शहरं
Join us  
Trending Stories
1
सोनं-चांदी खरेदी करणाऱ्यांना मोठा झटका! सरकारने आयात शुल्कात केली भरमसाठ वाढ; आजपासूनच दर वाढणार
2
मध्यमवर्गीयांना बसणार महागाईचा चटका? दिग्गज बँकर उदय कोटक यांचा आगामी आर्थिक संकटाबाबत इशारा
3
Monsoon Update : उकाड्यापासून दिलासा कधी मिळणार? मान्सूनच्या आगमनाची तारीख ठरली; वाचा हवामान खात्याचा नवा अंदाज
4
Preity Zinta: पंजाब किंग्जचा पराभवाचा चौकार, मालकीण प्रिती झिंटा भडकली, मध्यरात्री लिहिलेली पोस्ट चर्चेत!
5
Prateek Yadav: मुलायम सिंह यादव यांचे पुत्र प्रतीक यादव यांचं वयाच्या ३८ व्या वर्षी निधन
6
अण्णाद्रमुकमध्ये उभी फूट, ३० आमदार मुख्यमंत्री विजय यांच्या ‘टीव्हीके’सोबत; आज सरकार परीक्षेला सामोरे जाणार
7
आधी दिला इंधन बचतीचा संदेश; आता पीएम मोदींनी स्वतःच्या ताफ्यातील वाहने कमी केली
8
सोन्या-चांदीच्या आयात शुल्कात वाढ; यातून सरकारला किती फायदा होणार? जाणून घ्या...
9
Aadhaar Card बनवणाऱ्यांसाठी मोठी बातमी! UIDAI नं बदलले नियम, आता 'या' नव्या डॉक्युमेंट्ससह होणार काम, पाहा
10
पाकिस्तानने इराणला युद्धासाठी केली होती मदत, अमेरिकी हल्ल्यांपासून वाचण्यासाठी दिली जागा
11
निदा खानला आश्रय देणं भोवलं, MIM नगरसेवक मतीन पटेल यांच्या मालमत्तांवर छ. संभाजीनगर मनपाचा 'बुलडोजर'
12
विशेष लेख: नरेंद्र मोदी-अमित शाह यांचे पुढचे लक्ष्य?- अर्थातच पंजाब!
13
NEET Paper Leak: कॉमा-फुलस्टॉपसह प्रश्न जसेच्या तसे; नीट-२०२६च्या ‘गेस पेपर’ने खळबळ; एका पेपर लीकमधून १०० कोटींची उलाढाल
14
आजचे राशीभविष्य - १३ मे २०२६,आर्थिक लाभ होऊ शकतात, नवीन कामाची सुरूवात आज करा
15
अग्रलेख: ‘नीट’ फेरपरीक्षेचा वरवंटा! लाखो विद्यार्थ्यांची स्वप्ने चिरडली जाणार
16
IPL 2026 Points Table: क्वॉलिफायर १ चे दोन प्रबळ दावेदार; उर्वरित २ जागांसाठी ६ संघांमध्ये चढाओढ
17
नवे ‘डिजिटल वॉर’, मेसेजिंग अ‍ॅपचा होतोय वापर; 'लष्कर-ए-तैयबा'च्या दहशतवाद्याच्या चौकशीतून समोर आली धक्कादायक माहिती
18
‘काटकसर’ने १७ लाख कोटी बुडाले; सेन्सेक्स १,४५६ अंकांनी कोसळला, रुपया जोरदार आपटला
19
विशेष लेख: स्वतंत्र, सतर्क, सक्रिय वकील हा लोकशाहीचा कणा!
20
NEET Paper Leak: पेपरफुटीचे लातूर, नाशिक, पुणे कनेक्शन; सराव परीक्षेच्या पेपरमधील अनेक प्रश्न जशास तसे
Daily Top 2Weekly Top 5

डरकाळी फोडून सांग जगाला... एक मराठा...लाख मराठा...

By admin | Updated: September 24, 2016 00:09 IST

अहमदनगर : स्वप्नांशा डिके हिने कोपर्डी घटनेतील अत्याचाराबाबतची चीड तिच्या भाषणातून मांडत थेट मुख्यमंत्र्यांवर हल्लाबोल केला.

अहमदनगर : स्वप्नांशा डिके हिने कोपर्डी घटनेतील अत्याचाराबाबतची चीड तिच्या भाषणातून मांडत थेट मुख्यमंत्र्यांवर हल्लाबोल केला. ती म्हणाली, मुख्यमंत्री भाषण देण्यातच धन्यता मानतात. गुन्हेगारांना सहा महिन्यांच्या आत मृत्युदंड द्यावा. आता मराठ्यांची सहनशीलता संपली आहे. मागण्या मान्य करा नाही तर मराठा शांत बसणार नाही.
विद्या कांडेकर हिने महिलांवरील अत्याचार आणि शेतकरी आत्महत्या या विषयावर संताप व्यक्त केला. ती म्हणाली, पोलिसांवरील हल्ले खपवून घेतले जाणार नाहीत. पोलीस असुरक्षित आहेत. राज्यात जंगलराज सुरू झाले आहे. गणेशोत्सव काळात स्थगित केलेले मोर्चे पुन्हा राज्यात सुरू झाले आहेत. केंद्र व राज्याची कुंभकर्णी झोप मोडण्यासाठी सकल मराठा एक झाला आहे.
जयश्री कवडे म्हणाली,कोपर्डी प्रकरणातील गुन्हेगारांना सहा महिन्यांच्या आत मृत्युदंडाची शिक्षा द्यावी. अनुभवी पोलीस अधिकाऱ्यांनी तपास करून दोषारोपपत्र दाखल करावे. भगवा हातात धरणे हे येरागबाळ््याचे काम नव्हे तर त्यासाठी शिवछत्रपतींचे हृदय लागते. आदिती दुसुंगे म्हणाली, अ‍ॅट्रॉसिटीमुळे गुंडांची हिम्मत वाढली. महाराष्ट्रात गेल्या अडीच वर्षात खोटे गुन्हे नोंदवून खंडणी मागण्याचे प्रमाण वाढले आहे. या कायद्याचा आधार घेत दहशत निर्माण केली जात आहे. गुंड प्रशासनात धुडगूस घालत आहेत. त्यामुळे सामान्य माणसाचे जीणे कठीण झाले आहे. कायद्यातील कालबाह्य कलमे वगळण्यात यावीत. जात-धर्म न पाहता अन्यायाविरुद्ध आता पेटून उठलो आहोत. मूक मोर्चामध्ये वादळापूर्वीची शांतता असल्याचा इशाराही तिने दिला.
अश्विनी जगदाळे म्हणाली, न्याय हक्कांसाठी मराठा एकवटला आहे. जो एकत्र येत नाही तो मराठाच नाही. मराठा समाजाला आरक्षणाची गरज आहे. शेतकरी लढ्याची दखल घेतली जात नाही, मात्र धोनीच्या शतकाची दखल घेतली जाते. शेतकऱ्याला फक्त फाशी देतो. त्याच्यासाठी काहीच केले जात नाही.
शिक्षणात दारिद्र्यरेषा शिकविली गेली नाही. बापट आयोगाच्या माध्यमातून शैक्षणिक व आर्थिक हक्क मिळाले पाहिजेत. ‘डरकाळी फोडून सांग जगाला, एक मराठा, लाख मराठा’ अशी घोषणा करून ती थांबली.