शिवा ट्रस्ट संकुलात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 25, 2021 04:26 IST2021-08-25T04:26:53+5:302021-08-25T04:26:53+5:30

श्रीरामपूर : शिवा ट्रस्ट शैक्षणिक संकुलामध्ये स्वातंत्र्य दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी कोविडच्या नियमांचे पालन करण्यात आले. ...

In the Shiva Trust complex | शिवा ट्रस्ट संकुलात

शिवा ट्रस्ट संकुलात

श्रीरामपूर : शिवा ट्रस्ट शैक्षणिक संकुलामध्ये स्वातंत्र्य दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी कोविडच्या नियमांचे पालन करण्यात आले. नेवासा येथील माजी पोलीस पाटील संघटनेचे अध्यक्ष शिवाजी पवार व शिवा ट्रस्टचे (औरंगाबाद ) अध्यक्ष डॉ. बाळासाहेब पवार उपस्थित होते. अध्यक्षस्थानी प्रतिभाताई पवार कॉलेज ऑफ फार्मसीचे प्राचार्य डॉ. प्रदुम्न इगे होते.

शिवा ट्रस्ट शैक्षणिक संकुलाचे प्रशासकीय अधिकारी किशोर जाधव, प्रा. पुनम बोधक, अजितदादा पवार कॉलेज ऑफ पॉलिटेक्निकचे प्राचार्य अभिजीत पटारे, शरदचंद्रजी पवार होमिओपॅथिक मेडिकल व हॉस्पिटलचे प्राचार्य डॉ. अरुण फरगडे, सुप्रियादिदी सुळे कॉलेज ऑफ नर्सिंगच्या प्राचार्या विद्या ठोकळ उपस्थित होते. विद्यार्थी पल्लवी व्यवहारे, साक्षी बमे, श्रीकांत धालपे, आढाव भाग्यश्री, काळे काजल, सोनवणे ऋषिकेश यांनी मनोगत व्यक्त केले.

Web Title: In the Shiva Trust complex