शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांचा मेसेज घेऊन मुनीर पुन्हा इराणमध्ये गेले, अमेरिकेशी शांतता चर्चा कधी सुरू होणार?
2
पत्नीच्या नावे Post Office मध्ये २ लाख गुंतवा, २ वर्षानंतर व्हाल मालामाल; किती मिळेल रिटर्न, पाहा कॅलक्युलेशन
3
‘होर्मुझ’वर इराण-अमेरिकेत चर्चा, तेल जहाजांसाठी नव्या मार्गाचा शोध; प्रस्ताव मान्य होईल?
4
8th Pay Commission: ₹६९,००० बेसिक सॅलरी, ६% वार्षिक इनक्रिमेंट आणि ५ प्रमोशन! ८ व्या वेतन आयोगात मोठे प्रस्ताव
5
नाशिक धर्मांतरण प्रकरणाचे 'टेरर' कनेक्शन? निदा खानचा बॉम्बस्फोटातील मास्टरमाइंडशी संबंध असल्याचा संशय
6
विधान परिषदेच्या १७ जागांची लवकरच निवडणूक होणार!, जिल्हा परिषद निवडणुकीचा येणार नाही अडसर
7
"माझे महत्वाचे सीन्स कापण्यात आले...", मृणाल ठाकूरने 'सन ऑफ सरदार'बाबत केला खुलासा
8
'महिला आरक्षण' तरणार, तर मतदारसंघ पुनर्रचनेला विराेध हाेणार, लोकसभेत भाजपपुढे आव्हान
9
Accident: देवदर्शनासाठी जाताना भाविकांच्या वाहनाला भीषण अपघात; ८ जण ठार, १२ जखमी!
10
कार्याध्यक्ष होणार असल्याच्या चर्चेवर आदित्य ठाकरे यांनी दिली अशी प्रतिक्रिया, म्हणाले...
11
‘टाइम’च्या यादीत सुंदर पिचाई, विकास खन्नांसह रणबीर कपूर, डोनाल्ड ट्रम्प, पोप लिओ, जिनपिंग यांचा समावेश
12
चैत्रातच वैशाख वणवा, महाराष्ट्रासह मुंबईची होरपळ; अंगाची लाहीलाही, अकोल्याचा पारा ४४.२ वर तर मुंबईचे तापमान ३४ वर
13
मुंबई महापालिकेची तिजोरीच असुरक्षित! स्थायी समिती सभागृहात नगरसेविकेच्या पर्समधून २० हजार लंपास
14
उद्योगांना झटका; वीज झाली महाग, १ डिसेंबरपासून प्रतियुनिट ९.९० पैशांची झाली वाढ
15
आजचे राशीभविष्य, १६ एप्रिल २०२६: लाभ होतील, सुख-समृद्धी लाभेल; पण आजचा दिवस सावध राहण्याचा!
16
अमरावतीतील परतवाडा येथील व्हिडीओ कांड: मित्राच्या रूमवर केले दाेन मुलींचे लैंगिक शोषण
17
कायदा माहीत नव्हता, या सबबीवर आयटीआर न भरण्याच्या विलंबला माफी मिळणार नाही !
18
लेबनाॅन, इस्रायलदरम्यान ४० वर्षांनंतर शांतता चर्चा, दोन्ही देशांमध्ये अद्याप करार झाला नसल्याचे अमेरिकेने केले स्पष्ट
19
‘एनसीए’मध्ये जायला खेळाडू घाबरतात, मुनाफ पटेलचे खळबळजनक विधान
20
आरोग्य, निसर्ग संवर्धनासह ९ सामूहिक प्रतिज्ञा करा, नरेंद्र माेदींचं आवाहन
Daily Top 2Weekly Top 5

श्रीगोंद्यात संताप

By admin | Updated: July 19, 2016 00:08 IST

श्रीगोंदा / काष्टी : कोपर्डी येथील अल्पवयीन मुलीवर अत्याचार करणाऱ्या आरोपींना कडक शिक्षा करावी, या मागणीसाठी सोमवारी श्रीगोंदा तालुक्यात ठिकठिकाणी बंद, निषेध सभा, रास्ता रोको करण्यात आले़

श्रीगोंदा / काष्टी : कोपर्डी येथील अल्पवयीन मुलीवर अत्याचार करणाऱ्या आरोपींना कडक शिक्षा करावी, या मागणीसाठी सोमवारी श्रीगोंदा तालुक्यात ठिकठिकाणी बंद, निषेध सभा, रास्ता रोको करण्यात आले़ संतप्त भावना व्यक्त करताना अनेकांनी कायदा व सुव्यवस्था ढासळल्यामुळे असे अत्याचार घडत असल्याची संतप्त भावना व्यक्त केली़कोपर्डी येथील दुर्दैवी घटनेचा निषेध नोंदविण्यासाठी सोमवारी काष्टी, आढळगाव, लोणीव्यंकनाथ, घारगाव, तांदळी येथे कडकडीत बंद पाळण्यात आला़ मढेवडगाव येथे एक तास रस्ता रोको आंदोलन करण्यात आले़ यावेळी तरूणाईने आपल्या तीव्र भावना व्यक्त करताना दोषी नराधमांना फाशीची शिक्षा दिली पाहिजे, अशी मागणी केली़काष्टी येथील बंदला शंभर टक्के प्रतिसाद मिळाला़ विद्यार्थी व ग्रामस्थांनी गावातून मूक फेरी काढली़ भैरवनाथ चौकात निषेध सभा झाली़ या सभेत अरुणराव पाचपुते, प्रतिभा पाचपुते, सुवर्णा पाचपुते, रफीक इनामदार, दिलीप दरेकर, मदन गडदे, ज्ञानदेव पाचपुते यांची भाषणे झाली़मढेवडगाव ग्रामस्थांनी सोमवारी सकाळी तासभर नगर-दौंड रोडवर रास्ता रोको आंदोलन केले़ यावेळी सुवर्णा पाचपुते, फुलसिंग मांडे, अनिता शिंदे, सुजाता शिंदे, संतोष गुंड, हनुमंत झिटे, भैय्या वाबळे, गोरख उंडे, भाऊसाहेब मांडे यांची भाषणे झाली. यावेळी पोलिस निरीक्षक साहेबराव कडनोर यांना निवेदन दिले़ आढळगाव येथील तरूणाईने कोपर्डी प्रकरणावर चांगलीच आक्रमक भूमिका घेतली़ एक हाक देताच पूर्ण बाजारपेठ बंद झाली़ निषेध सभेत देवराव वाकडे, शरद जमदाडे, बंटी उबाळे आदींची भाषणे झाली़लोणीव्यंकनाथमध्ये सोमवारी कडकडीत बंद पाळण्यात आला़ यावेळी तरूणाईने कोपर्डी घटनेच्या विरोधात नारेबाजी करून मनातील आक्रोश व्यक्त केला़घारगाव येथील तरूण कार्यकर्त्यांनी घारगाव बंदचे आवाहन केले़ त्यावर व्यापारी बांधवांनी उस्फूर्त प्रतिसाद दिला़ यावेळी भूषण बडवे, पांडुरंग पानसरे, देविदास थिटे, धनंजय पवार, रोशन निंभोरे यांची भाषणे झाली़ (तालुका प्रतिनिधी)