिकामी, कर्ज भारी! पाकिस्तानवर अमेरिकेचे नेमके किती कर्ज आहे?
13
आवडली नाही तर पैसे परत! 75% 'बायबॅक गॅरंटी'सह जबरदस्त SUV लॉन्च, जाणून घ्या किंमत...
14
Travel : चमत्कार! 'या' कुंडात फळे तरंगतात, पण बेलपत्र मात्र बुडतात; पाण्याखाली आहे महादेवाचे मंदिर! तुम्ही पाहिलेय का?
15
"नरेंद्र मोदी माझ्याशी नजर मिळवून बोलू शकत नाहीत, ट्रम्प यांच्या समोर फक्त...!"; राहुल गांधींचा निशाणा
16
छत्तीसगड हादरलं! वेदांता पॉवर प्लांटमध्ये भीषण स्फोट; ४० मजूर जखमी
17
पाकिस्तानची आंतरराष्ट्रीय नामुष्की ! अमेरिका-इराण चर्चेचे यजमानपद भूषवले, पण हॉटेलचे बिल थकवण्याची शहबाज सरकारवर आली वेळ
18
डोनाल्ड ट्रम्प यांचे 'ब्रह्मास्त्र' फेल! अमेरिकेची नाकेबंदी तोडून चीन-इराणची जहाजे होर्मुजमधून सुसाट
19
काकडी फक्त सॅलड नाही, तर आहे 'सुपरफूड'; पण जास्त खाणं टाळा, अन्यथा होईल नुकसान
20
Sanju Samson ICC Award : संजूसमोर बुमराह ठरला फिका; पठ्ठ्यानं ICC पुरस्कार पटकावत रचला इतिहास
Daily Top 2Weekly Top 5

श्रीगोंद्यात आघाडीचे महिला राज

By admin | Updated: March 26, 2024 15:13 IST

श्रीगोंदा : श्रीगोंदा पंचायत समिती सभापतीपदी राष्ट्रवादीच्या अर्चनाताई दत्तात्रय पानसरे तर उपसभापतीपदी काँग्रेसच्या संध्या मनेश जगताप यांची बिनविरोध निवड झाली आहे

श्रीगोंदा : श्रीगोंदा पंचायत समिती सभापतीपदी राष्ट्रवादीच्या अर्चनाताई दत्तात्रय पानसरे तर उपसभापतीपदी काँग्रेसच्या संध्या मनेश जगताप यांची बिनविरोध निवड झाली आहे. त्यामुळे भाजपाचे आ.बबनराव पाचपुते गटाला धक्का बसला. सभापतीपदासाठी अर्चना पानसरे यांच्या नावाची सूचना मीना देवीकर, बाळासाहेब नाहाटा, हरिदास शिर्के यांनी तर उपसभापतीपदासाठी संध्या जगताप यांच्या नावाची सूचना अनुराधा नागवडे, छाया कुरूमकर, बाळासाहेब मनसुके यांनी मांडली.निवडणूक निर्णय अधिकारी संतोष भोर यांनी निवडीची अधिकृत घोषणा करताच दोन्ही काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी एकच जल्लोष केला. पंचायत समितीत काँग्रेसचे ६, राष्ट्रवादीचे ५ तर भाजपाचा १ सदस्य. त्यामध्ये विद्यमान सभापती अर्चना पानसरे, माजी उपसभापती हरिदास शिर्के, बाळासाहेब मनसुके यांनी राष्ट्रवादीत राहण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे पाचपुतेंबरोबर महेंद्र वाखारे, राजेंद्र पाचपुते हे दोन सदस्य राहिले आहेत. भाजपाचे राजेंद्र म्हस्के व काँग्रेसच्या सदस्या अनुराधा ठवाळ यांनी तळ्यात मळ्यात भूमिका घेतली. त्यामुळे त्यांना दुसऱ्यांदा उपसभापतीपदाची संधी मिळाली नाही. निवडीपूर्वी सकाळी ७ वाजता राष्ट्रवादीच्या अर्चना पानसरे, हरिदास शिर्के, बाळासाहेब मनसुके हे तीन सदस्य आ. अरुण जगताप यांच्या निवासस्थानी आले. शिवाजीराव नागवडे, राहुल जगताप, राजेंद्र नागवडे, बाळासाहेब नाहाटा, अण्णासाहेब शेलार, प्रा.तुकाराम दरेकर यांच्या उपस्थितीत बैठक झाली. त्यात अर्चना पानसरे, संध्या जगताप यांच्या निवडीवर शिक्कामोर्तब केले.(तालुका प्रतिनिधी)